ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे नवे स्वरूप . . . माझे ग्रंथालय
विनायक रानडे , विश्वस्थ , कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक , महाराष्ट्र , भारत .
For more details plz contact.
Vinayak Ranade
Mob - +91 99 22 22 5777
What'sup - + 91 9423972394
Email - vinran007@gmail.com
Skype - granth_vinayak
Face Book - http://www.facebook.com/vinran007
Blog - http://granthtumchyadari.blogspot.in/
Kusumagraj Pratishtan Bank A/cdetails
for Donation to Granth Tumchya Dari and Maze Granthalay with 80g
NAME - KUSUMAGRAJ PRATISHTAN
BANK - BANK OF BARODA
BRANCH - GOLF CLUB
IFSC CODE- BARBOGOLFCL
ACCOUNT NO- 17660100009470
दर्जेदार विविध विषयांची , लेखकांची २५ पुस्तकांची एक पेटी असेल,
ज्यामध्ये उत्तमोत्तम ,निवडक मराठी अथवा इतर भाषांतील साहित्याचा मराठीत अनुवाद असलेली पुस्तके असतील .
साहित्याचे ,लेखनशैलीचे जास्तीत जास्त नमुने जसे कथा , कादंबरी , विनोदी , रहस्य , चरित्र , प्रवासवर्णन . . . . . . थोडक्यात सर्व समावेशक ग्रंथ संपदा देण्याचा आटोकाट प्रयत्न असेल.
एका वाचक कुटुंबाकडे सदर ग्रंथ पेटी २ महिन्यांच्या कालावधी साठी असेल . किमान एक वाचक ते ग्रंथ पेटीतून वाचनासाठी सहजगत्या पुस्तक घेवून जावू शकणारे जवळपास वास्तव्यास असणारे जास्तीत जास्त १० वाचकांना यामुळे वाचनाचा आनंद घेत येईल .
योजना सुरु करताना किमान १२ ग्रंथ पेट्या विविध भागातील वाचकांसाठी उपलब्ध व्हाव्यात .
प्रत्येक ग्रंथ पेटीतील पुस्तके वेगवेगळी असतील . कुसुमाग्रज प्रतिष्ठान च्या निवड समिती मार्फत प्रत्येक पेटीत वैविध्यपूर्ण तसेच कोणतेही पुस्तक दुसऱ्या पेटीत सारखे होणार नाही याची दक्षता घेतली जाते .
दर २ महिन्यांनी वाचक गटातील ग्रंथ पेटी इतर गटांसोबत बदलली जाते .
वैद्यकीय सेवा , दुकाने , कामानिमित्त भ्रमंती तसेच कारखानदारी यामुळे कामाच्या व्यापात बुडालेल्या आमच्या मराठी वाचक बांधवांना वाचनासाठी वाचनालयात जाणे शक्य होत नाही . पुस्तके कोणती व किती विकत घ्यावी आणि वाचून झाल्यावर त्यांचे पुढे काय ?अथवा ग्रंथ तुमच्या दारी योजनेत सहभागी होण्यासाठी ३५ वाचकांचा समूह होवू न शकणे . अशा वाचन प्रेमींसाठी ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे माझे ग्रंथालय हा नवा उपक्रम ठाणे , मुंबई , नाशिक , पुणे . . . कालांतराने सर्व शहरात सुरु करीत आहोत .
Kusumagraj Pratishtan Bank A/c