ग्रंथ पेटी उदघाटन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ग्रंथ पेटी उदघाटन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ३१ ऑक्टोबर २०१५ ग्रंथ तुमच्या दारी - ग्रंथ पेटी कार्यक्रम वृतांत आणि छायाचित्रे

     महाराष्ट्र सेवा संघ आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ग्रंथ तुमच्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी सुविधा गोखले सभागृह (महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड) येथे संध्याकाळी ६ वाजता आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सौ अलका भावे यांनी केले. 
    या कार्यक्रमात कुसुमाग्रज प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री विनायक रानडे , महाराष्ट्र सेवा संघाचे श्री चंद्रशेखर वझे , श्री जयप्रकाश बर्वे , प्रमुख अतिथी म्हणून श्री विसुभाऊ बापट आणि सौ उमा बापट उपस्थित होते.या शिवाय मुलुंड मधील ६ प्राथमिक शाळेतील शिक्षक , मुख्याध्यापक आणि विद्यार्थी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरवात  ग्रंथ तुमच्या दारी या योजनेची थोडक्यात माहिती देऊन करण्यात आली. त्यानंतर शाळेतील शिक्षकांना  मान्यवरांच्या हस्ते १०० पुस्तकांची  (७० मराठी आणि ३० इंग्रजी )ग्रंथ पेटी  प्रदान करण्यात आली. श्री विनायक रानडे यांना संवाद साधण्याची विनंती केली.
    श्री विनायक रानडे यांनी मुलांशी संवाद साधताना विचारले कि ती वाचतात का? तर त्याचे उत्तर अगदी एकासुरात हो असे आले मग ते म्हणाले कि वाचन हे आपली उन्नती घडवते त्यातून नवीन विषयाचे ज्ञान मिळते. वाचन सहभागातून शिक्षण घेणे शिकवते. त्यांनी त्याच बरोबर महाराष्ट्र सेवा संघाचे या  योजनेत सहभागी झाल्याबद्दल आभार मानले.आणि श्री विसुभाऊ बापट यांनी या कार्यक्रमात येणे मान्य केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
      सौ युगंधरा वळसंगकर यांनी श्री विसुभाऊ बापट यांची थोडक्यात ओळख करून दिली. त्यांची ओळख करून देताना त्या सांगतात कि २६ मे १९८१ रोजी त्यांनी कुटुंब रंगलेय काव्यात या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग केला. त्यानंतर सलग ३४ वर्ष हा कार्यक्रम ते करत आहेत. त्यांनी २००७ मध्ये सलग १५ तास कविता वाचन करून नवीन विक्रम केला जो लिम्का बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंदवण्यात आला. १ एप्रिल २०१५ रोजी वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड ऑफ इंडिया आणि १२ जुन २०१५ रोजी वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया असे सन्मान त्यांना मिळाले . विसुभाऊ नि मराठी रसिकांना मराठी कविता ऐकायची आणि अनुभवायची अनुभूती दिली.हा प्रयोग २७४२ वा आहे असे त्यांनी नमूद केले.  महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात याचे प्रयोग सादर करण्यात आले. आश्रम शाळांसाठी मोफत प्रयोग सदर केले. त्याशिवाय शेतकरी आत्महत्या होऊ नये या साठी त्यांना कवितेच्या माध्यमातून धीर देणारे कार्यक्रम त्यांनी केले. हे सांगून  त्यांनी श्री विसुभाऊ बापट यांना   ओमकार काव्यदर्शन कार्यक्रम सादर करण्याची विनंती केली. 
     श्री  विसुभाऊ यांच्या कार्यक्रमाआधी आभारप्रदर्शन चा कार्यक्रम करण्यात आला . यात सौ गीता ग्रामोपाध्ये  आणि सौ प्रतिमा जोशी यांचा सत्कार मान्यवरान्तर्फे करण्यात आला. सौ अलका भावे यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींचे श्री चंद्रशेखर वझे , श्री जयप्रकाश बर्वे , श्री विनायक रानडे , श्री विसुभाऊ बापट , सौ उमा बापट , कॅन्टीन व्यवस्थापक , सेतू प्रकाशन चे श्री किशोर साळवी , श्री विजय वैद्य ,सौ मैत्रीये केळकर आणि उपस्थित प्रेक्षक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले त्यानंतर श्री विसुभाऊ यांनी कार्यक्रम सुरु केला.     
     श्री विसुभाऊ बापट यांनी त्यांचा ओमकार काव्य दर्शन हा कार्यक्रम सदर केला . कार्यक्रमाची सुरवात सरस्वती वंदनेने केली. त्यानंतर गुरु प्रार्थना केली. त्यानंतर विविध प्रकारच्या बाल कविता सदर करून मुलांना उत्तम प्रकारे गुंतवून ठेवले. कविता म्हणजे काय तिचे प्रकार हे फार सुंदर रित्या त्यांनी विशद केले. कविता म्हणजे उत्कट सौंदर्याचा भावपूर्ण अविष्कार हे सांगताना त्यांनी कवितेचे वेग वेगळे १२ प्रकार सांगितले . कविता सदर करताना त्यांना आलेले अनुभव आणि वेगवेगळ्या सुंदर कविता यांचे अप्रतिम सादरीकरण  त्यांनी या कार्यक्रमातून घडवले. श्री विसुभाऊ बापट यांनी सौ उमा बापट यांच्याविषयी माहिती देताना सांगितले कि त्या हिंदी विषयात विशारद असून त्यांनी ४ पुस्तके हि लिहिली आहेत, त्याशिवाय त्या बालभारती मध्ये गाईड चे काम करतात , कविता वाचनात हि त्या विसुभाऊ न साथ देतात.  
   सौ उमा बापट यांनी वाचन  हे माणूस घडवते. नुसते वाचन न करता त्यावर चर्चा केली तर नवीन विषयाचे आकलन हि होते. त्यांच्या लहान पाणी त्यांच्या वडिलांमुळे त्यांना वाचनाची आवड कशी निर्माण झाली . आणि शिस्तबद्ध वाचन केल्यामुळे त्यांचा कसा विकास झाला त्याचे त्यांनी वर्णन केले.
   या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी शिक्षक, मुख्याध्यापक यांनी भरभरून प्रतिसाद दिला. मांडून ठेवलेल्या ग्रंथ पेटीचे मुलांना खूपच आकर्षण वाटत होते. श्री विसुभाऊ यांच्या कार्यक्रमात मुलांनी खूप सुंदर सहभाग दर्शवला.
    या कार्यक्रमाच्या संयोजनेत सौ मैत्रीयी केळकर, सौ अलका भावे , सौ प्रतिमा जोशी , सौ किशोरी वाणी , सौ युगंधरा वळसंगकर , सौ गीता ग्रामोपाध्ये , श्री विनायक जोगळेकर ,श्री विजय वैद्य आणि कुमारी अदिती भावे यांनी सहकार्य केले. नाशिक हून खास नाशिक ग्रंथ तुमच्या दरी विभागाचे श्री अरुण नातू हि या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.      
                     
 

https://www.youtube.com/watch?v=q7q7wJGU48Q&feature=youtu.be

बुधवार, ३० सप्टेंबर, २०१५

७५ वी ग्रंथ पेटी’ प्रदान सोहळा मुंबई पश्चिम विभाग रविवार,४ ऑक्टोबर,२०१५ जॉगर्स पार्क,चिकूवाडी,बोरीवली (पश्चिम) सायंकाळी 5 वाजता

७५ वी  ग्रंथ पेटी’ प्रदान सोहळा    
प्रिय समन्वयक,
      मुंबई पश्चिम विभागाच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’योजनेचा ‘७५ वी  ग्रंथ पेटी’ प्रदान सोहळा रविवार,४ ऑक्टोबर,२०१५ रोजी ‘जॉगर्स पार्क,चिकूवाडी,बोरीवली (पश्चिम) येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्याचे ठरले आहे.या निमित्ताने  कुटुंब  रंगलय  काव्यात चा  कार्यक्रमही सादर  होणार आहे.आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती आहे.








सोमवार, २ मार्च, २०१५

चारकोप कांदिवली सेक्टर ४ नवीन पेटी वितरण

      कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक व ग्रंथ तुमच्या दारी मुंबई पश्चिम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व कांदिवली चारकोपच्या माजी विद्यार्थी संघटना यांच्या प्रयत्नाने  ग्रंथ तुमच्या दारी हि योजना कांदिवली चारकोप सेक्टर ४ प्लॉट नॉ ४०४ धवलगिरी या विभागात सुरु झाली आहे.'प्रत्येक सोसायटी तेथे ग्रंथपेटी" अशी कल्पना मनात घेऊन चारकोप कांदिवली येथे  माजी विद्यार्थी संघटना प्रत्येक सेक्टर मध्ये ,प्रत्येक सोसायटी मध्ये ग्रंथ पेटी हि योजना राबवणार आहे .
     ह्या कार्यक्रमात जगप्रसिद्ध तुतारी वादक पाडुरंग गुरव व अनुयोग विद्यालय खार येथील सहशिक्षक भानुदास पाटोळे ,सातारा एस टी  डेपो चे वाहतूक नियंत्रक दिलीप पाटोळे ,बंडू बडेकर ,प्रीतम धुमाळ हेही उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन  सोसायातील रहिवासी ,नीलम जगताप व किशोर तावडे यांनी केले तसेच ग्रंथ तुमच्या दारी ची माहिती कांदिवली चे समन्वयक घनश्याम देटके यांनी दिली.  

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०१५

ग्रंथ तुमच्या दारी सुवर्ण ग्रंथ पेटी सोहळा ८ फेब्रुवारी २०१५ गोरेगाव मुंबई पश्चिम विभाग - प्रज्ञा प्रबोधिनी शाळा सभागृह दुपारी ४ ३० वाजता सोहळा वृतांत, फोटो, अशोक नायगावकर भाषण

        ग्रंथ तुमच्या दारी सुवर्ण ग्रंथ पेटी सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यातील मुख्य मान्यवर हास्यकवी अशोक नायगावकर , कुसुमाग्रज प्रतिष्ठान अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक , वामन हरी पेठे ज्वेलर्स चे विश्वनाथ पेठे , कुसुमाग्रज प्रतिष्ठान विश्वस्त विनायक रानडे. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते गणेशपूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन केला गेला. श्री. मधु मंगेश कर्णिक यांचा सत्कार श्री अशोक काणे यांनी केला. श्री अशोक नायगावकर यांचा सत्कार श्री मेजर शिरीस्कर  यांनी केला. श्री विश्वनाथ पेठे यांचा सत्कार श्री. श्रीकांत जोशी यांनी केला. श्री विनायक रानडे यांचा सत्कार घनश्याम देठके यांनी केला. तसेच काही विशेष व्यक्तींचा हि सत्कार झाला. श्री राहुल काळे यांचा सत्कार श्री अशोक नायगावकर यांनी केला. श्रीमती शुभदा चौकर यांचा सत्कार मधु मंगेश कर्णिक यांनी केला. श्री सुहास कबरे यांचा सत्कार श्री विनायक रानडे यांनी केला.                              
        मान्यवरांचा सत्कार झाल्यावर डॉ  महेश अभ्यंकर (ग्रंथ तुमच्या दरी मुंबई पश्चिम विभाग मुख्य समन्वयक ) यांनी ग्रंथ  तुमच्या दारी  योजनेचा आढावा घेतला. या योजनेबद्दल सांगताना ते म्हणाले कि हि योजना यशस्वी होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत.त्यतिल सगळ्यात महत्वाचे म्हणजे वाचक , देणगीदार आणि समन्वयक  यांचा उत्तम प्रतिसाद लाभल्यामुळे  २ वर्षात ५० पेट्या  निर्माण होऊ शकल्या . कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पाठींबा  आणि विनायक रानडे यांच्या कल्पक नेतृत्वामुळे हे सगळे शक्य होऊ शकले. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट वाचन संस्कृती रुजवणे आणि वाढवणे असे आहे आणि या वाढत्या प्रतिसादाने हे मुंबई करांनी सिद्ध केले आहे कि उत्तम योजनेला ते भरपूर प्रतिसाद देतात. या आढाव्यानंतर विश्वनाथ पेठे यांच्या हस्ते या योजनेतील समन्वयकांचा   सत्कार सन्मान भेट देऊन झाला. ५० पेंकी ३५ समन्वयक उपस्थित होते त्यांचा सत्कार झाला. त्याशिवाय अंजली गोखले (ग्रंथ तुमच्या दारी  ब्लॉग समन्वयक ), श्री पांडुरंग गुरव (तुतारी वादक) , श्री राम शरण पाल (ग्रंथ तुमच्या दारी पेटी वाहक ) यांचा हि सत्कार झाला. 
      विनायक रानडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त  करताना सांगितले कि . ही  योजना हे  सर्वसामान्य व्यक्तींनी एकमेकांसाठी आणि एकमेकांकारिता मिळून केलेले काम आहे. लेखक ,पुस्तक, वाचनालय आणि वाचक हि एक साखळी आहे. अशी योजना वाचकांपर्येंत   पुस्तक पोचवण्याचे काम करते . या योजनेबद्दल सांगताना ते म्हणाले कि   ही  योजना ७ फेब्रुवारी २००९ रोजी नाशिक येथे सुरु झाली. या योजनेला आता ६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या योजने अंतर्गत माझे ग्रंथालय  ही  योजना ३१ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे येथे पहिल्यादा सुरु झाली आणि ७ फेब्रुवारी २०१५ रोजी माझे ग्रंथालय बाल विभाग  ही  योजना नाशिक येथे सुरु करण्यात आली. या योजने मुळे वाचन संस्कृती वाढीस लागली आणि विविध विषय जे पूर्वी हाताळले जात नव्हते अशी  ही  पुस्तके वाचली जाऊ लागली आहेत. त्यानंतर त्यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे घेतल्या जाणार्या साहित्य भूषण परीक्षेची माहिती दिली व प्रतिष्ठान तर्फे दिल्या जाणारया जनस्थान  पुरस्कार (२७ फेब्रुवारी २०१५) आणि वाचक मेळावा (८ मार्च २०१५ ) यांचे वाचकांना निमंत्रण दिले. त्याच बरोबर मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते डॉ  महेश अभ्यंकर यांचा कुसुमाग्रज यांचे चित्रमय चरित्र देऊन सत्कार केला.तसेच सौ संपदा अभ्यंकर (डॉ महेश अभ्यंकर पत्नी) यांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.  
       प्रीतम धुमाळ यांनी या योजनेत सामील झालेल्या देणगीदारांची माहिती देऊन त्यांचे आभार मानले. 
       विश्वनाथ पेठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि मी येथे वाचकांतर्फे मनोगत करत आहे . ग्रथ पेटीची  ही योजना अतिशय भन्नाट आहे. ती योजना सुरु करणारे  श्री विनायक रानडे यांना धन्यवाद दिले आणि या योजनेत सहभागी झालेल्या समन्वयकांचे    ही  आभार मानले . शेवटी  ते असे म्हणतात कि मराठी भाषा  ही  आपल्या आईसारखी आहे तिच्यावर प्रेम करायला कुणी सांगावे लागत नाही . 
         विश्वनाथ पेठे यांच्या भाषणानंतर सुवर्ण ग्रंथ पेटी निम्मित केलेल्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. तसेच बबन सावंत यांच्या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. 
         त्यानंतर हास्यकवी अशोक नायगावकर यांनी त्यांच्या हास्य कविता सादर केल्या. त्यांच्या भाषणात ते म्हणाले कि मराठी भाषा संवर्धन  ही  एक सामुहिक जबाबदारी आहे. सरकारने विविध राज्यातील मराठी मंडळांना दिवाळी अंक भेट द्यावेत , उद्योजकांनी साहित्यिक ,कवी   यांना  त्यांच्या कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व द्यावे यांनी मराठी संस्कृती जतन होईल. परदेशात आपल्या मराठी पण जपण्यासाठी खास प्रयत्न होताना दिसतात तसे इथे ही  व्हावे असे त्यांनी व्यक्त केले. मराठी चा खाद्यकोश आता लवकरच प्रकाशित होईल त्याबद्दल त्यांनी मधु मंगेश कर्णिक यांचे अभिनंदन केले. सध्या तरुण पिढी वाचन करण्यापासून दूर जाते आहे याची खंत वाटते आहे. असे नमूद करताना ते म्हणाले कि साहित्याचे महत्व खूप मोठे आहे . त्याचे नुसते प्रकाशन करून उपयोग नाही तर ते वाचकांपर्येंत  ते पोचवणे फार गरजेचे असते.कॉर्पोरेट सेक्टर ज्याप्रमाणे त्यांची उत्पादने ग्राहकापर्येंत पोचवतात तसेच  ग्रंथ तुमच्या दारी  ही योजना हे काम अगदी चोख करत आहे हे नमूद करून त्यांनी विनायक रानडे आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान चे आभार मानले.   
             कुसुमाग्रज प्रतिष्ठान चे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी विश्वस्त विनायक रानडे यांच्या कार्याचा ग्रथ विनायक असे म्हणून गौरव केला.  साहित्यामधून समत्व, ममत्व आणि एकत्व समाज होऊन देवत्वाची प्रचीती येउन चांगले साहित्य घडून येते. त्यांनी  कार्यक्रमासाठी  छान प्रतिसाद दिल्याबद्दल   गोरेगावकरांचे खास आभार मानले व कौतुक केले.  
            त्यानंतर ग्लोबल मालवणी या संस्थेचे सचिन आचरेकर यांनी आपल्या संस्थेचा थोडक्यात परिचय करून दिला. आणि त्यांच्या पुस्तक दान योजनेची माहिती दिली. वाचकांकडे असलेल्या सुस्थितील पुस्तके त्याने संस्थेला दान करावी असे आवाहन त्यांनी केले.  ही पुस्तके खेडेगावात नवीन वाचनालय उभे करण्यासाठी उपयोगी पडतील असेही त्यांनी सांगितले 
          
या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर निवदेन श्रीमती माधुरी गोडबोले यांनी समर्पक शब्दात केले. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट म्हणजे पांडुरंग गुरव यांचे तुतारी वादन.मुख्य मान्यवरांचे आगमन , समन्वयकांचा   सत्कार  आणि स्मरणिका प्रकाशन या वेळी तुतारीवादन करून त्यांनी सुंदर सलामी दिली. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यामध्ये डॉ. महेश अभ्यंकर, श्री. अशोक काणे, श्रीमती  माधुरी गोडबोले, सौ. जयश्री पराडकर, श्री. घनश्याम देठ्के, श्री बंडू बेडेकर, डॉ हेमंत बेलसरे, मेजर शिरीस्कर आणि त्यांचे सहकारी यांचा सहभाग होता. स्मरणिका प्रकाशित करताना अनेक देणगीदार व्यक्तीचा सहभाग लाभला. त्याशिवाय वाचकांचे लेख आणि कविता यात प्रसिदध झाले आहेत.

          आभारप्रदर्शन झाले आणि श्रीमती माधुरी गोडबोले यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.   

अशोक नायगावकर भाषण 

https://soundcloud.com/granthvinayak/ashok-naygavkar-speech-part-1

https://soundcloud.com/granthvinayak/ashok-naygavkar-speech-part-2


सोहळा फोटो 

https://www.youtube.com/watch?v=TxsZQnVrRqI





सोमवार, १६ जून, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी अजित पार्क मालाड मुंबई ग्रंथ पेटी उदघाटन ८ जून २०१४

       अजित पार्क को.ऑप.हौ.सोसायटी ही सोमवार बाजार,मालाड (प) येथील बहुसंख्य मराठी भाषिक असलेली सोसायटी आहे.येथे दरवर्षी १५ ऑगस्ट,२६ जानेवारी,आनंदमेळा (फन-फेअर),सत्यनारयाणाची पूजा,सोसायटीमधील लोकांनी बसविलेले लहान मोठ्यांचे कार्यक्रम उत्साहात साजरे साजरे केले जातात.सोसायटीतील एक उत्साही रहिवासी श्री. सोमनाथ राणे यांच्या अफाट जनसंपर्कामुळे ‘ग्रंथ तुमच्या दारी’या संकल्पनेची माहिती मिळाली.असे वाचनालय या विभागात चालविण्यासाठी श्रीमती लोके,सौ. शिरोडकर,सौ.फणसेकर,सौ. राणे यांची समिति बनवून त्यासंबंधीचे पत्रक वाटण्यात आले.या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.लिबर्टी गार्डन,मालाड (प) येथे चालविण्यात येत असलेल्या वाचनालायच्या जागी जाऊन प्रत्यक्ष कार्यपध्दतीची माहिती घेण्यात आली. दोनच दिवसात ग्रंथपेटीच्या देणगी रकमेच्या निम्मी रक्कम पश्चिम विभागाच्या समन्वयकांकडे सुपूर्द करून उर्वरीत रक्कम दिल्यावर ‘अजित पार्क सोसायटीच्या' नावे ग्रंथ पेटी देण्याची विनंती केली. पेटी उपलब्ध असल्याने व सभासदांच्या वाचनाच्या कळकळीमुळे,सर्व रक्कम जमण्याची वाट न पाहता त्यांना पेटी क्र. ४ केंद्र सुरू करण्यासाठी लगेच दिली. 
      या केंद्राचे औपचारीक उद्घाटन एका घरगुती समारंभात दि. ८ जून २०१४ रोजी समन्वयक श्रीमती.दीपा लोके याचे घरी या विभागातील सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. हेमंत बेलसरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.वाचनालयाचे पहिले सभासद व अजित पार्क सोसायटीचे सचिव श्री. खाडये यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. बेलसरे यांचे स्वागत केले.स्वत: डॉ. बेलसरे चिंचोली बंदर,मालाड(प) येथील केंद्राचे समन्वयक असल्याने – अशा केंद्रांची  गरज ,सर्वांगीण प्रगतिसाठी वाचन करण्याचे महत्व आणि आवश्यकता,वाचन का व कसे करावे,तसेच विचारांची देवाण-घेवाण होत असल्याने परस्पर संबंध वाढीस लागून दृढ होत असल्याचे संगितले.तसेच वाचनालय चालविताना घ्यावयाची काळजी याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. वाचनालय सुरू करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांनी समितीतील सभासदांचे कौतुक केले व श्रीमती लोके याना एक पुस्तक देऊन प्रतिकात्मक उद्घाटन केल्याचे जाहीर केले.
      सौ. रेखा शिरोडकर यांनी वाचनालयातर्फे डॉ. बेलसरे यांचे आभार मानले.तसेच पेटी ठेवण्याचे ठिकाण,पुस्तक अदला-बदलीचा दिवस व वेळ तसेच पुस्तक हाताळण्यासंबंधीच्या नियमावलींची माहिती सांगून जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
      श्री. सोमनाथ राणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती लोके,सौ. शिरोडकर,सौ.फणसेकर,सौ. राणे यांनी आपल्या घरातीलच एक कार्य आहे असे समजून वाचनालय सुरू करण्यात सहभाग घेतला त्याचे फलित म्हणजे 'अजित पार्क वाचनालय


ग्रंथ तुमच्या दारी अजित पार्क मालाड मुंबई ग्रंथ पेटी उदघाटन फोटो 


https://www.youtube.com/watch?v=YHNP2AMx_ZI&feature=youtu.be


रविवार, ४ मे, २०१४

ज्ञानवर्धिनी विद्यालय कांदिवली (प.) ग्रंथ पेटी उदघाटन


ग्रंथ तुमच्या दारी” योजनेचे ज्ञानवर्धिनी विद्यालयात जोरदार स्वागत 

        कांदिवली (प.) यथील ज्ञानवर्धिनी विद्यालयात कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक व गोरेगावकर नागरिक यांचे संयुक्त  विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या “ग्रंथ तुमच्या दारी” या योजनेचे जोरदार स्वागत करण्यात आले .
  ज्ञानवर्धिनी विद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नांनी “ग्रंथ तुमच्या दारी” यांच्या ३४ व्या पेटीच्या उद्घाटन निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिलेले पश्चिम मुंबई विभागाचे मुख्यसमन्वयक मा.डॉ.महेश अभ्यंकर यांनी आपल्या अमृततुल्य वाणीने विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले. याप्रसंगी श्री अशोक काणे, श्री. तळपाडे सर, माजी विद्यार्थी संघटनेची पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे छानसे सुत्रसंचलन माजी विद्यार्थी प्रीतम धुमाळ याने केले.

सोमवार, २८ एप्रिल, २०१४

माजी विद्यार्थी संघटना वाचन केंद्र उद्घाटन ३ जानेवारी २०१४


माजी विद्यार्थी  संघटना वाचन केंद्र उद्घाटन

प्रमुख पाहुणे
 डॉ महेश अभ्यंकर. (मुख्य समन्वयक, पश्चिम मुंबई विभाग)
  श्री. अशोक काणे.  (माजी सहाय्यक महाव्यवस्थापक, बेस्ट, ) 
मेजर अरुण शिरीसकर. (निवृत्त मेजर व समाजसेवक )

रयत शिक्षण संस्थेचे, ज्ञानवर्धिनी विद्यालय चारकोप सेक्टर ७ कांदिवली (प) शुक्रवार , ३ जानेवारी २०१४   
वेळ : सकाळी ठीक ८ वा.

श्री. प्रितम धुमाळ श्री. घनश्याम देटके  श्री. महेश नवले
 सर्व आजी /माजी विध्यार्थी ,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग

http://youtu.be/GZ_wBqFVexw

ग्रंथ तुमच्या दारी पेटी उद्घाटन सोहळा अंटोप हिल मुंबई

ग्रंथ तुमच्या दारी ठाणे लोढा कॉम्प्लेक्स पेटी उद्घाटन सोहळा २७ एप्रिल २०१४

गुरुवार, २० मार्च, २०१४

‘विश्रामयोग’ को.ऑ.सो., बॉस्को हायस्कूल जवळ - बोरिवली (प) मुंबई ग्रंथ पेटी ग्रंथ पेटी उदघाटन

प्रमुख पाहुणे –        श्री. अशोकजी नायगावकर  , प्रसिध्द कवि
कें द्राचे नाव  - ‘      विश्रामयोग’ को.ऑ.सो., बॉस्को हायस्कूल जवळ  - बोरिवली  (प)
कें द्र समन्वयक  -  श्री. सचीन  मोरे,
        “बोरीवली  (प),बॉस्को हायस्कूल जवळील ‘विश्रामयोग,को. ऑ. सो.च्या प्रांगणात
कुसुमाग्रज प्रतिष्ठान ,नाशिक आणि  ‘गोरेगावकर नागरिक  या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणारया “ग्रंथ तुमच्या दारी” या योजनेच्या ग्रंथ पेटीचे उदघाटन प्रतिष्ठानचे  विश्वस्त श्री.विनायक रानडे व प्रसिद्ध  कवि श्री. अशोकजी नायगावकर  याचे हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास संकुलातील १०० हून जास्त ज्येष्ठ नागरिक आणि महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
       या कार्यक्रमासाठी संकुलातील प्रांगणात एक भव्य मंच उभारण्यात आला होता.मुख्य गेटपासून मंचापर्येंत दुतर्फा नवीन वर्षी पाडव्याला काढतात त्याप्रमाणे सुबक  रांगोळ्या काढल्या होत्या. ग्रंथ पेटी भगव्या कापडात गुंडाळून,युवकांनी पारंपारिक पोशाखात ,पालखी प्रमाणे वाजत-गाजतग्रंथ दिंडी  गेटपासून मंचापर्यंत नेली. तेथे नथ आणि नऊवारी  साड्या नेसलेल्या स्थानिक महिलांनीओवाळून  ग्रंथ पेटीचे औक्षण के ले.
          सुरवातीला  कें द्र समन्वयक  श्री. सचीन  मोरे यांनी, त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘संकल्प’ या संस्थेतर्फे राबवित असलेल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली आणि या योजनेमुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला  जात असल्याचे सांगितले.
        प्रतिष्ठानचे  विश्वस्त श्री.विनायक रानडे यांनी ह्या योजनेची सुरवात आणि  प्रसार कसा झाला  ते सांगितले.तसेच त्या वेळेपर्यंत  ग्रंथ पेट्यांची संख्या ३०० पेक्षा जास्त असून महाराष्ट्राबाहेरही वाढ होत असल्याचे सांगितले .यावेळी  त्यांना आलेल्या विविध अनुभावांचे  कथन करून  नुसती वाचन संस्कृतीच वाढीस लागत नाही तर आजच्या काळात परस्पर संबंध दृढ होण्याचे  अत्यावश्यक असलेले कामही सहजपणे होत असल्याचे सांगितले.
        शेवटी सर्वाना उत्कंठा असलेले  श्री. अशोकजी नायगावकर  यांचे मार्गदर्शनपर भाषण  झाले.तरुणांनी  मराठी भाषा संवर्धन आणि  जोपासना करण्याचे महत्व विशद करून  श्री.विनायक रानडे त्यासाठी तन-मन-धन खर्चून  करीत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.नेहमीच्या नर्मविनोदी भाषेत अनेक किस्से  सांगून,नावात  ‘विश्रामयोग’ असल्याने ‘पुस्तकाचे पान  वाचून झाले आहे तेव्हा   पान उलटून देण्यास माणूस पाठविण्यास सांगू नका’ अशी मिशिकील ही केली.रांगोळ्या, ग्रंथ दिंडी ,पारंपारीक वेशातील महिला ,ओवाळणी आणि औक्षण या सर्वांच्या एकत्र परिणामामुळे  एखादा सण साजरा होत असल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले
        नेहमीप्रमाणे पेटीतील काही पुस्तके श्री.विनायकराव  रानडे आणि  श्री. अशोकजी नायगावकर  याचे हस्ते समन्वयक आणि वाचक  यांना देऊन ग्रंथ पेटीचे प्रतिकात्मक उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. 


रेलनगर निवासी संकुल, डॉन बॉस्को लेन - बोरीवली (प) मुंबई (प) ३० जून २०१३ ग्रंथ पेटी उदघाटन

  प्रमुख पाहुणे – श्री. विनायक रानडे
  कें द्राचे नाव  – रेलनगर निवासी संकुल, डॉन बॉस्को लेन - बोरीवली
  कें द्र समन्वयक   - श्री. दिलीप फडके

“बोरीवली  (प),डॉन बोस्को लेन येथील ‘रेलनगर,को. ऑ. सो. च्या निवासी संकुलात कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक आणि गोरेगावकर नागरिक या संस्थेच्या  या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणारया “ग्रंथ तुमच्या दारी” या योजनेच्या ग्रंथ पेटीचे उदघाटन रविवार ,३० जून २०१३, संध्याकाळी ७ वाजता . प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री.विनायक रानडे याचे हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास संकुलातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला  मोठ्या संख्येने उपस्थित  होत्या.
    श्री. विनायक रानडे यांनी ह्या योजनेची सुरवात आणि प्रसार कसा झाला ते सांगितले .मालेगाव येथे एका हमालने झाडाखाली ठेवलेली  ग्रंथ पेटी,ठाण्यातील भावे कुटुंबाने सर्वाना  नाश्त्यासह घरात देऊ केलेली सुविधा तसेच औरंगाबाद येथे,घरातील कर्त्या पुरुष्याच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला तेथील वाचक समूहाने केलेल्या मदतीची उदाहरणे सांगून, नुसती वाचन संस्कृतीच वाढीस लागत नाही तर आजच्या काळात परस्पर संबंध दृढ होण्याचे अत्यावाश्यक  असलेले कामही सहजपणे होत असल्याचे सांगितले
      डॉ. महेश अभ्यंकर यांनी वाचनाची आवश्यकता,ते का आणि क से करावे याबद्दल मार्गदर्शन केले. पेटीतील काही पुस्तके समनवय्क आणि वाचक  यांना देऊन ग्रंथ पेटीचे प्रतिकात्मक उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले.
      केंद्र समन्वयक श्री. दिलीप फडके यांनी त्या भागात वाचनालयाची जरुरी  असून सर्वाना विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींना  त्याचा चांगला लाभ होणार असल्याचे सांगितले .रेलनगर संकुलातील अनेक वाचन प्रेमी  या घरगुती समारंभास आवर्जून उपस्थित होते.  

विजयनगर सहनिवास को.ऑ.सो.-निवासी संकुल मुंबई ( पश्चिम ) ग्रंथ पेटी उदघाटन ३० जून २०१३

ग्रंथ पेटी उद्घाटन

 प्रमुख पाहुणे         हिंदुजा रुग्णालयाचे  डॉ. प्रमोद लेले
 कें द्राचे नाव       -  विजयनगर सहनिवास  को.ऑ.सो.-निवासी संकुल
 कें द्र समन्वयक  -श्री. महेश आठल्ये

        “अंधेरी  पूर्व  येथील ‘विजयनगर सहनिवास’ को. ऑ. सो. च्या निवासी संकुलात  कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक आणि गोरेगावकर नागरिक  या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणारया“ग्रंथ तुमच्या दारी” या योजनेच्या २५ व्या ग्रंथ पेटीचे लोकार्पण रविवार ,३० जून २०१३,सकाळी ११ वाजता . डॉ. प्रमोद लेले व प्रतिष्ठानचे  विश्वस्त श्री.विनायक रानडे याचे हस्ते करण्यात आले.या सोहळ्यास अनेक जेष्ठ नागरिक आणि महिला  मोठ्या संख्येने उपस्थित  होत्या.
          त्यावेळी मान्यवरांची  ओळख करून  देताना,सोसायटीचे सचिव  श्री. महेश आठल्ये आणि त्यांच्या सहकारयांनी,यापूर्वी  क्रीडाकक्ष आणि वातानुकुलीत व्यायामशाळेची सुविधा देताना,वाचनालयसुूरु  करण्याच्या आश्वासनाची आज पूर्ती  होत असल्याचे सांगितले .त्यांनी उपस्थितांच्या माहितीसाठी माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतीभा देविसिंगजी -पाटील यांनी यापूर्वी प्रतिष्ठानला  पाठविलेल्या शुभसंदेशाचे  वाचन केले.तसेच‘महाराष्ट्र टाइम्स’ या मराठी वृत्तपत्राने  या कायक्रमाला दिलेल्या प्रसिद्धी बद्दल त्यांचे आभार मानले.
       प्रास्ताविकात डॉ. महेश अभ्यंकर यांनी त्यांच्या ‘गोरेगावकर नागरिक ’ या संथेच्या कार्याची ओळख करून दिली.  आजच्या काळात अशा योजनांचे महत्व सांगून त्या राबविण्याची आवश्यकता  असल्याचे स्पष्ट  केले. हिंदुजा रुग्णालयाचे  डॉ. प्रमोद लेले यांनी, नाशिक  येथील रुग्णालयात ज्याप्रमाणे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ही योजना राबविण्यात येते त्याप्रमाणे मुंबईतील रुग्णालयातहि  ही योजना संयुक्त विद्यमाने कार्यान्वित व्हावी असा मानस व्यक्त केला.
        श्री. विनायक रानडे यांनी ही योजना लहान-मोठ्या देणगीदारांच्या आर्थिक सहभागातून अमलात येत असल्याने नुसती वाचन  संस्कृतीच वाढीस लागत नाही तर आजच्या काळात परस्पर संबंध दृढ होण्याचेअत्यावश्यक  असलेले कामही सहजपणे होत असल्याचे सांगितले .या योजनेस सर्वांचा  भक्कम पाठिंबा आणि आवश्यक  पाठबळ मिळाल्याने अल्पावधीतच  एकूण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर,५० शहरात ७० लाख रु . किमतीच्या,१४,००० वाचकांसाठी ३४० ग्रंथ द्वारा पेट्या वाचन केंद्रे सुूरु  असून सुरवातीलाच  ३ ग्रंथ पेट्यांची मागणी असणारे हे पहिलेच कें द्र होते. तीनही पेटयातील पुस्तकांची मंचावर  आकर्षक  मांडणी के ली होती.कधी एकदा पुस्तके वाचावयास  मिळणार याची सारयांना उत्कं ठा होती. प्रत्येक पेटीतील काही पुस्तके समनवयक व  वाचक   यांना देऊन ग्रंथ पेटीचे प्रतीकात्मक  उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले
        योगायोगाने त्याच दिवशी  संकुलातील ८४ वर्षांचे  जेष्ठ  श्री. ढवळे  यांचा जन्मदिवस
असल्याने त्यांच्यातर्फे कुसुमाग्रजांच्या एका कवितेच्या वाचनाने कायक्रमाची सांगता झाली.”