सोमवार, १२ मे, २०१४

मुलुंड वाचक प्रतिक्रिया

साहित्य म्हणजे अनुभव , भावना, विचार,वेदना,प्रतिक्रिया यांना दिलेले शब्दरूप , मग त्यासाठी कोणताही साहित्यप्रकार मनोधारणेनुसार निवडता येतो. उदा. कथा कादंबरी, आत्मचरित्र वगैरे आकलन व संवेदना वाढवण्याचे प्रयत्न साहित्याद्वारे होतात म्हणून साहित्य निर्मितीचे महत्व आहे. साहित्यातील ताकद आपण वाचनातून अनुभवली आहे. त्याला कोणताही विषय वर्ज्य नाही. अशीच विविध विषयांची पुस्तके कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक यांच्या ग्रंथ  तुमच्या दारी या संकल्पनेतून आमच्या दारी आली. नव नवीन पुस्तके वाचताना विचारांचा झोका इतका उंच जातो कि तो खाली यायलाच तयार नसतो. विविध भाषांमधील अनुवादित पुस्तके देश विदेशातील राजकीय, सामाजिक विचार वेदना यांची जाणीव करून देतात.
    या प्रकल्पाला मिळालेला प्रतिसाद म्हणजे मराठी माणसाचे साहित्यावर असेलेले प्रेमच व्यक्त करणे होय. असे प्रकल्प राबवण्याचा विचार मनात येणारयाना व तो प्रत्यक्षात उतरवताना त्यांना सहकार्याचे हात देणाऱ्या सर्वांना माझे त्रिवार वंदन

सौ मधुरा  सुधीर महंत

मुलुंड वाचक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा