बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा - जुन्नर, पुणे , कोल्हापूर , बेळगाव , गोवा १८ ते २१ सप्टेंबर २०१४

ग्रंथ दौरा . . जुन्नर, पुणे , कोल्हापूर , बेळगाव , गोवा  . .
१८ ते २१ सप्टेंबर  २०१४

गुरवार १८ सप्टेंबर सकाळी ९.३० वाजता 
जिल्हा परिषद शाळा , सुपातेवाडी , जुन्नर, पुणे . 
येथे दोन शाळांना लहान मुलांच्या ग्रंथ पेट्याचे वितरण 
आयोजक - धनंजय राजूरकर  ९४२३० ३८८८६

दुपारी पुण्यातील मान्यवरांच्या भेटीगाठी 

शुक्रवार  १९ सप्टेंबर  २०१४ पुणे 

दुपारी   २:३० वाजता  - कर्वेनगर पेटी क्रमांक ७०
दानेश्वरी बंगला, अजिंक्य नगरी 
कर्वेनगर, दत्तमंदिरा जवळ 

आयोजक -  रोहिणी लिगाडे संपर्क ०२०-२५४ २२६७६
प्रायोजक  -  प्रतिभा बिवलकर  पुणे . 

सायंकाळी  ४ : ३० वाजता  सिंहगड रस्ता पेटी क्रमांक ७३ 
निर्मल टाउनशिप, १२ ब ४ बिल्डींग, तिसरा मजला सारस्वत बँके जवळ सनसीटी रस्ता येथे. 
सुप्रसिद्ध  लेखक डॉ राजेन्द्र खेर  यांच्या शुभहस्ते ग्रंथ पेटीचे वितरण .

आयोजक -  श्री विनय जोगळेकर    फ़ोन  ९३७ ०२६ ००५२  
प्रायोजक  -  श्री नेने  ,  अमेरिका  . 

सायंकाळी  ६ : ३० वाजता  हडपसर रस्ता पेटी क्रमांक ७४
ट्रक़्विलिटी फेज  २ कोद्रे नगर शेवाळेवाडी  
ऑफ पुणे - सोलापूर रोड हडपसर पुणे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .

आयोजक -  श्री राजेंद्र शेवाळे    फ़ोन  ९८२२०७३७६२  
प्रायोजक  -  निर्मल टाउनशिप आणि ग्रंथप्रेमी  

शनिवार २० सप्टेंबर ११ वाजता  कोल्हापूर येथे मान्यवरांच्या भेटी व ग्रंथ पेटीचे वितरण.  

संध्याकाळी ६ वाजता बेळगाव ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ . . 
मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभ हस्ते ९ पेट्यांचे वितरण . 
लोकमान्य ग्रंथालय , टिळकवाडी , खानापूर रोड , बेळगाव येथे  . 

रविवार २१ सप्टेंबर १० वाजता मडगाव , गोवा येथे 
ग्रंथ तुमच्या दारी योजना सुरु करण्यासाठी माहिती व नाव नोंदणी साठी बैठक . 
गोमान्त विद्या निकेतन , फ़ोमन्तो थिएटर मडगाव , गोवा . 
आयोजक - दत्ता नायक  ९८ २२ १० २४ १६ 

सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

माझं ग्रंथालय योजनेचा शुभारंभ उद्घाटन सोहळा ३१ ऑगस्ट २०१४ आनंद विश्व गुरुकुल ठाणे

माझं ग्रंथालय

माझं ग्रंथालय  या योजनेचा शुभारंभ उद्घाटन सोहळा ३१ ऑगस्ट रोजी ठाणे येथे आनंद विश्व गुरुकुल विद्यालयात सम्पन्न्न झाला.

       कार्यक्रमाची सुरवात क्षण एक तरी तू येशील का या स्वागतगीताने  झाली. त्यानंतर  देवहीन ज्योती परी हे गीत सादर  झाले. स्वागत गीतानंतर मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले.त्यानंतर रश्मी जोशी (ठाणे विभाग मुख्य समन्वयक ) यांनी ठाणे विभागातील उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांचे स्वागत करून ठाणे विभागातील ग्रंथ तुमच्या दारी या योजनेची  ठाणे विभागातील सुरवात आणि त्याचा झालेला विस्तार याबद्दल माहिती  दिली. त्यानंतर अरविंद जोशी यांनी विनायक रानडे यांना माझं ग्रंथालय या योजनेची माहिती देण्याची विनंती केली.
       विनायक रानडे (विश्वस्त कुसुमाग्रज प्रतिष्ठान )यांनी आपल्या भाषणात ग्रंथ तुमच्या दारी या योजनेची सुरवात   वाढदिवसानिम्मित एका पुस्तकाचे पैसेदेणगी स्वरुपात द्यावे  यातून झाली असे नमूद करून  या योजनेची सविस्तर माहिती त्यांनी दिली. माझं ग्रंथालय हि योजना विशेषतः अतिशय व्यस्त वाचक जसे कि डॉक्टर, इंजिनीअर यासारखे वाचक ज्यांना वेळ आहे पैसे असून एकदा पुस्तक वाचण्यासाठी पुस्तक घ्यावे का यासाठी हि योजना आहे असे त्यांनी नमूद केले.ग्रंथ तुमच्या दारी हि योजना आता भारताशिवाय दुबई , नेदरलंड, टोकियो याठिकाणी विस्तार होत आहे.  या योजनेतून जास्तीत जास्त वाचकांपर्येंत पोचावी हीच सदिच्छा त्यांनी यात व्यक्त केली. त्यांच्या असंख्य निरपेक्ष मित्र सहकारी आणि देणगीदार यामुळे हि योजना पुढे नेऊ शकत आहोत हे व्यक्त करून त्यांचे त्यांनी आभार मानले. विनायक रानडे यांच्या भाषणानंतर विविध मान्यवरांचा सत्कार झाला. त्यात अनंत रानडे , विनायक रानडे, रश्मी जोशी,पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांचा सत्कार झाला.
     प्रदीप ढवळ (आनंद विश्व गुरुकुल विद्यालययांनी मनोगत व्यक्त करताना मधुमंगेश कर्णिक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या मार्गदर्शनाने हे काम अजून वृद्धिंगत व्हावे असे नमूद केले. वाचन माणसाला कसे समृद्ध करते हे नमूद करताना एका आदिवासी मुलाचे उदाहरण देताना ते म्हणाले कि आई वडील शिकलेले नसून हि त्या मुलाने उत्तम मार्क मिळवले जेव्हा त्या मुलाला याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणला कि एक होता कार्वर या पुस्तकामुळे तो उत्तम अभ्यास करण्यास प्रवृत्त झाला. हे नमूद करून ते म्हणले कि आनंद विश्व गुरुकुल मध्ये जास्तीत जास्त वाचक निर्माण करण्याचा  आम्ही प्रयत्न करू  असे आश्वासन त्यांनी दिले
    मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते माझं  ग्रंथालय या योजनेची पहिली पेटी रश्मी आणि अरविंद जोशी यांना देऊन माझं ग्रंथालय या योजनेचे उद्घाटन  झाले.त्यानंतर   ग्रंथ तुमच्या दारी या योजनेच्या ४ पेट्या आणि माझं ग्रंथालय च्या २० पेट्यांचे  वितरण झाले.
    शीलाताई मराठे यांनी माझं ग्रंथालय आणि त्याबद्दलचे आपले विचार व्यक्त केले. आणि हा उपक्रम उतरोत्तर वृद्धिंगत होवो या शुभेछा  त्यांनी दिल्या.
    मेधा मेहंदळे (आनंद विश्व गुरुकुल विद्यालय )यांनी या भाषणात आपल्या संस्थेबद्दल नमूद करून वाचन आणि त्यामुळे होणारे संस्कार याचे महत्व विशद केले. आणि मधुमंगेश कर्णिक यांच्या उत्साहाचे त्याने कौतुक केले . यानंतर आमदार  संजय केळकर यांनी वाचनाचे महत्व विशद करून या उपक्रमाबद्दल कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांचे आभार मानले. या प्रसंगानिम्मित आपले विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी प्रदीप ढवळ यांचे आभार मानले आणि ठाणेकर हे उत्तम उपक्रम राबवण्यात नेहमीच उत्तम प्रतिसाद देतात असे नमूद करून ते म्हणाले कि ठाणे हि आता महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीच झाली आहे. त्यामुळे या योजनेला ठाण्यात उत्तम प्रतिसाद नक्की मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मधुमंगेश कर्णिक यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करावे असे व्यक्त करून भाषणाचा समारोप त्यांनी केला.
 त्यानंतर या कार्यक्रमाचे  आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान चे   अध्यक्ष पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी आपले विचार मांडावेत अशी विनंती  अरविंद जोशी यांनी केली
     मधुमंगेश कर्णिक यांनी  सुरवातीला ठाणे शहर आणि त्यातील रसिक वाचकांनी या उपक्रमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे  कौतुक  केले. पुढे ते म्हणाले कि शहराचा विकास होतो तो त्यात असलेल्या वाचन संस्कृतीमुळेच विविध उदाहरणातून पटवून देताना ते म्हणाले कि शहराचा विकास हा त्यात असलेल्या उत्तम व्यक्ती  मुळे होत असतो. चांगल्या संस्था आणि उपक्रम त्याला हातभार लावत असतात. कुसुमाग्रजांबद्दल विविध आठवणी त्यांनी सांगितल्या. माणसाची प्रगती हि उत्तम  विचारामुळेच होऊ शकते आणि यात पुस्तके हातभार लावत असतात. महाराष्ट्रामध्ये १०० वर्ष झालेली ग्रंथालय आहेत ज्यामुळे वाचन संस्कृती टिकून आहे. वेगवेगळ्या प्रांतात वाचनामुळे प्रगती झाली आहे आणि ती वाचनामुळे झाली आहे. पुस्तकामुळे बहुजन समाजापर्यंत पोचता येते असे ते नमूद करतात. साहित्याने समाजाचे एकत्रीकरण होऊ शकते आणि पुस्तक त्यासाठीचे एक उत्तम माध्यम आहे.
           आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

  या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अरविंद जोशी यांच्या खुमासदार निवेदनाने अप्रतिम झाले. विविध कॉलेज च्या प्राचार्यांनी आणि रसिकांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वी  केला.


https://soundcloud.com/granthvinayak/swagatgeet

https://soundcloud.com/granthvinayak/swagatgeet-2

https://soundcloud.com/granthvinayak/rashmi-joshi-thane-granth-tumchya-dari-nivedan

https://soundcloud.com/granthvinayak/vinayak-ranade-bhashan

https://soundcloud.com/granthvinayak/satkar

https://soundcloud.com/granthvinayak/pradip-dhaval-bhashan

https://soundcloud.com/granthvinayak/madhumangesh-karnik-bhshan









शनिवार, ६ सप्टेंबर, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा पुणे ७ सप्टेंबर २०१४

ग्रंथ दौरा . . .  पुणे  . .रविवार  ७ सप्टेंबर  २०१४
पुणे ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड . . . २ नव्या ग्रंथ पेट्यांचे वितरण ,
पुण्यातील एकूण ग्रंथ पेट्या आता ७२. . . .योजनेतील सर्वाधिक पेट्या असलेले शहर .

रविवार ७ सप्टेंबर  २०१४

सकाळी  ११ वाजता  - जुनी सांगवी 
जयराज रेसिडेन्सी , फेज १ , प्रियदर्शनी नगर , जुनी सांगवी  , पुणे येथे 
सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या शुभहस्ते तसेच 
पुण्याच्या सुप्रसिद्ध  प्रवचनकार अंजलीताई पूजाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 
दर्जेदार मराठी साहित्याचा खजिना  असलेल्या  ग्रंथ पेटीचे वितरण .

आयोजक -  रामकृष्ण राणे   फ़ोन  ९८ ६० ३९ ९४ ७४ ,  ९७ ६७ ६७ ९४ ७४ 
प्रायोजक  -  जयराज रेसिडेन्सी आणि दिपक कुलकर्णी , डहाणूकर कॉलोनी पुणे . 

सायंकाळी  ५ वाजता  -  सहकार नगर - २
नेवैद्यम रेस्टोरंट , मित्रमंडळ चौक , पर्वती , पुणे येथे 
सुप्रसिद्ध  प्रवचनकार अंजलीताई पूजाधिकारी यांच्या शुभहस्ते
दर्जेदार मराठी साहित्याचा खजिना  असलेल्या  ग्रंथ पेटीचे वितरण .

आयोजक -  सौ . हेमा संदीप बागडे   फ़ोन  ९६ ०४ ३० २७ १४  दीपलक्ष्मि सोसायटी , तुळशीबागवाले , दशभुजा गणपती मंदिर रोड,  सहकार नगर - २ , पुणे 
प्रायोजक  -  सतीश भिडे ,  पुणे .