गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

ग्रंथ तुमच्या दारी २२ ऑक्टोबर २०१६महेंद्र नगर, मालाड पूर्व, मुंबई पश्चिम विभाग येथील प्रथम वर्ष वर्धापनदिन सोहळा -वाचक मनोगत


आले आमुच्या महेंद्रनगरी
केले त्याचे बारसे
नाव ठेवले "महेंद्रनगर वाचक परिवार"
पहिले होते सभासद चार
वर्षाअंती झाले चाळीस
विविध ललितलेख,कथासंग्रह
कादंबऱ्या आल्या आमुच्या संग्रही
सप्ताहातील एक दिवस पडू लागला कमी
खुले राहते वाचनालय आता दोन दिवशी
होतात भेटी गाठी त्या निम्मिताने
होतात पुस्तकावर चर्चा आणि गप्पा
दहीहंडी,नवरात्रीसारखे सण
साजरे होतात इथे
ध्येय हेच एकत्र यावे सर्वानी
गोडी लागावी वाचनाची साऱ्यांना 
स्वप्न बाळगले आहे उराशी
महिंद्रनगर वाचक परिवाराच्या स्वतंत्र पेटीचे
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या शंभर पेट्यांमध्ये
असावा आमुच्या परिवाराचा खारीचा वाटा
चालू आहे त्यासाठी वाचकांची पराकाष्ठा
पहा आपल्याला काही जमते का
शेवटी वाचाल तर वाचाल हो
शिकाल तर टिकलं हो

सौ कुंदा राऊत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा