मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी माहिती

  • ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेचा उगम कसा झाला ? 
 कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री. विनायक रानडे यांनी सुमारे ४वर्षापूर्वी एकच ध्यास घेतला आणि  तो म्हणजे वाचकांना त्यांच्या घराजवळ उत्तम वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्याचा ! आणि त्यातूनच ‘ग्रंथ तुमच्या दारी या योजनेचा उगम झाला.

  • या योजनेचे उद्दीष्ट काय आहे ?
  1. वाचन संस्कृतीचे पुंनरुज्जीवन 
  2. वाचन संस्कृतीचे संवर्धन  करणे
  3. लोकांमध्ये संवाद वाढवणे
  4. टीव्ही, मोबाईल, ईमेल मध्ये अडकत चाललेल्या नव्या पिढीला   वाचनाने दिशा  देणे.
  • या योजनेचे थोडक्यात स्वरूप  काय आहे ?
 या योजनेत  ३५ जणांच्या एका वाचक समूहाने सदिच्छेने काम करण्यासाठी आपल्यातीलच एक समन्वयक (Coordinator)निवडावा.समन्वयकाने पुस्तके वाचण्यासाठी प्रतिष्टानकडे ग्रंथ पेटी मिळण्यासाठी  अर्ज  करावा .  अर्ज  मिळाल्यावर  प्रतिष्टान व  समन्वयक या मध्ये एक करार होऊन वाचक समूहाच्या मागणीवरून   १०० पुस्तके असलेली पेटी प्रतिष्टानतर्फे देण्यात येईल.

  •  प्रतिष्टान   व समन्वयक या मधील कराराची कलमे काय आहेत
            प्रतिष्टान व  समन्वयक  यामधील करार १०० रु. च्या मुदरांक कागदावर  (स्टॅम्पपेपर)वर  केला जातो. या करारात ‘वाचकांना ग्रंथ वाचनासाठी  उपलब्ध करणे त्यांच्याकडून  परत घेणे,ग्रंथ गहाळ झाल्यास अथवा फाटल्यास त्याची छापील किमतीची भरपाई करणे इ. ‘  समन्वकावरील जबाबदारीचा उल्लेख आहे

  •   १०० रु. च्या मुद्रांक  कागदाचा खर्च कोणी करायचा  आहे ?
                १०० रु. च्या  मुद्रांक कागदाचा खर्च प्रतिष्ठान  करते. 

  • या पेटीत फक्त  कुसुमाग्रजांचीच पुस्तके असतात काय ?
          नाही.या पेटीत १०० ग्रंथ / पुस्तके ही कथा,कादंबरी ,नाटक, ललित  लेख,  अनुवादित ,आत्मचरित्र इ. विविध साहित्य  प्रकारची, नवीन व
          जुन्या विविध लेखकांची  असतात .

  • या पेटीतील पुस्तकांची एकूण किंमत किती ?
          सरासरी रु. २०० / - प्रती  पुस्तक या प्रमाणे १०० पुस्तकांची रु. २०,००० /- एवढी किंमत  होते.

  • या ग्रंथ पेटयांसाठी देणगीदार कोण आहेत ?
           सहकारी बँका / पत-पेढ्या,ग्रंथ प्रकाशक  या ग्रंथ पेटयांचे प्रायोजक असून काही वैयक्तिक वाचकांनी स्वताचा वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस एकसष्टी , सहस्र चंद् दर्शन अथवा  आप्तजनांच्या स्मरणार्थ अश्या दिलेल्या देणग्यातून या पेटया निर्माण  झाल्या आहेत.
  • देणगी कुठे  पाठविता येते ?
          देणगीदाराने ‘बँक ऑर्फ बरोडाच्या’ कोणतयाही शाखेत  प्रतिष्टानच्या खाली दिलेल्या खात्यावर  रोख अथवा  चेकने देणगी   रक्कम जमा   करावे  नंतर प्रतिष्टानच्या कार्यालयाला बँकेत भरणा केलेल्या चलनाची झेरॉक्स व स्वतचा पत्ता कळवा .
     पत्ता : कुसुमाग्रज प्रतिष्टान,
    तरण तलावामागे ,टिळकवाडी ,
    नाशिक – ४२२००२,महाराष्ट्र.
    Bank Details :
    Bank Name - Bank of Baroda,
    BRANCH - GOLF CLUB,
    IFSC CODE- BARBOGOLFCL,
    Account no – 17660100009470.
  •  देणगीदाराकडून किती रकमेची देणगी स्विकारली जाते ?
         एका पुस्तकाची किम्मत  रु ५००/- पासून कितीही  जास्त रकमेची देणगी स्वीकारली   जाते.
  •  देणगीदाराचे कोठे नाव  येते काय ?
             एक रकमी रु. २०,००० /- देणगी दाराचे  पेटीवर आतील प्रत्येक  १०० पुस्तकावर नावाचा स्टॅम्प लावण्यात येतो. रु. १०,००० /- चे दोन   देणगीदार असल्यास दोघांची नावे  पेटीवर व आतील प्रत्येक  १०० पुस्तकांवर  दोघांच्या  नावाचा स्टॅम्प लावण्यात येतो . परंतु त्यापेक्षा  कमी देणगीदारांची नावे जागेअभावी  देणे शक्य  नसते.
  •   देणगीदाराला पावती  देण्यात येते काय ? कश्या  प्रकारे ?
                     होय.देणगी जर विभागीय समन्वयकाकडे दिली असेल तर पावती सम्न्वयककडे पाठविली जाते.अथवा  देणगी थेट  खात्यात  भरली  पाठविली असल्यास देणगीदाराला  नाशिक कार्यालयातून  पावती  पाठविण्यात येते.
  • या देणगीला आयकर खात्याची सवलत मिळते काय ?
         होय. ही देणगी ’८० जी’ अंतगात आयकर सवलतीस  पात्र आहे.
  •  ही ग्रंथ पेटी कोठे ठेवता  येते ?
          आपल्या कॉलनीतील / विभागातील नागरीकांना वाचनालय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्या स्वताच्या  जागेत/घरात,सोसायटीच्या कार्यालयात, मंदिरात अथवा अन्य सोयीच्या ठिकाणी  हि  ग्रंथ पेटी वाचनालय सुरू करता येते.
  • ग्रंथ पेटी वाचनालयाची वेळ काय आहे ?
        ग्रंथांची देवाण घेवाण  करण्याचे ठिकाण समन्वयक आणि वाचकांच्या  संमतीने ठरते.
  • ही ग्रंथ पेटी किती कालावधीसाठी  एका वाचक  समूहाकडे ठेवता  येते ?
        ही ग्रंथ पेटी ४ महीने एका वाचक समूहाकडे ठेवता  येते. दर ४ महिन्यानंतर प्रतिष्टानतर्फे ही पेटी दुसरया वाचक समूहाशी अदला-बदली करून ही योजना पुढे सुरू राहते.
  • या वाचनालयास  मासिक वर्गणी आहे काय ?
       मिळालेल्या  देणग्यातून या पेटया निर्माण  झाल्यामुळे वाचकांना मासिक शुल्क न आकारता पुस्तके देणे शक्य  झाले आहे.
  • या वाचनालयात  पुस्तकांसाठी अनामत रक्कम भरणे आवश्यक  आहे काय ?
        नाही.  परंतु वाचनालयातील पुस्तकांच्या सुरक्षेची जबाबदारी विभाग समन्वयकावर   असल्याने, त्याने  सरासरी पुस्तकाच्या किमती एवढे  ( म्हणजे रु. ३०० /- पर्येंत  ) प्रती सभासदाकडून परत र्फेड करण्यायोग्य अनामत रक्कम घेण्यास प्रतिष्ठानची हरकत नाही.

  • एखादे  पुस्तक हरविल्यास काय करावे ?
        विभाग समन्वयकाने पुस्तक हरविणरया  सभासदाकडून पुस्तकाची छापील किंमत  घेऊन ती रक्कम प्रतिष्ठानच्या खात्यावर रोख रक्कम भरावी .तसे कायाालयाला कळवल्यावर  तेच अथवा  दुसरे पुस्तक समन्वयकाला पाठविले जाते.

  • देणगीदार असल्याने तो एखाद्या वाचकाला सभासद होण्यास  विरोध करू शकतो काय ?
नाही.वाचक  जर सभासदत्वासाठी  आवश्यक  बाबींची पूर्तता करत असतील  तर त्याला सभासदत्व  नाकारणे योग्य होणार नाही.
सौजन्य

अशोक काणे 
मालाड समन्वयक (मुंबई -प )

1 टिप्पणी:

  1. अतिशय छान योजना आहे । प्रत्येक व्यक्ति ने ही योजना पुढे आण्णासाठी प्रयत्न करावे।

    उत्तर द्याहटवा