रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

वाचक प्रतिक्रिया


  1. कुसुमाग्रज प्रतिष्ठान,एक उत्तम प्रयत्न! आमच्यासारख्या परप्रांतियांसाठी ही मेजवानीच!नव्या पिढीने याचा फायदा घेतला पाहिजे Keep It Up. R.S.Srova.
  2. ही पेटी म्हणजे लौटरीच!विविध विषयांवरील व लेखकांची पुस्तके दर आठवड्याला वाचताना मजा आली,शिवाय आम्हा मैत्रीणींना एकत्रित पुस्तकांची चर्चा करण्याची संधि मिळाली.कल्पना जोग.
  3. बँकेत नोकरी करत असताना भरपूर वाचन केले,त्यानंतर संसार,मुले यात ला़यब्ररीत जाऊन पुस्तक आणणे जमायचे नाही,आमच्या सोसायटीत ही सोय झाल्याने परत एकदा वाचनाची आवड जोपासता आली,पुस्तके फारच छान आहेत - वृषाली मोरे.
  4. पुस्तक पेटी हाएक अमोल ठेवा आमच्या हाती लागलाय्,कधी न संपणारा ज्ञानाचा आणि साहित्याचा ! मराठी विशेष आवडीने न वाचणारया मला या निमित्ताने द्वारच खुले झाले .विनायक रानडे यांचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल विशेष आभार.शैला फणसे
  5. आम्हा गृहिणींसाठी ही खूपच उत्तम सोयःHarsha kambli
  6. त्यानिमित्ताने वाचनाची आवड उत्पन्न झाली.आभार,ज्योती शिरोडे
  7. मारूती चित्तमपल्ली,सुधा Murty यांची पुस्तके खूप आवडली. रेखा देशपांडे
  8. योजना अतिशय आवडली. सुचित्रा फणसाळकर
  9. घरातल्या लहानथोर सगळ्यांनी वाचन करावे अशी खूप इच्छा होती,पुरे पुस्तक वाचून झाले नाही तरी,भरपूर विचार देणारे साहित्य या निमित्ताने वाचायला मिळाले,सहजपणे उपलब्ध झालेला हा मौलिक ठेवा !४महिन्यात इतकी पुस्तके नक्कीच वाचून होत नाहीत.मनापासून अभिनंदन. सुनंदा घैसास.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा