सोमवार, १६ जून, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी अजित पार्क मालाड मुंबई ग्रंथ पेटी उदघाटन ८ जून २०१४

       अजित पार्क को.ऑप.हौ.सोसायटी ही सोमवार बाजार,मालाड (प) येथील बहुसंख्य मराठी भाषिक असलेली सोसायटी आहे.येथे दरवर्षी १५ ऑगस्ट,२६ जानेवारी,आनंदमेळा (फन-फेअर),सत्यनारयाणाची पूजा,सोसायटीमधील लोकांनी बसविलेले लहान मोठ्यांचे कार्यक्रम उत्साहात साजरे साजरे केले जातात.सोसायटीतील एक उत्साही रहिवासी श्री. सोमनाथ राणे यांच्या अफाट जनसंपर्कामुळे ग्रंथ तुमच्या दारीया संकल्पनेची माहिती मिळाली.असे वाचनालय या विभागात चालविण्यासाठी श्रीमती लोके,सौ. शिरोडकर,सौ.फणसेकर,सौ. राणे यांची समिति बनवून त्यासंबंधीचे पत्रक वाटण्यात आले.या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.लिबर्टी गार्डन,मालाड (प) येथे चालविण्यात येत असलेल्या वाचनालायच्या जागी जाऊन प्रत्यक्ष कार्यपध्दतीची माहिती घेण्यात आली. दोनच दिवसात ग्रंथपेटीच्या देणगी रकमेच्या निम्मी रक्कम पश्चिम विभागाच्या समन्वयकांकडे सुपूर्द करून उर्वरीत रक्कम दिल्यावर अजित पार्क सोसायटीच्या' नावे ग्रंथ पेटी देण्याची विनंती केली. पेटी उपलब्ध असल्याने व सभासदांच्या वाचनाच्या कळकळीमुळे,सर्व रक्कम जमण्याची वाट न पाहता त्यांना पेटी क्र. ४ केंद्र सुरू करण्यासाठी लगेच दिली. 
      या केंद्राचे औपचारीक उद्घाटन एका घरगुती समारंभात दि. ८ जून २०१४ रोजी समन्वयक श्रीमती.दीपा लोके याचे घरी या विभागातील सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. हेमंत बेलसरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.वाचनालयाचे पहिले सभासद व अजित पार्क सोसायटीचे सचिव श्री. खाडये यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. बेलसरे यांचे स्वागत केले.स्वत: डॉ. बेलसरे चिंचोली बंदर,मालाड(प) येथील केंद्राचे समन्वयक असल्याने – अशा केंद्रांची  गरज ,सर्वांगीण प्रगतिसाठी वाचन करण्याचे महत्व आणि आवश्यकता,वाचन का व कसे करावे,तसेच विचारांची देवाण-घेवाण होत असल्याने परस्पर संबंध वाढीस लागून दृढ होत असल्याचे संगितले.तसेच वाचनालय चालविताना घ्यावयाची काळजी याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. वाचनालय सुरू करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांनी समितीतील सभासदांचे कौतुक केले व श्रीमती लोके याना एक पुस्तक देऊन प्रतिकात्मक उद्घाटन केल्याचे जाहीर केले.
      सौ. रेखा शिरोडकर यांनी वाचनालयातर्फे डॉ. बेलसरे यांचे आभार मानले.तसेच पेटी ठेवण्याचे ठिकाण,पुस्तक अदला-बदलीचा दिवस व वेळ तसेच पुस्तक हाताळण्यासंबंधीच्या नियमावलींची माहिती सांगून जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
      श्री. सोमनाथ राणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती लोके,सौ. शिरोडकर,सौ.फणसेकर,सौ. राणे यांनी आपल्या घरातीलच एक कार्य आहे असे समजून वाचनालय सुरू करण्यात सहभाग घेतला त्याचे फलित म्हणजे 'अजित पार्क वाचनालय


ग्रंथ तुमच्या दारी अजित पार्क मालाड मुंबई ग्रंथ पेटी उदघाटन फोटो 


https://www.youtube.com/watch?v=YHNP2AMx_ZI&feature=youtu.be


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा