गुरुवार, २० मार्च, २०१४

‘विश्रामयोग’ को.ऑ.सो., बॉस्को हायस्कूल जवळ - बोरिवली (प) मुंबई ग्रंथ पेटी ग्रंथ पेटी उदघाटन

प्रमुख पाहुणे –        श्री. अशोकजी नायगावकर  , प्रसिध्द कवि
कें द्राचे नाव  - ‘      विश्रामयोग’ को.ऑ.सो., बॉस्को हायस्कूल जवळ  - बोरिवली  (प)
कें द्र समन्वयक  -  श्री. सचीन  मोरे,
        “बोरीवली  (प),बॉस्को हायस्कूल जवळील ‘विश्रामयोग,को. ऑ. सो.च्या प्रांगणात
कुसुमाग्रज प्रतिष्ठान ,नाशिक आणि  ‘गोरेगावकर नागरिक  या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणारया “ग्रंथ तुमच्या दारी” या योजनेच्या ग्रंथ पेटीचे उदघाटन प्रतिष्ठानचे  विश्वस्त श्री.विनायक रानडे व प्रसिद्ध  कवि श्री. अशोकजी नायगावकर  याचे हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास संकुलातील १०० हून जास्त ज्येष्ठ नागरिक आणि महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
       या कार्यक्रमासाठी संकुलातील प्रांगणात एक भव्य मंच उभारण्यात आला होता.मुख्य गेटपासून मंचापर्येंत दुतर्फा नवीन वर्षी पाडव्याला काढतात त्याप्रमाणे सुबक  रांगोळ्या काढल्या होत्या. ग्रंथ पेटी भगव्या कापडात गुंडाळून,युवकांनी पारंपारिक पोशाखात ,पालखी प्रमाणे वाजत-गाजतग्रंथ दिंडी  गेटपासून मंचापर्यंत नेली. तेथे नथ आणि नऊवारी  साड्या नेसलेल्या स्थानिक महिलांनीओवाळून  ग्रंथ पेटीचे औक्षण के ले.
          सुरवातीला  कें द्र समन्वयक  श्री. सचीन  मोरे यांनी, त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘संकल्प’ या संस्थेतर्फे राबवित असलेल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली आणि या योजनेमुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला  जात असल्याचे सांगितले.
        प्रतिष्ठानचे  विश्वस्त श्री.विनायक रानडे यांनी ह्या योजनेची सुरवात आणि  प्रसार कसा झाला  ते सांगितले.तसेच त्या वेळेपर्यंत  ग्रंथ पेट्यांची संख्या ३०० पेक्षा जास्त असून महाराष्ट्राबाहेरही वाढ होत असल्याचे सांगितले .यावेळी  त्यांना आलेल्या विविध अनुभावांचे  कथन करून  नुसती वाचन संस्कृतीच वाढीस लागत नाही तर आजच्या काळात परस्पर संबंध दृढ होण्याचे  अत्यावश्यक असलेले कामही सहजपणे होत असल्याचे सांगितले.
        शेवटी सर्वाना उत्कंठा असलेले  श्री. अशोकजी नायगावकर  यांचे मार्गदर्शनपर भाषण  झाले.तरुणांनी  मराठी भाषा संवर्धन आणि  जोपासना करण्याचे महत्व विशद करून  श्री.विनायक रानडे त्यासाठी तन-मन-धन खर्चून  करीत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.नेहमीच्या नर्मविनोदी भाषेत अनेक किस्से  सांगून,नावात  ‘विश्रामयोग’ असल्याने ‘पुस्तकाचे पान  वाचून झाले आहे तेव्हा   पान उलटून देण्यास माणूस पाठविण्यास सांगू नका’ अशी मिशिकील ही केली.रांगोळ्या, ग्रंथ दिंडी ,पारंपारीक वेशातील महिला ,ओवाळणी आणि औक्षण या सर्वांच्या एकत्र परिणामामुळे  एखादा सण साजरा होत असल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले
        नेहमीप्रमाणे पेटीतील काही पुस्तके श्री.विनायकराव  रानडे आणि  श्री. अशोकजी नायगावकर  याचे हस्ते समन्वयक आणि वाचक  यांना देऊन ग्रंथ पेटीचे प्रतिकात्मक उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा