प्रमुख पाहुणे – श्री. विनायक रानडे
कें द्राचे नाव – रेलनगर निवासी संकुल, डॉन बॉस्को लेन - बोरीवली
कें द्र समन्वयक - श्री. दिलीप फडके
“बोरीवली (प),डॉन बोस्को लेन येथील ‘रेलनगर,को. ऑ. सो. च्या निवासी संकुलात कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक आणि गोरेगावकर नागरिक या संस्थेच्या या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणारया “ग्रंथ तुमच्या दारी” या योजनेच्या ग्रंथ पेटीचे उदघाटन रविवार ,३० जून २०१३, संध्याकाळी ७ वाजता . प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री.विनायक रानडे याचे हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास संकुलातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
श्री. विनायक रानडे यांनी ह्या योजनेची सुरवात आणि प्रसार कसा झाला ते सांगितले .मालेगाव येथे एका हमालने झाडाखाली ठेवलेली ग्रंथ पेटी,ठाण्यातील भावे कुटुंबाने सर्वाना नाश्त्यासह घरात देऊ केलेली सुविधा तसेच औरंगाबाद येथे,घरातील कर्त्या पुरुष्याच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला तेथील वाचक समूहाने केलेल्या मदतीची उदाहरणे सांगून, नुसती वाचन संस्कृतीच वाढीस लागत नाही तर आजच्या काळात परस्पर संबंध दृढ होण्याचे अत्यावाश्यक असलेले कामही सहजपणे होत असल्याचे सांगितले
डॉ. महेश अभ्यंकर यांनी वाचनाची आवश्यकता,ते का आणि क से करावे याबद्दल मार्गदर्शन केले. पेटीतील काही पुस्तके समनवय्क आणि वाचक यांना देऊन ग्रंथ पेटीचे प्रतिकात्मक उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले.
केंद्र समन्वयक श्री. दिलीप फडके यांनी त्या भागात वाचनालयाची जरुरी असून सर्वाना विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींना त्याचा चांगला लाभ होणार असल्याचे सांगितले .रेलनगर संकुलातील अनेक वाचन प्रेमी या घरगुती समारंभास आवर्जून उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा