सोशल नेट वर्किंग साईट चंगल्या का वाईट यावर सतत चर्चा झडत असतात आणि बहुतांश वेळा त्या मुळे होणारे तोटे अथवा त्याच्या वाईट पणावर एकमत होऊन चर्चा थांबतात किवा झुकतात . पण याच माध्यमातून चांगले काय घडू शकते . याचा हा किस्सा .
सप्टेंबर २०१२ च्या सुमारास एक दिवस फेसबुक चालत असताना नवी दिल्लीत २ वर्षापासून वास्तव्याला असणाऱ्या प्रफुल्ल पाठक यांना विनायक रानडे नावाच्या एका व्यक्तीच्या प्रोफाईल मध्ये वाचन संस्कृती वाढावी या साठी ते करत असलेल्या एका उपक्रमाची माहिती दिसली . वाचनाची आवड असणारे त्याकडे साहजिकच आत्कृष्ट होणार , हि माहिती म्हणजे कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक ची आता फोफावलेली "ग्रंथ तुमच्या दारी " चळवळीची माहिती होती . त्यांनी विनायक ला पोस्ट टाकली आणि आपली [पत्नी सौ क्षमा पाठक यांना सांगितले . "मुले मोठी झालीत , फावला वेळ असतो . एखादे छान कार्य करावे . ज्यात खूप गुंतायचे नाही पण छान वेळ पण गेला पाहिजे . आवड हि जोपासल्या गेली पाहिजे , असे त्य मला काही दिवसापूर्वी म्हणाली होतीस न . मग ऐक एक नवी संकल्पना . तुला वाचनाची आवड आहे , आपण पुस्तके विकत घेऊ अन वाचू असे तू म्हणाली होतीस न . अन मागच्या प्रदर्शांतून आपण आपल्या 'बजेट' मध्ये काही पुस्तके आणून खाजगी , अन छोटी लायब्ररी बनवायचा विचार केला होता न . तसेच एक मोठ्या प्रमाणावर उपक्रम "कुसुमाग्रज प्रतिष्ठान ' सारखी आदरणीय संस्था विनायक रानडे यांच्या माध्यमातून करतेय . आपल्याला यातून "आर्थिक ' लाभ काही होणार नाही पण एका आपल्या मनातल्या बीजाचे कुठेयारी वाढणारया वृक्षाला मदत करता येईल . मोठे व्हायला . शिवाय आपले राहण्याचे ठिकाण दिल्लीच्या मध्यावर आहे . त्यामुळे आपण समन्वयक म्हणून या उपक्रमाला जोडून घेतले तर. त्यला हवे तसे घर बसल्या कार्य मिळेल . वाचनाची आवड आपली पण भागेल . शिवाय ३ लाखाच्या संख्येत दिल्लीत राहणाऱ्या आपल्या मराठी मंडळींपैकी काही हजारांना वाचनाची आवड नक्की असेल . त्यांना महाराष्ट्रात गेल्यावर आठवणीने मराठी पुस्तके आणा किंवा कोणाच्या हाती मागवा . या पेक्षा इथेच मराठी पुस्तकाचे भांडार उपलब्ध होईल . शिवाय त्या त्या भागात राहणाऱ्या अन एकमेकांना न ओळखणाऱ्या मराठी कुटुंबाना एकत्र आणण्याचे कार्य हा उपक्रम नक्कीच मदत करेल . २००० घरामागे एखादा मराठी वाचक या निमित्ताने एकमेकाला भेटेल . अन या परमुलुखात कोणीतरी आपले , आपल्या आवडीशी जवळीक असणारे एकमेकांना भेटतील . शिवाय असे काहीतरी घडावे , व्हावे , असावे असे वाटणारे शेकड्यांनी अन हजारोनी असतात पण " हो आम्ही पुढाकार , शारीरिक अन आर्थिक भार उचलू म्हणणारे बोटावर मोजण्या इतके असतात . आपल्या नशिबाने अन परमेश्वर कृपेने आपण पुढाकार घेऊ शकतो अन एक चांगले कार्य आपल्या हाताने पार पडू शकते . तू तयार असलीस तर मी तुझ्या पाठीशी आहे . विचार करून संग मला . ' हा संवाद संपला तो आपण या चळवळ दिल्लीत रुजुवयाची या निर्णयाने .
विनायक रानडे यांना आमची तयारी असल्याची माहिती दिली अन पुढे काय विचारले . कमीत कमी दहा ग्रंथ पेट्या अन त्या साठी लागणारे पैसे जमवणे हि त्यांची अट त्यांनी सांगितली . आता कसे . कोण आर्थिक मदत करेल याचा तक्ता मांडला . ओढून ताणून होतील असे जाणवले . अचानक सार्वजनिक उत्सव समिती दिल्लीचे सर्वेसर्वा श्री रा मो हेजीब म्हणजे आमचे हेजीब काका यांना सांगावे असे ठरले . अशा सर्व उपक्रमात "आर्थिक संपन्नेते बरोबर मनाची संपन्नता असणारा , मराठीचा झेंडा घेऊन ७० व्या वर्षी पण दिल्लीत व्यस्त असणारा तरुण म्हणता येईल . असे व्यक्रिमत्व. त्यांनी विश्वास दाखवले अन उलट तपासणी घेतली . नेहमीप्रमाणे अन सवयीप्रमाणे . पण गेल्या २-३ वर्षापासून त्यांच्या उपक्रमात सहभागी होत असा;यामुळे वेळप्रसंगी येईल ती जबाबदारी पेलवत असल्यामुळे त्यांना विश्वास होता . शिवाय चांगले घडायचे असले कि कसे सगळे जुळून येते म्हणतात तसे "नेमका त्यांचा २ महिन्यानंतर नाशिक दौरा होता " तेव्हा सर्व याची डोळा पाहून अन विनायकाला भेटून नक्की करू असे ठरले . दोन महिन्यानंतर त्यांचा नाशिक येथून फोन आला . आपण ग्रंथतुमच्या दरी चळवळ नवी दिल्लीत आणतोय . सार्वजनिक उत्सव समिती सर्व आर्थिक भार उचलेल . सौ क्षमापाठक दिल्लीच्या समन्वयक " होतील अन हा उपक्रम पुढे नेतील . १ मी २०१३ रोजी दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या महाराष्ट्र दिन उपक्रमात आपण हि चळवळ दिल्लीत उद्घातीत करू . विनायक रानडे त्या दिवशी दिल्लीत येतील आपण त्यांच्या उपस्थितीत पहिले पाऊल /पेटी घेऊ .
पुन्हा काही अडचणी उभ्या राहिल्या त्यावर उपाय करून १ मी २०१३ ला "ग्रंथतुमच्या दारी " ची दिल्लीत सुरुवात झाली . याच कार्यक्रमात श्री व्ही एस सिरपूरकर , श्री वीरेंद्र उपाध्ये अन श्री शिरीष अन सौ आरती कुलकर्णी यांनी या उपक्रमाला स्वतातर्फे अनुदान देऊन आपले आर्थिक बळ दिले. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सौ निवेदिता वैश्यपायन यांच्या माध्यमातून गुडगाव येथे वास्तव्याला असणारे अन मुळचे कोल्हापूरचे श्र मंदार कुलकर्णी यांनी पहिली "ग्रंथ पेटी ; गुडगाव येथे नेली . गुडगाव गणेश मंडळाचे निमित्ताने तेथे एक तरुण मराठी गट आहे या सर्वाना या पेटीमुळे खूप सोय झाली . मराठी पुस्तक वाचनाची सोय झाली . शिवाय नवे मैत्र सुरु झाले . द्वारका येथे राहणारे श्री उदय कुलकर्णी यांची पण इच्छा होती . त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या सौ देशपांडे यांनी एक पेटी तिथे नेउन सर्वाना हि सोय उपलब्ध करून दिली . त्या भागातले इतर मराठी मंडळी सोबत जोडल्या गेली . पुढे एक पेटी सौ आरती अन श्र शिरीष कुलकर्णी , श्री शिरपूरकर अन श्रीकांत करजगावकर अन ……. यांच्याकडे पोहोचली . वाचन संस्र्कृती फक्त एका विशिष्ट वयापुरती उरली आहे हि बाब खोटी ठरली . सर्व वयाची मंडळी आज या उपक्रमाचा फायदा घेत आहेत . पुस्तक चांगले कोणते , कुठे मिळेल , त्याचे अंतर किती , त्यासाठी पैसे किती खर्च करावे लागतील , आपले बजेट आहे का ? असे सर्व प्रश्न एका पेटीत संपले . अन नवीन मराठी वाचक समूह या निमित्ताने एकत्र यायला लागले आहे. दिल्लीत हा उपक्रम आणण्याचे विचार करत असताना "मराठी जणांना एकत्र येता येईल . हा उद्देश सफल होतोय . ते बीज आता रोपट्या मध्ये परावर्तीत होते आहे हे दिसायला लागते . एका वर्षात दिसणारा बदल आश्वासक अन सुखावणारा आहे . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा