शोधयात्रा - लेखक श्री विदुर महाजन, पुणे .
मराठी नव वर्ष आरंभ होताना पेटीतील एक उत्तम पुस्तक हातात पडले. भ्रष्टाचार व अन्याय स्वतः वर वा समाजातील इतरावर होत असताना लेखकाने त्याचा पुढे होऊन विरोध करणे मनाला फारच भिडते.
प्रत्येक प्रसंगात आपण इतके एकरूप होऊन जातो, असे अनेक विदुरजी तयार होणे हि समाजाची गरज आहे , मुख्य म्हणजे लेखक स्वतः उत्तम कलाकार, उत्तम सतार वादक आहेत . झाडे लावण्याची आवड आहे त्यांना, पण त्या मागचा त्यांचा एक उदात्त हेतू पण खूप महत्वाचा आहे .आपण वापरत असलेला प्राणवायू पण त्या निमित्ताने वसुंधरेला परत करणे.
पुस्तकावर त्यांचा फोन नंबर असल्याने त्यांच्याशी संपर्क साधता आला , नविन अनोळखी नंबर त्यांनी उचलला आणि पुस्तकात पानोपानी प्रत्ययास येत असलेल्या आत्मीयतेशी ओळख घट्ट झाली .
हा उपक्रम वाचकाला वाचनासाठी उत्तम उत्तम पुस्तकेच उपलब्ध करतो असे नाही तर आज पर्यंत उपलब्ध न झाल्येल्या असंख्य पुस्तकांसोबतच लेखक व वाचक यांच्यात पण संवाद घडवून आणतो अशी प्रचीती आली
सुषमा पांडे - तात्या टोपे नगर जोग हाउस नागपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा