मंगळवार, २० मे, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी मुळे गुरु भेट



     मी ग्रंथ तुमच्या दारीची एक समन्वयक. मी नेहमी पेटीतील पुस्तके माझ्या ऑफिसमध्ये माझ्या सहकारयाना   वाचायला  घेऊन जाते. त्या दिवशी एका मैत्रिणीने मागीतले म्हणून अभिमन्यू पत्नी उत्तरा -सुधाकर शुक्ला  यांचे पुस्तक घेऊन गेले. पण तिला देण्याआधी मी ते पुस्तक वाचयचे ठरवले थोडा स्वार्थी होता विचार पण कधीतरी चालते ना असे तसेच हे. तसे हि मला ऐतिहासिक वाचायला आवडते.

      पुस्तक हातात घेतले आणि सहज शेवटचे पान  उघडून बघितले तर लेखकाचा फोटो आणि माहिती होती.  तो फोटो बघून  स्वतःशी म्हणाले अरे हे तर शुक्ला सर. पण तेच हे कि आणखी कोणी असे एकदा वाटून गेले. सगळ्यात शेवटी माहिती दिली होती " प्रिन्सेस पद्मराजे गर्ल्स हाय स्कूल मधून निवृत्ती " मग तर माझी खात्रीच पटली कि हे तर आपले मराठीचे शुक्ला सर. त्या माहिती मध्ये घरचा नंबर हि दिला होता.
     मनात विचार आला कि फोन करून बघावा. थोडी भीती वाटत होती पण फोन लावला आणि सर आहेत का ते विचारले पण सर बाहेर गेले होते. संध्याकाळ पर्येंत मी शाळेच्या विचारात होते. मराठीचा तास चालू होता आणि सर शिकवत होते मन भूतकाळात रमून गेले होते. सगळ्या आठवणी समोर दिसू लागल्या होत्या. शुक्ला सर आणि त्यांनी शिकवलेल्या आर्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
      ऑफिस संपल्यावर संध्याकाळी परत सरांना  फोन केला मी. सर आले फोनवर त्यांचे वय आता ८० वर्ष  आहे. मला खरेच शब्द सुचत नव्हते. काय बोलू कळत  नव्हते. इतक्या वर्षांनी आपण आपल्या मराठी च्या सरांशी बोलू याची मला कल्पनाच नव्हती पण ते खरे झाले होते.
       बराच वेळ बोललो आम्ही सर सांगत होते त्यांनी काय काय लिहिले ते. मग म्हणाले  कि पुण्याला आलीस कि ये घरी नक्की. माझ्या घरच्यांची विचारपूस केली. बोलता बोलता माझ्या डोळ्यात पाणी कधी आले कळलेच नाही. मी किती जणांना सांगत सुटले कि मी माझ्या सरांशी बोलले म्हणून खूप आनंद झाला .ग्रंथ तुमच्या दारी  च्या योजनेमुळे सरांशी बोलण्याचे भाग्य मला लाभले.

रसिका  गुळवणी 

समन्वयक 

नवी मुंबई खारघर 










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा