बुधवार, ७ मे, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी प्रतिक्रिया बेळगाव

ग्रंथ तुमच्या दारी 
कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे विनासायास विनामोबदला ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम गावो-गावी आणि म्हणूनच घरो-घरी नेणारे विश्वस्थ आणि एक ग्रन्थ-प्रेमी तथा एक समर्पित कार्यकर्ते हे बेळगावला येत अहेत हे वाचून खूप-खूप - आनंद झाला . लोकमान्य तर्फे अनेक साहित्यिकांना भेटण्याची संधी बेळगावात मिळत असते तेंव्हा श्री विनायक रानडे ना भेटणे आणि त्यांची ग्रंथ तुमच्या दारी ही योजना समजून घेणे आणि तिला शक्य होईल तेवढा सकारात्मक प्रतिसाद एवं सहयोग देणे हे बेळगावातील मराठी -प्रेमी संस्थांनी जरूर कराव . बेळगावच्या परिसरात अनेक मराठी साहित्य सम्मेलने होत असतात त्यांच्या संस्थांनी ही योजना जरूर राबवावी 
.Facebook वरून मला या योजनेची एक वर्षा पूर्वी माहिती मिळाली आणि श्री विनायक रानडे हे ज्या समर्पित भावनेने प्रवास करीत असतात आणि ही योजना हा उपक्रम गावो-गावी नेत असतात तो तडाखा ती तडफ पाहून मी त्यांच्याशी संपर्क साधला .ते या उपक्रमाविषयी भर-भरून बोलले तेंव्हा कळून चुकल की या माणसात ग्रन्थ आणि ते सर्व दुर जावे या साठी किती तळमळ आहे . 
श्रीविनायक रानडे हे आता माझे इंटरनेट वरून झालेले एक मित्र आहेत अस मी अगदी अभिमानानी म्हणू शकतो . त्यांच्या या उपक्रमाला मी tv च्या भाषेत DTH सेवा अस म्हणेन म्हणजेच direct to home (but free ). कर्नाटकात असलेल्या वेग-वेगळ्या मराठी संस्थाना आणि मराठी मंडळानीही ही योजना हा उपक्रम राबवावा यासाठी धारवाड ,हुबळी ,गुलबर्गा ,मंगळूरू (मी मंगळूरू मराठी मंडळाचा संस्थापक सदस्य आहे ),बेगलुरू या व अशा अनेक ठिकाणी त्यांचा जाण्याचा मानस आहे या त्यांच्या कार्यात हि आपण बेळगावकरांनी मदत करायला हवी अस मला वाटत . श्री विनायक रानडेजीच आणि त्यांच्या उपक्रमाच स्वागत आणि मनापसून शुभेछा … 

क़िशोर मधुकर काकडे -मंगळूरकरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा