ग्रंथ तुमच्या दारी” योजनेचे ज्ञानवर्धिनी विद्यालयात जोरदार स्वागत
कांदिवली (प.) यथील ज्ञानवर्धिनी विद्यालयात कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक व गोरेगावकर नागरिक यांचे संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या “ग्रंथ तुमच्या दारी” या योजनेचे जोरदार स्वागत करण्यात आले .ज्ञानवर्धिनी विद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नांनी “ग्रंथ तुमच्या दारी” यांच्या ३४ व्या पेटीच्या उद्घाटन निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिलेले पश्चिम मुंबई विभागाचे मुख्यसमन्वयक मा.डॉ.महेश अभ्यंकर यांनी आपल्या अमृततुल्य वाणीने विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले. याप्रसंगी श्री अशोक काणे, श्री. तळपाडे सर, माजी विद्यार्थी संघटनेची पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे छानसे सुत्रसंचलन माजी विद्यार्थी प्रीतम धुमाळ याने केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा