सोमवार, १० नोव्हेंबर, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी लोकसत्ता ६ जुलै २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दुबई - टाईम्स ऑफ इंडिया २० जून २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दुबई २४ जुन २०१४ लोकमत वर्तमानपत्र
ग्रंथ तुमच्या दारी दौरा २३ नोव्हेंबर २०१४

बेंगलोर येथील मराठी वाचकांसाठी 
ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ 

रविवार २३ नोव्हेंबर २०१४ रोजी 
संध्याकाळी ४.३० वाजता 

प्रथितयश लेखिका सानिया यांच्या शुभहस्ते 

क्लब हाउस हॉल , श्रीराम सहना , 
BMSIT कॉलेज समोर ,
दोड्डाबल्लपुर रोड , 
येलहंका , बेंगलोर - ६४ येथे . 

बेंगलोर येथील सावनी आपटे या साठी समन्वयक म्हणून पुढाकार घेत आहेत . 
बेंगलोर येथील इच्छुक वाचकांनी सहभागासाठी शुभारंभास अवश्य उपस्थित राहावे, 
आपल्या परिचित बेंगलोर येथील वाचकांना माहिती देवून 
योजना विस्तारास सहकार्य करावे हि विनंती . 

सावनी आपटे ९८ ८० ५० २० ७७ 
Savani Apte 98 80 50 20 77 savani.apte24@gmail.com
समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी , बेंगलोर 

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०१४

माझे ग्रंथालय पुणे शुभारंभ ५ नोव्हेंबर २०१४बुधवार ५ नोव्हेंबर २०१४ रोजी सायंकाळी ६:३० ते ७:३० 
विष्णूजी कि रसोई 
म्हात्रे पुलाजवळ सिद्धी गार्डनच्या पुढे पुणे - ५२ येथे . 
योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्या वाचक मित्रांबरोबर सहभागी व्हा . 

दिवाळी, वाढदिवस निमित्त माझे ग्रंथालय ( ग्रंथ पेटी ) आपल्या आवडत्या वाचकास भेट  म्हणून द्या .

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : 

विनय जोगळेकर , समन्वयक , माझ ग्रंथालय , पुणे  विभाग . 
९३ ७० २६ ०० ५२ , ९४ २२ ४४ ९८ ८७  vinayjoglekar11@gmail.com

ग्रंथ तुमच्या दारी दौरा पुणे ४ - ५ नोव्हेंबर २०१४


पुणे येथे ग्रंथ पेट्यांचे वितरण दौरा ४ व ५ नोव्हेंबर 
पेटी क्रमांक ७५ ते ८० एकूण ६ पेट्या . . . . 
ग्रंथ तुमच्या दारी योजनेत पुण्यात आता ८० ग्रंथ पेट्या . 

मंगळवार  ४ नोव्हेंबर  ३:३० वाजता 
रक्षक नगर ओल्ड बी ४०१ राडीषण हॉटेल मागे खराडी पुणे  
आयोजक :-  रावसाहेब खेडकर ९४२२०२९४२१ 

मंगळवार  ४ नोव्हेंबर  ६  वाजता 
सी - ७०१ शिंदे पार्क हौसिंग सोसायटी  शिवणे पुणे 
आयोजक :-  श्रीराम गजानन कुलकर्णी ९६८९७९०१०५

मंगळवार  ४ नोव्हेंबर  ७:३० वाजता 
सर्वे न. ११ ग्रीन पार्क सोसायटी प्लॉट न. ९ हरीस्मित बंगला 
ऑफ सनसिटी रस्ता  पुणे 
आयोजक :-  संजय थिटे  9423561236 

बुधवार  ५ नोव्हेंबर  ४ वाजता 
रास नगर पिरंगुट पोलीस चोकी जवळ पौड रस्ता पिरंगुट 
आयोजक :- अमोल पाठक ९२२५५४४९८१  


नेदरलॅंडमध्ये फडकणार मराठी ग्रंथसंपदेचा झेंडा

नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानने वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी सुरू केलेला "ग्रंथ तुमच्या दारी‘ उपक्रम महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, सिल्व्हासा मार्गे दुबई, ओमान, बहारिनमध्ये पोचलायं. हाच उपक्रम आता पुढचं पाऊल टाकत असून कथा, कादंबरी, विनोदी, रहस्य, व्यक्तिचरित्र, अनुवादित असे विविध प्रकारचे साहित्य प्रकार नेदरलॅंडमध्ये पोचणार आहेत. त्यासाठी नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने पुढाकार घेतलाय.
मुंबईमधील गौरी आणि विनय कुलकर्णी हे नेदरलॅंडमध्ये स्थायिक झाले आहेत. या दाम्पत्याने मराठी माणसांसाठी आपल्या आवडत्या साहित्यिकांची ग्रंथसंपदा उपलब्ध व्हावी, अशी विनंती प्रतिष्ठानच्या वाचनालय समितीचे अध्यक्ष विनायक रानडे यांना केली. त्यानुसार प्रत्येकी 25 ग्रंथसंपदेच्या 12 पेट्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रानडे हे नेदरलॅंडमध्ये पोचवणार आहेत. त्यातील आठ पेट्या नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने प्रायोजित केल्या आहेत, तर चार पेट्यांची भेट नाशिकमधील उद्योजक श्रीरंग सारडा यांच्या देणगीतून दिल्या जाणार आहेत. उपक्रमाची मुहूर्तमेढ 2009 मध्ये 11 पेट्यांनी नाशिकमध्ये रोवली गेली. आतापर्यंत वाचन संस्कृतीची हीच चळवळ 521 पेट्यांपर्यंत पोचली असून ग्रंथसंपदा सव्वाकोटी रुपयांची झाली आहे. महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी विविध महाराष्ट्र मंडळे हा प्रकल्प राबवत आहेत. त्यात मात्र नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने वाचन संस्कृतीला बळकटी देणारा उपक्रम राबवण्याचे ठरवले, असे सांगून रानडे म्हणाले, की नेदरलॅंडमध्ये सुरू होणारी ही वाचन संस्कृतीची चळवळ युरोपभर विस्तारित होणार आहे.

बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा - जुन्नर, पुणे , कोल्हापूर , बेळगाव , गोवा १८ ते २१ सप्टेंबर २०१४

ग्रंथ दौरा . . जुन्नर, पुणे , कोल्हापूर , बेळगाव , गोवा  . .
१८ ते २१ सप्टेंबर  २०१४

गुरवार १८ सप्टेंबर सकाळी ९.३० वाजता 
जिल्हा परिषद शाळा , सुपातेवाडी , जुन्नर, पुणे . 
येथे दोन शाळांना लहान मुलांच्या ग्रंथ पेट्याचे वितरण 
आयोजक - धनंजय राजूरकर  ९४२३० ३८८८६

दुपारी पुण्यातील मान्यवरांच्या भेटीगाठी 

शुक्रवार  १९ सप्टेंबर  २०१४ पुणे 

दुपारी   २:३० वाजता  - कर्वेनगर पेटी क्रमांक ७०
दानेश्वरी बंगला, अजिंक्य नगरी 
कर्वेनगर, दत्तमंदिरा जवळ 

आयोजक -  रोहिणी लिगाडे संपर्क ०२०-२५४ २२६७६
प्रायोजक  -  प्रतिभा बिवलकर  पुणे . 

सायंकाळी  ४ : ३० वाजता  सिंहगड रस्ता पेटी क्रमांक ७३ 
निर्मल टाउनशिप, १२ ब ४ बिल्डींग, तिसरा मजला सारस्वत बँके जवळ सनसीटी रस्ता येथे. 
सुप्रसिद्ध  लेखक डॉ राजेन्द्र खेर  यांच्या शुभहस्ते ग्रंथ पेटीचे वितरण .

आयोजक -  श्री विनय जोगळेकर    फ़ोन  ९३७ ०२६ ००५२  
प्रायोजक  -  श्री नेने  ,  अमेरिका  . 

सायंकाळी  ६ : ३० वाजता  हडपसर रस्ता पेटी क्रमांक ७४
ट्रक़्विलिटी फेज  २ कोद्रे नगर शेवाळेवाडी  
ऑफ पुणे - सोलापूर रोड हडपसर पुणे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .

आयोजक -  श्री राजेंद्र शेवाळे    फ़ोन  ९८२२०७३७६२  
प्रायोजक  -  निर्मल टाउनशिप आणि ग्रंथप्रेमी  

शनिवार २० सप्टेंबर ११ वाजता  कोल्हापूर येथे मान्यवरांच्या भेटी व ग्रंथ पेटीचे वितरण.  

संध्याकाळी ६ वाजता बेळगाव ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ . . 
मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभ हस्ते ९ पेट्यांचे वितरण . 
लोकमान्य ग्रंथालय , टिळकवाडी , खानापूर रोड , बेळगाव येथे  . 

रविवार २१ सप्टेंबर १० वाजता मडगाव , गोवा येथे 
ग्रंथ तुमच्या दारी योजना सुरु करण्यासाठी माहिती व नाव नोंदणी साठी बैठक . 
गोमान्त विद्या निकेतन , फ़ोमन्तो थिएटर मडगाव , गोवा . 
आयोजक - दत्ता नायक  ९८ २२ १० २४ १६ 

सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

माझं ग्रंथालय योजनेचा शुभारंभ उद्घाटन सोहळा ३१ ऑगस्ट २०१४ आनंद विश्व गुरुकुल ठाणे

माझं ग्रंथालय

माझं ग्रंथालय  या योजनेचा शुभारंभ उद्घाटन सोहळा ३१ ऑगस्ट रोजी ठाणे येथे आनंद विश्व गुरुकुल विद्यालयात सम्पन्न्न झाला.

       कार्यक्रमाची सुरवात क्षण एक तरी तू येशील का या स्वागतगीताने  झाली. त्यानंतर  देवहीन ज्योती परी हे गीत सादर  झाले. स्वागत गीतानंतर मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले.त्यानंतर रश्मी जोशी (ठाणे विभाग मुख्य समन्वयक ) यांनी ठाणे विभागातील उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांचे स्वागत करून ठाणे विभागातील ग्रंथ तुमच्या दारी या योजनेची  ठाणे विभागातील सुरवात आणि त्याचा झालेला विस्तार याबद्दल माहिती  दिली. त्यानंतर अरविंद जोशी यांनी विनायक रानडे यांना माझं ग्रंथालय या योजनेची माहिती देण्याची विनंती केली.
       विनायक रानडे (विश्वस्त कुसुमाग्रज प्रतिष्ठान )यांनी आपल्या भाषणात ग्रंथ तुमच्या दारी या योजनेची सुरवात   वाढदिवसानिम्मित एका पुस्तकाचे पैसेदेणगी स्वरुपात द्यावे  यातून झाली असे नमूद करून  या योजनेची सविस्तर माहिती त्यांनी दिली. माझं ग्रंथालय हि योजना विशेषतः अतिशय व्यस्त वाचक जसे कि डॉक्टर, इंजिनीअर यासारखे वाचक ज्यांना वेळ आहे पैसे असून एकदा पुस्तक वाचण्यासाठी पुस्तक घ्यावे का यासाठी हि योजना आहे असे त्यांनी नमूद केले.ग्रंथ तुमच्या दारी हि योजना आता भारताशिवाय दुबई , नेदरलंड, टोकियो याठिकाणी विस्तार होत आहे.  या योजनेतून जास्तीत जास्त वाचकांपर्येंत पोचावी हीच सदिच्छा त्यांनी यात व्यक्त केली. त्यांच्या असंख्य निरपेक्ष मित्र सहकारी आणि देणगीदार यामुळे हि योजना पुढे नेऊ शकत आहोत हे व्यक्त करून त्यांचे त्यांनी आभार मानले. विनायक रानडे यांच्या भाषणानंतर विविध मान्यवरांचा सत्कार झाला. त्यात अनंत रानडे , विनायक रानडे, रश्मी जोशी,पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांचा सत्कार झाला.
     प्रदीप ढवळ (आनंद विश्व गुरुकुल विद्यालययांनी मनोगत व्यक्त करताना मधुमंगेश कर्णिक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या मार्गदर्शनाने हे काम अजून वृद्धिंगत व्हावे असे नमूद केले. वाचन माणसाला कसे समृद्ध करते हे नमूद करताना एका आदिवासी मुलाचे उदाहरण देताना ते म्हणाले कि आई वडील शिकलेले नसून हि त्या मुलाने उत्तम मार्क मिळवले जेव्हा त्या मुलाला याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणला कि एक होता कार्वर या पुस्तकामुळे तो उत्तम अभ्यास करण्यास प्रवृत्त झाला. हे नमूद करून ते म्हणले कि आनंद विश्व गुरुकुल मध्ये जास्तीत जास्त वाचक निर्माण करण्याचा  आम्ही प्रयत्न करू  असे आश्वासन त्यांनी दिले
    मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते माझं  ग्रंथालय या योजनेची पहिली पेटी रश्मी आणि अरविंद जोशी यांना देऊन माझं ग्रंथालय या योजनेचे उद्घाटन  झाले.त्यानंतर   ग्रंथ तुमच्या दारी या योजनेच्या ४ पेट्या आणि माझं ग्रंथालय च्या २० पेट्यांचे  वितरण झाले.
    शीलाताई मराठे यांनी माझं ग्रंथालय आणि त्याबद्दलचे आपले विचार व्यक्त केले. आणि हा उपक्रम उतरोत्तर वृद्धिंगत होवो या शुभेछा  त्यांनी दिल्या.
    मेधा मेहंदळे (आनंद विश्व गुरुकुल विद्यालय )यांनी या भाषणात आपल्या संस्थेबद्दल नमूद करून वाचन आणि त्यामुळे होणारे संस्कार याचे महत्व विशद केले. आणि मधुमंगेश कर्णिक यांच्या उत्साहाचे त्याने कौतुक केले . यानंतर आमदार  संजय केळकर यांनी वाचनाचे महत्व विशद करून या उपक्रमाबद्दल कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांचे आभार मानले. या प्रसंगानिम्मित आपले विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी प्रदीप ढवळ यांचे आभार मानले आणि ठाणेकर हे उत्तम उपक्रम राबवण्यात नेहमीच उत्तम प्रतिसाद देतात असे नमूद करून ते म्हणाले कि ठाणे हि आता महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीच झाली आहे. त्यामुळे या योजनेला ठाण्यात उत्तम प्रतिसाद नक्की मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मधुमंगेश कर्णिक यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करावे असे व्यक्त करून भाषणाचा समारोप त्यांनी केला.
 त्यानंतर या कार्यक्रमाचे  आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान चे   अध्यक्ष पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी आपले विचार मांडावेत अशी विनंती  अरविंद जोशी यांनी केली
     मधुमंगेश कर्णिक यांनी  सुरवातीला ठाणे शहर आणि त्यातील रसिक वाचकांनी या उपक्रमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे  कौतुक  केले. पुढे ते म्हणाले कि शहराचा विकास होतो तो त्यात असलेल्या वाचन संस्कृतीमुळेच विविध उदाहरणातून पटवून देताना ते म्हणाले कि शहराचा विकास हा त्यात असलेल्या उत्तम व्यक्ती  मुळे होत असतो. चांगल्या संस्था आणि उपक्रम त्याला हातभार लावत असतात. कुसुमाग्रजांबद्दल विविध आठवणी त्यांनी सांगितल्या. माणसाची प्रगती हि उत्तम  विचारामुळेच होऊ शकते आणि यात पुस्तके हातभार लावत असतात. महाराष्ट्रामध्ये १०० वर्ष झालेली ग्रंथालय आहेत ज्यामुळे वाचन संस्कृती टिकून आहे. वेगवेगळ्या प्रांतात वाचनामुळे प्रगती झाली आहे आणि ती वाचनामुळे झाली आहे. पुस्तकामुळे बहुजन समाजापर्यंत पोचता येते असे ते नमूद करतात. साहित्याने समाजाचे एकत्रीकरण होऊ शकते आणि पुस्तक त्यासाठीचे एक उत्तम माध्यम आहे.
           आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

  या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अरविंद जोशी यांच्या खुमासदार निवेदनाने अप्रतिम झाले. विविध कॉलेज च्या प्राचार्यांनी आणि रसिकांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वी  केला.


https://soundcloud.com/granthvinayak/swagatgeet

https://soundcloud.com/granthvinayak/swagatgeet-2

https://soundcloud.com/granthvinayak/rashmi-joshi-thane-granth-tumchya-dari-nivedan

https://soundcloud.com/granthvinayak/vinayak-ranade-bhashan

https://soundcloud.com/granthvinayak/satkar

https://soundcloud.com/granthvinayak/pradip-dhaval-bhashan

https://soundcloud.com/granthvinayak/madhumangesh-karnik-bhshan

शनिवार, ६ सप्टेंबर, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा पुणे ७ सप्टेंबर २०१४

ग्रंथ दौरा . . .  पुणे  . .रविवार  ७ सप्टेंबर  २०१४
पुणे ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड . . . २ नव्या ग्रंथ पेट्यांचे वितरण ,
पुण्यातील एकूण ग्रंथ पेट्या आता ७२. . . .योजनेतील सर्वाधिक पेट्या असलेले शहर .

रविवार ७ सप्टेंबर  २०१४

सकाळी  ११ वाजता  - जुनी सांगवी 
जयराज रेसिडेन्सी , फेज १ , प्रियदर्शनी नगर , जुनी सांगवी  , पुणे येथे 
सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या शुभहस्ते तसेच 
पुण्याच्या सुप्रसिद्ध  प्रवचनकार अंजलीताई पूजाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 
दर्जेदार मराठी साहित्याचा खजिना  असलेल्या  ग्रंथ पेटीचे वितरण .

आयोजक -  रामकृष्ण राणे   फ़ोन  ९८ ६० ३९ ९४ ७४ ,  ९७ ६७ ६७ ९४ ७४ 
प्रायोजक  -  जयराज रेसिडेन्सी आणि दिपक कुलकर्णी , डहाणूकर कॉलोनी पुणे . 

सायंकाळी  ५ वाजता  -  सहकार नगर - २
नेवैद्यम रेस्टोरंट , मित्रमंडळ चौक , पर्वती , पुणे येथे 
सुप्रसिद्ध  प्रवचनकार अंजलीताई पूजाधिकारी यांच्या शुभहस्ते
दर्जेदार मराठी साहित्याचा खजिना  असलेल्या  ग्रंथ पेटीचे वितरण .

आयोजक -  सौ . हेमा संदीप बागडे   फ़ोन  ९६ ०४ ३० २७ १४  दीपलक्ष्मि सोसायटी , तुळशीबागवाले , दशभुजा गणपती मंदिर रोड,  सहकार नगर - २ , पुणे 
प्रायोजक  -  सतीश भिडे ,  पुणे . 


रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

माझे ग्रंथालय - देणगीदार ठाणे विभाग

माझे ग्रंथालय - देणगीदार - ठाणे विभाग

१. श्री अरविंद जोशी
२. सौ यामिनी पानगावकर
३. सौ रेखा विनायक देखणे
४. सौ शुभांगी  गिरीश  दातार
५. सौ श्रुती अमित म्हात्रे
६. सौ  संगीता राजपाठक
७. मीनल पाटील
८. श्री दिलीप साळवी
९. श्री मिलिंद दत्तात्रेय केळकर
१०. डॉक्टर मिलिंद जोशी
११. सौ हेमलता वाघराळकर
१२. सौ विद्या लोणकर
१३. श्री विजयकुमार पंडित
१४. श्री राजेंद्र वामन सहस्रबुद्धे
१५. डॉक्टर माधुरी पेजावर
१६. सौ सविता कुलकर्णी
१७. डॉक्टर नरेद्र देशपांडे
१८. अर्चना दामले
१९. डॉक्टर अपर्णा फडके
२०. श्री आनंद यशवंत मराठे
२१. श्री अजित वामन मराठे


सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

कुसुमाग्रज प्रतिष्ठान -माझे ग्रंथालय ठाणे

" माझे   ग्रंथालय " ठाणे 
शुभारंभ सकाळी ११ वाजता रविवार ३१ ऑगस्ट २०१४ रोजी 
आनंद विश्व गुरुकुल , रघुनाथ नगर , मित्तल पार्क जवळ , ठाणे येथे 
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते होणार आहे . 

माझ ग्रंथालय योजनेत १२ पेट्यांचे तसेच ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील ग्रंथ पेट्यांचे वितरण होणार आहे . 
वाचन प्रेमींनी योजनेत सहभागी होण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे . 

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : 
९७ ६९ ९२ ९७ ८५ अरविंद जोशी , समन्वयक , माझ ग्रंथालय , ठाणे विभाग . 
९८ ६९ ४६ ५१ ४४ सौ रश्मी जोशी , समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी , ठाणे विभाग . 


शनिवार, २६ जुलै, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी नवी योजना - माझे ग्रंथालय

ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे नवे स्वरूप . . . माझे ग्रंथालय


दर्जेदार विविध विषयांची , लेखकांची २५ पुस्तकांची एक पेटी असेल, 
ज्यामध्ये उत्तमोत्तम ,निवडक मराठी अथवा इतर भाषांतील साहित्याचा मराठीत अनुवाद असलेली  पुस्तके असतील . 
साहित्याचे ,लेखनशैलीचे जास्तीत जास्त नमुने जसे कथा , कादंबरी , विनोदी , रहस्य , चरित्र , प्रवासवर्णन . . . . . . थोडक्यात सर्व समावेशक ग्रंथ संपदा देण्याचा  आटोकाट प्रयत्न असेल. 

एका वाचक कुटुंबाकडे सदर ग्रंथ पेटी २ महिन्यांच्या कालावधी साठी असेल . किमान एक वाचक ते ग्रंथ पेटीतून वाचनासाठी सहजगत्या पुस्तक घेवून जावू शकणारे जवळपास वास्तव्यास असणारे जास्तीत जास्त १० वाचकांना यामुळे वाचनाचा आनंद घेत येईल . 

योजना सुरु करताना किमान १२ ग्रंथ पेट्या विविध भागातील वाचकांसाठी उपलब्ध व्हाव्यात . 

प्रत्येक ग्रंथ पेटीतील पुस्तके वेगवेगळी असतील . कुसुमाग्रज प्रतिष्ठान च्या निवड समिती मार्फत प्रत्येक पेटीत वैविध्यपूर्ण तसेच कोणतेही पुस्तक दुसऱ्या पेटीत सारखे होणार नाही याची दक्षता घेतली जाते . 

दर २ महिन्यांनी वाचक गटातील ग्रंथ पेटी इतर गटांसोबत बदलली जाते . 

वैद्यकीय सेवा , दुकाने , कामानिमित्त भ्रमंती  तसेच कारखानदारी  यामुळे कामाच्या व्यापात बुडालेल्या आमच्या मराठी वाचक बांधवांना वाचनासाठी वाचनालयात जाणे शक्य होत नाही .  पुस्तके कोणती व किती विकत घ्यावी आणि वाचून झाल्यावर त्यांचे पुढे काय ?अथवा ग्रंथ तुमच्या दारी योजनेत सहभागी होण्यासाठी ३५ वाचकांचा समूह होवू न शकणे . अशा वाचन प्रेमींसाठी ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे माझे ग्रंथालय हा नवा उपक्रम ठाणे , मुंबई , नाशिक , पुणे . . .  कालांतराने सर्व शहरात सुरु करीत आहोत . 

विनायक रानडे , विश्वस्थ , कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक , महाराष्ट्र , भारत . 
For more details plz contact.
Vinayak Ranade    
Mob -  +91 99 22 22 5777
What'sup -  + 91 9423972394
Email -  vinran007@gmail.com
Skype -  granth_vinayak
Face Book -  http://www.facebook.com/vinran007
Blog  - http://granthtumchyadari.blogspot.in/

Kusumagraj Pratishtan Bank A/c details 
for Donation to Granth Tumchya Dari and Maze Granthalay with 80g 

NAME -                 KUSUMAGRAJ PRATISHTAN
BANK -                BANK OF BARODA                   
BRANCH -            GOLF CLUB
IFSC CODE-          BARBOGOLFCL
ACCOUNT NO-     17660100009470

ग्रंथ तुमच्या दारी २० जुलै २०१४ मुंबईगुरुवार, २४ जुलै, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा २४ जुलै २०१४

ग्रंथ दौरा . . .  पुणे  . . २४  जुलै २०१४
पुणे ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड . . . ३ नव्या ग्रंथ पेट्यांचे वितरण ,
पुण्यातील एकूण ग्रंथ पेट्या आता ७०. . . .योजनेतील सर्वाधिक पेट्या असलेले शहर .

गुरवार  २४ जुलै  २०१४

दुपारी १ वाजता  - सेवासदन इंग्लिश मिडीयम स्कुल, 
पटवर्धन बाग, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जवळ , एरंडवणे , पुणे 
येथे २ ग्रंथ पेट्यांचे मराठी साहित्याच्या वाचनासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी वितरण .

आयोजक -  चिंतामणी पटवर्धन  फ़ोन  ९९ २२ ४२ १२ ७१ 
प्रायोजक  -  एम जी कुलकर्णी , नाशिक  आणि सतीश मराठे पुणे . 


गुरुवार, १० जुलै, २०१४

आय बी एन लोकमत २९ जून २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा - पुणे,सोलापुर ११ - १३ जुलै २०१४

शुक्रवार  ११ जुलै  २०१४

सकाळी ११ वाजता  - एस बी पाटील पब्लिक स्कुल रावेत येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक . 
आयोजक -  विशाखा सोनकांबळे  फ़ोन  ७३ ८५ ६७ २२ २१

दुपारी  १.३० वाजता - सेवासदन शाळा,  लक्ष्मी रोड , हुजुर पागे समोर, पुणे  येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक . 
आयोजक -  चिंतामणी पटवर्धन  फ़ोन  ९९ २२ ४२ १२ ७१

दुपारी  ४  वाजता -  श्री प्रसन्न सोसयटी , महेश सोसायटी मागे, बिब्बेवाडी  पुणे येथे  ग्रंथ पेटीचे वितरण . 
प्रायोजक  -  श्रीमान  किसनलालजी सारडा प्रतिष्ठान , नाशिक  
आयोजक -  शुभांगी पाठक  फ़ोन  ९४ २२ ५१ २७ ५९

संध्याकाळी  ५.३० वाजता  बिब्बेवाडी  पुणे येथे  ग्रंथ पेटीचे वितरण . 
प्रायोजक  -  सुजाण वाचक मंच , पाषाण आणि सखी मंडळ , नाशिकरोड .   
आयोजक -  दत्ताजी वासलेकर  /  सुनंदा पुणेकर  फ़ोन ९७ ६३ ५५ ६५ २१

संध्याकाळी ७ वाजता -  अस्टोनिया रॉयल , आंबे नऱ्हेगाव , पुणे येथे  ग्रंथ पेटीचे वितरण . 
प्रायोजक  -  अस्टोनिया रॉयल वाचक मंडळ , आंबे नऱ्हेगाव , पुणे. 
आयोजक -  महेश सोनावणे   फ़ोन ९४ २० ६९ ६२ ६४

रात्री  ८ वाजता  -  ग्रीनलैंड काउंटी, आंबे नऱ्हेगाव , पुणे येथे  ग्रंथ पेटीचे वितरण . 
प्रायोजक  -  श्रीमान  किसनलालजी सारडा प्रतिष्ठान , नाशिक  
आयोजक -  मानसी साठे  फ़ोन  ९८ ८१ २० ४४ ३९ 

शनिवार १२ जुले २०१४  - सोलापुर 

रविवार १३ जुलै २०१४ पुणे 

सकाळी १०.३० वाजता  -  मुक्तछद, विठ्ठल प्रकाश सोसायटी , गल्ली नंबर २३ , धायरी, सिंहगड रोड. येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक . 
आयोजक -  शिल्पा केतकर   ९३ ७१ २० ६६ ७९

सकाळी ११.३० वाजता -  ४ ए / ७ , तपोवन सोसायटी, जिजाइ गार्ड्न हॉल जवळ, वारजे पुणे येथे  ग्रंथ पेटीचे वितरण . 
प्रायोजक  -  सतीश मराठे , पुणे . 
आयोजक - मृणालिनी  साने   फ़ोन ९३ २५ ३१ ५५ ८७

दुपारी ४ वाजता -  तारांगण सोसायटी , डहाणुकर कालनी, येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक . 
आयोजक - गोखले,  वसुधा करदळे  फ़ोन ९८ ८१ ३७ २० ११

दुपारी ५ वाजता -  चंद्रलोक सोसायटी ,  डहाणुकर कालनी, येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक . 
आयोजक - खानेगांवकर ,  वसुधा करदळे  फ़ोन ९८ ८१ ३७ २० ११

संध्याकाळी  ६.३०  वाजता -  ५०१, ए बिल्दिंग सोल्लन्ना  थॆरगाव , येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक . 
आयोजक -  स्वाती पाटील  फोन  ९० ९६ ८० ०२ ८४

रात्री ८. ३० वाजता -  अथश्री सोसायटी , पाषाण बाणेर रोड येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
प्रायोजक - अथश्री जेष्ठ नागरिक संघ , पाषाण . 
आयोजक - शुभा कर्णिक  ९८ २३ ४० ५८ ६५


पुणे येथील प्रत्येक  ग्रंथ दौरा आयोजन , सहकार्य आणि मार्गदर्शन   -  शाम पाठक , मोबाईल  ८४ ०८ ८१ ६६ ०० निवास ०२० २५ २१ ८० ४९

संपर्क  - पुणे समन्वयक  :  रवींद्र कांबळे  ९ ८ ५ ० ६ ३ ६ ० ६ १ 
             सहसमन्वयक    :  प्रसाद गुरव  ९ ८ ६ ० १ ० २ ३ ६ २


मंगळवार, १ जुलै, २०१४

आय बी एन लोकमत १५ जुन २०१४

नागपूर एच बी इस्टेट वाचक प्रतिक्रिया

अतिशय सुंदर उपक्रम या उपक्रमामुळे माझ्या मुलीत वाचनाची आवड निर्माण होते आहे. सौ भक्ती प्रसाद बर्वे 

एक सुंदर उपक्रम वाचनाची आवड निर्माण करण्यास मदत. सौ वैदेही अमोल वझे 

अतिशय स्तुत्य उपक्रम विविध प्रकारची पुस्तके सहज उपलब्ध सौ गोखले यांचे व्यवस्थापन नेटके. श्रीमती गोडबोले 

गेले तीन महिने मी या ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाचा फायदा घेतला. पुस्तके सर्व नवीन आणि व्यवस्थित ठेवलेली त्यामुळे वाचण्याचा आनंद द्विगुणीत झाला. सौ गोखले यांचे सहकार्य पण कौतुकास्पद पुढील वाटचालीला शुभेच्छा. द वा आपटे

निस्वार्थ मानाने केलेली समाज सेवा म्हणजे काय याचे उत्तर हवे असेल तर ग्रंथ तुमच्या दारी सारखा उपक्रम करा सौ रुपाली पडगीलवार 

नागपूर एच बी इस्टेट वाचक प्रतिक्रिया 
शनिवार, २८ जून, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा २८ व २९ जून २०१४

ग्रंथ दौरा - कल्याण , अंबरनाथ , ठाणे २८ व २९ जून २०१४

शनिवार २८ जून दुपारी १२ वाजता कल्याण परिसरातील डोंबिवली नागरी बँकेच्या सौजन्याने 
ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील वाचक तसेच सहभागी होवू इच्छिणाऱ्या वाचकांची बैठक . 
संपर्क - रमेश करमरकर ७७ ३८ ७२ ३६ ९२ 

अंबरनाथ येथे "ग्रंथ तुमच्या दारी" योजनेचा शुभारंभ 
शनिवार २८ जून २०१४ रोजी दुपारी ४ वाजता 
ब्राम्हणसभा, दत्तमंदिर , वडवली विभाग, अंबरनाथ पूर्व येथे . 
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि अंबरनाथ जय-हिंद को ऑप बँक यांच्या संयुक्त विद्यमाने 
सुरु होणाऱ्या या योजनेमुळे अंबरनाथ , बदलापूर , उल्हासनगर परिसरातील 
वाचकांना सहभागी होता येईल . 
आपण व आपल्या परिचित त्या परिसरातील वाचकांना आमंत्रित करून 
सक्रिय सहभाग द्यावा . हि विनंती . 
रूपा देसाई , ९८ २२ ४० १० १० . 
समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी , अंबरनाथ . 

रविवार २९ जून २०१४ ठाणे 
सकाळी १० वाजता प्रकुती सोसायटी , तीनहात नाका , ठाणे येथे 
ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील वाचकांचा मेळावा . 
संपर्क : अविनाश गोखले ९८ ६९ ४५ २६ ०१

सोमवार, १६ जून, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी अजित पार्क मालाड मुंबई ग्रंथ पेटी उदघाटन ८ जून २०१४

       अजित पार्क को.ऑप.हौ.सोसायटी ही सोमवार बाजार,मालाड (प) येथील बहुसंख्य मराठी भाषिक असलेली सोसायटी आहे.येथे दरवर्षी १५ ऑगस्ट,२६ जानेवारी,आनंदमेळा (फन-फेअर),सत्यनारयाणाची पूजा,सोसायटीमधील लोकांनी बसविलेले लहान मोठ्यांचे कार्यक्रम उत्साहात साजरे साजरे केले जातात.सोसायटीतील एक उत्साही रहिवासी श्री. सोमनाथ राणे यांच्या अफाट जनसंपर्कामुळे ग्रंथ तुमच्या दारीया संकल्पनेची माहिती मिळाली.असे वाचनालय या विभागात चालविण्यासाठी श्रीमती लोके,सौ. शिरोडकर,सौ.फणसेकर,सौ. राणे यांची समिति बनवून त्यासंबंधीचे पत्रक वाटण्यात आले.या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.लिबर्टी गार्डन,मालाड (प) येथे चालविण्यात येत असलेल्या वाचनालायच्या जागी जाऊन प्रत्यक्ष कार्यपध्दतीची माहिती घेण्यात आली. दोनच दिवसात ग्रंथपेटीच्या देणगी रकमेच्या निम्मी रक्कम पश्चिम विभागाच्या समन्वयकांकडे सुपूर्द करून उर्वरीत रक्कम दिल्यावर अजित पार्क सोसायटीच्या' नावे ग्रंथ पेटी देण्याची विनंती केली. पेटी उपलब्ध असल्याने व सभासदांच्या वाचनाच्या कळकळीमुळे,सर्व रक्कम जमण्याची वाट न पाहता त्यांना पेटी क्र. ४ केंद्र सुरू करण्यासाठी लगेच दिली. 
      या केंद्राचे औपचारीक उद्घाटन एका घरगुती समारंभात दि. ८ जून २०१४ रोजी समन्वयक श्रीमती.दीपा लोके याचे घरी या विभागातील सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. हेमंत बेलसरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.वाचनालयाचे पहिले सभासद व अजित पार्क सोसायटीचे सचिव श्री. खाडये यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. बेलसरे यांचे स्वागत केले.स्वत: डॉ. बेलसरे चिंचोली बंदर,मालाड(प) येथील केंद्राचे समन्वयक असल्याने – अशा केंद्रांची  गरज ,सर्वांगीण प्रगतिसाठी वाचन करण्याचे महत्व आणि आवश्यकता,वाचन का व कसे करावे,तसेच विचारांची देवाण-घेवाण होत असल्याने परस्पर संबंध वाढीस लागून दृढ होत असल्याचे संगितले.तसेच वाचनालय चालविताना घ्यावयाची काळजी याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. वाचनालय सुरू करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांनी समितीतील सभासदांचे कौतुक केले व श्रीमती लोके याना एक पुस्तक देऊन प्रतिकात्मक उद्घाटन केल्याचे जाहीर केले.
      सौ. रेखा शिरोडकर यांनी वाचनालयातर्फे डॉ. बेलसरे यांचे आभार मानले.तसेच पेटी ठेवण्याचे ठिकाण,पुस्तक अदला-बदलीचा दिवस व वेळ तसेच पुस्तक हाताळण्यासंबंधीच्या नियमावलींची माहिती सांगून जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
      श्री. सोमनाथ राणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती लोके,सौ. शिरोडकर,सौ.फणसेकर,सौ. राणे यांनी आपल्या घरातीलच एक कार्य आहे असे समजून वाचनालय सुरू करण्यात सहभाग घेतला त्याचे फलित म्हणजे 'अजित पार्क वाचनालय


ग्रंथ तुमच्या दारी अजित पार्क मालाड मुंबई ग्रंथ पेटी उदघाटन फोटो 


https://www.youtube.com/watch?v=YHNP2AMx_ZI&feature=youtu.be


शनिवार, ७ जून, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दुबई दौरा २० जून २०१४

दुबई येथे  "ग्रंथ तुमच्या दारी" योजनेचा शुभारंभ 
शुक्रवार २० जून २०१४ रोजी होत आहे. 
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. 
कार्यक्रम सकाळी १०.३० ला सुरु होईल. 
ठिकाण -  मिटकॉन सभागृह, २१५ अल क़ियदा बिल्डिंग एरपोर्ट जवळ, डेरा दुबई . 
या प्रसंगी ८ पेट्या वितरीत केल्या जातील. 
अधिक माहिती साठी संपर्क 
सौ स्वाती कडवे, +९७१ ५० २१५२७८२ दुबई . sandeep@kadwe.com

विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान.    
Mob  +91 99 22 22 5777 What'sup  +91 9423972394

लोकेश शेवडे , कार्यवाह ,  कुसुमाग्रज प्रतिष्ठान.
Mob  +91 9822026844 Email  shevadelokesh@gmail.com

शुक्रवार, ६ जून, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा ११ जून - १२ जून

पुणे . . . . ग्रंथ निघाले  .  . . .
बुधवार ११ जून आणि गुरवार १२ जून २०१४
पुण्यातील नव्या ५ पेट्या ( पेटी क्र . ५७ ते ६१ )

बुधवार ११ जुन २०१४

सकाळी १० - जुन्नर, सुपातेवाडी , आदिवासी आश्रमशाळा.  येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
            आयोजक - धनंजय राजूरकर  ९४२३० ३८८८६

दुपारी ३ - कराड बँक , हर्शल हॉल समोर , करिष्मा सोसायटी समोर , कोथरूड , पुणे .

दुपारी ४ - अथश्री आणि कुमार सहवास  सोसायटी  ए ४०१ , पाषाण बाणेर रोड येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
            आयोजक - वर्षा राजहंस  ९२२५३ ०६०६४  शुभा कर्णिक  ९८२३४ ०५८६५
            प्रायोजक - आदित्य गार्ड्न सिटी वाचक गट क्रमांक २

संध्याकाळी ५. ३०  - आदित्य गार्ड्न सिटी वारजे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
            आयोजक - नेहा रायते  ९८२२८ ९३६२२
            प्रायोजक - डॉ.  वलवडे विमान नगर  ९५५२५ ७५१२३

संध्याकाळी ७ - लेक व्हु सोसायटी सुखसागर नगर कात्रज येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
             आयोजक - अपर्णा नातु  ९४२२३ १७२१६
             प्रायोजक - परेश नाईक , धायरी ९८९०५ ०५४८७, नागेश नाईक  ९८८१२ ४२५४२

गुरवार १२ जुन २०१४

सकाळी १० - सतीश मराठे, ४२/१० शाकुंतल, शॉप ९, पहिला मजला, लॉ कॉलेज  रोड,  नळ स्टाप ,पुणे.  येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
              आयोजक - सतीश मराठे ,  ०२० २५४४०२७६
              प्रायोजक -  श्रीधर पाठक , ९८२२० ४३९८४

दुपारी २ - यशदा , युनिव्हसिटी रोड.  येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
             आयोजक - डा मनोज कुलकर्णी  ९८२३३ ३८२५६

संध्याकाळी ६ - संत तुकाराम उद्यान , सेक्टर २७, प्रधिकरण, निगडी . येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
              आयोजक - संयोगिता पाटील  ९४२२० ५७५६१  एैश्वरया पानसे ९३७२५ १२८६१
              प्रायोजक -  खिरे शितल ७५८८२ ३५५९६

पुणे व परिसरातील वाचकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा .

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने
पुणे शहर व परिसरात ६१ विविध ठिकाणी अनेक देणगीदारांच्या सहकार्याने
वाचकांना विनासायास विनामोबदला पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होत आहेत .
यात आपल्या सहकार्याने वाढ होत राहीलच . . . . . . . .

संपर्क  - पुणे समन्वयक  :  रवींद्र कांबळे  ९ ८ ५ ० ६ ३ ६ ० ६ १
             सहसमन्वयक    :  प्रसाद गुरव  ९ ८ ६ ० १ ० २ ३ ६ २

मंगळवार, २० मे, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी मुळे गुरु भेट     मी ग्रंथ तुमच्या दारीची एक समन्वयक. मी नेहमी पेटीतील पुस्तके माझ्या ऑफिसमध्ये माझ्या सहकारयाना   वाचायला  घेऊन जाते. त्या दिवशी एका मैत्रिणीने मागीतले म्हणून अभिमन्यू पत्नी उत्तरा -सुधाकर शुक्ला  यांचे पुस्तक घेऊन गेले. पण तिला देण्याआधी मी ते पुस्तक वाचयचे ठरवले थोडा स्वार्थी होता विचार पण कधीतरी चालते ना असे तसेच हे. तसे हि मला ऐतिहासिक वाचायला आवडते.

      पुस्तक हातात घेतले आणि सहज शेवटचे पान  उघडून बघितले तर लेखकाचा फोटो आणि माहिती होती.  तो फोटो बघून  स्वतःशी म्हणाले अरे हे तर शुक्ला सर. पण तेच हे कि आणखी कोणी असे एकदा वाटून गेले. सगळ्यात शेवटी माहिती दिली होती " प्रिन्सेस पद्मराजे गर्ल्स हाय स्कूल मधून निवृत्ती " मग तर माझी खात्रीच पटली कि हे तर आपले मराठीचे शुक्ला सर. त्या माहिती मध्ये घरचा नंबर हि दिला होता.
     मनात विचार आला कि फोन करून बघावा. थोडी भीती वाटत होती पण फोन लावला आणि सर आहेत का ते विचारले पण सर बाहेर गेले होते. संध्याकाळ पर्येंत मी शाळेच्या विचारात होते. मराठीचा तास चालू होता आणि सर शिकवत होते मन भूतकाळात रमून गेले होते. सगळ्या आठवणी समोर दिसू लागल्या होत्या. शुक्ला सर आणि त्यांनी शिकवलेल्या आर्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
      ऑफिस संपल्यावर संध्याकाळी परत सरांना  फोन केला मी. सर आले फोनवर त्यांचे वय आता ८० वर्ष  आहे. मला खरेच शब्द सुचत नव्हते. काय बोलू कळत  नव्हते. इतक्या वर्षांनी आपण आपल्या मराठी च्या सरांशी बोलू याची मला कल्पनाच नव्हती पण ते खरे झाले होते.
       बराच वेळ बोललो आम्ही सर सांगत होते त्यांनी काय काय लिहिले ते. मग म्हणाले  कि पुण्याला आलीस कि ये घरी नक्की. माझ्या घरच्यांची विचारपूस केली. बोलता बोलता माझ्या डोळ्यात पाणी कधी आले कळलेच नाही. मी किती जणांना सांगत सुटले कि मी माझ्या सरांशी बोलले म्हणून खूप आनंद झाला .ग्रंथ तुमच्या दारी  च्या योजनेमुळे सरांशी बोलण्याचे भाग्य मला लाभले.

रसिका  गुळवणी 

समन्वयक 

नवी मुंबई खारघर 


शुक्रवार, १६ मे, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा १७ मे - १८ मे २०१४

ग्रंथ दौरा . . . . .  शनिवार  १८ मे आणि रविवार १९ मे  २०१४
चिंचवड , तळेगाव दाभाडे , पाषाण - बाणेर , बावधन , कोथरूड , वडगाव बुद्रुक सिंहगड रोड , पुणे 

शनिवार  १७ मे

सकाळी १०. ३० वाजता चिंचवड  येथे योजनेचा शुभारंभ 
डी एल जोशी , सुखवाणी विला , १- २ बी , जीवन नगर , चिंचवड , पुणे .
ग्रंथ पेटीचे प्रायोजक -  आदित्य गार्डन  सिटी , वारजे.
संपर्क - शोभा जोशी ९९ २२ ९३ ३५ ९८ , ९९ २२ ४४ ८९ ९५
          गौरी टाकळकर  ९९ २२ ३२ ६७ १०

१७ मे तोलानी इन्स्टिटुयट,  तळेगाव दाभाडे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - कै . लीला मराठे यांच्या स्मरणार्थ शमिका आठले आणि सतीश मराठे , पुणे .  
संपर्क - अतुल पुणतांबेकर ९८ ६० ३२ ८५ २० 

१७ मे संध्याकाळी ५ वाजता पाषाण येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक . 
A ४०१ , कुमार सहवास सोसायटी , ओजस सोसायटीच्या शेजारी ,
अथश्री - सोमेश्वर पथ , पाषाण - बाणेर लिंकरोड परिसर , पाषाण . 
संपर्क - वर्षा राजहंस  ९२ २५ ३० ६० ६४ 

१७ मे संध्याकाळी ६ वाजता बावधन , पुणे  येथे ग्रंथ पेटीचे वितरण . 
ग्लोरिया अपार्टमेंट, अम्ब्रोशिया हॉटेल समोर , पिरंगुट रोड , बावधन , पुणे . 
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - कै . सुनंदा काळे यांच्या स्मरणार्थ - शाम पाठक, आदित्य गार्डन  सिटी , वारजे . 
संपर्क - कविता धारवाडकर ९८२३३ ०४२३७ . जयंत फडके ९८ २० ४० ३१ ९९

१७ मे संध्याकाळी  ७.३० वाजता कोथरूड येथे ग्रंथ पेटीचे वितरण . 
अजंठा , कृष्ण हॉस्पिटल जवळ , कर्वे रोड, कोथरूड . 
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - श्रीमती मीरा जोशी , पुणे . 
संपर्क - श्रीधर पाठक  ९८ २२ ०४ ३९ ८४ ,  श्रीकांत भोजकर ९८ ९० ३३ ३४ १४ 
 
रविवार १८ मे 
सकाळी  पुण्यातील मान्यवरांच्या गाठीभेटी . 

१८ मे संध्याकाळी ५ वाजता वडगाव बुद्रुक येथे ग्रंथ पेटीचे वितरण 
नारायण बाग , जुन्या टोल नाक्यामागे , ज्ञानदीप शाळेजवळ , वडगाव बुद्रुक , पुणे . 
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - शब्द सखी वाचक मंडळ , बिब्बेवाडी, पुणे आणि  नाशिक एजुकेशन सोसायटी , नाशिक . 
संपर्क - मिलिंद नाईक ९३ ७१ २६ ९४ ७८
 

सोमवार, १२ मे, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी बेळगाव मे २०१४

मुलुंड वाचक प्रतिक्रिया

साहित्य म्हणजे अनुभव , भावना, विचार,वेदना,प्रतिक्रिया यांना दिलेले शब्दरूप , मग त्यासाठी कोणताही साहित्यप्रकार मनोधारणेनुसार निवडता येतो. उदा. कथा कादंबरी, आत्मचरित्र वगैरे आकलन व संवेदना वाढवण्याचे प्रयत्न साहित्याद्वारे होतात म्हणून साहित्य निर्मितीचे महत्व आहे. साहित्यातील ताकद आपण वाचनातून अनुभवली आहे. त्याला कोणताही विषय वर्ज्य नाही. अशीच विविध विषयांची पुस्तके कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक यांच्या ग्रंथ  तुमच्या दारी या संकल्पनेतून आमच्या दारी आली. नव नवीन पुस्तके वाचताना विचारांचा झोका इतका उंच जातो कि तो खाली यायलाच तयार नसतो. विविध भाषांमधील अनुवादित पुस्तके देश विदेशातील राजकीय, सामाजिक विचार वेदना यांची जाणीव करून देतात.
    या प्रकल्पाला मिळालेला प्रतिसाद म्हणजे मराठी माणसाचे साहित्यावर असेलेले प्रेमच व्यक्त करणे होय. असे प्रकल्प राबवण्याचा विचार मनात येणारयाना व तो प्रत्यक्षात उतरवताना त्यांना सहकार्याचे हात देणाऱ्या सर्वांना माझे त्रिवार वंदन

सौ मधुरा  सुधीर महंत

मुलुंड वाचक


गुरुवार, ८ मे, २०१४

सातारा कोल्हापूर ग्रंथ तुमच्या दारी दौरा ९ मे २०१४

कराड अर्बन बँकेतर्फे वाचन संस्कृतीच्या जागृतीसाठी  ग्रंथ तुमच्या दारी 
 ​ हि ​
योज
​ना राबवीत आहे .हि योजना कराड व कराड परिसरात,
 
फलटण,
 काले
 ​,
 इस्लामपूर
,
 शिराळा
​,
 येळगाव
​ ,
 सोलापूर, पुणे ,कोल्हापूर व कोल्हापूर परिसरात  ८ पेट्या असून ,९ व्या पेटीचा  शुभारंभ दि.०९.०५.२०१४ रोजी कोडोली  ता.पन्हाळा येथे होणार आहे.  अशा एकूण ९२ पेट्या दि कराड अर्बन को-ओप.बँक लि.कराड (शेड्यूल्ड बँक)व कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने 9200 ग्रंथ वाचकासाठी उपलब्ध आहेत.
बँकेचे शताब्दी महोत्सव २०१७ साली  साजरी होणार आहे .यानिमित्ताने बँकेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम  राबवले जाणार  आहेत. त्यापैकीच  
 
ग्रंथ तुमच्या दारी 
​ हा एक उपक्रम आहे.
 कोल्हापूर मधील वाचक मेळावा कराड अर्बन बँकचे शाहूपुरी शाखेत दि.०९.०५.२०१४  ५.३० pm. होणार आहे.


बुधवार, ७ मे, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी बेळगाव दौरा

बेळगाव येथे ग्रंथ तुमच्या दारी योजना सुरु करण्यासाठी 
शनिवार १० मे २०१४ रोजी बेळगाव येथे  
वाचक , ग्रंथ प्रसारक , वाचन संस्कृतीचे हितचिंतक यांची 
बैठक आयोजित करत आहोत . 
बेळगाव मधील आपल्या परिचित असणाऱ्या सर्व वाचन प्रेमीना 
आवर्जून आमंत्रित करून बैठकीस उपस्थित राहावे . 
ठिकाण व वेळ लवकरच कळवण्यात येईल . 
अधिक माहितीसाठी संपर्क करा.

विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान. ९९ २२ २२ ५७ ७७

For more details plz contact.
Vinayak Ranade     
Mob - 99 22 22 5777 
What'sup -  9423972394


ग्रंथ तुमच्या दारी बेळगाव


पुणे ५१ व्या ग्रंथ पेटी चे उद्घाटन


ग्रंथ तुमच्या दारी हितवदा नागपूर


ग्रंथ तुमच्या दारी प्रतिक्रिया बेळगाव

ग्रंथ तुमच्या दारी 
कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे विनासायास विनामोबदला ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम गावो-गावी आणि म्हणूनच घरो-घरी नेणारे विश्वस्थ आणि एक ग्रन्थ-प्रेमी तथा एक समर्पित कार्यकर्ते हे बेळगावला येत अहेत हे वाचून खूप-खूप - आनंद झाला . लोकमान्य तर्फे अनेक साहित्यिकांना भेटण्याची संधी बेळगावात मिळत असते तेंव्हा श्री विनायक रानडे ना भेटणे आणि त्यांची ग्रंथ तुमच्या दारी ही योजना समजून घेणे आणि तिला शक्य होईल तेवढा सकारात्मक प्रतिसाद एवं सहयोग देणे हे बेळगावातील मराठी -प्रेमी संस्थांनी जरूर कराव . बेळगावच्या परिसरात अनेक मराठी साहित्य सम्मेलने होत असतात त्यांच्या संस्थांनी ही योजना जरूर राबवावी 
.Facebook वरून मला या योजनेची एक वर्षा पूर्वी माहिती मिळाली आणि श्री विनायक रानडे हे ज्या समर्पित भावनेने प्रवास करीत असतात आणि ही योजना हा उपक्रम गावो-गावी नेत असतात तो तडाखा ती तडफ पाहून मी त्यांच्याशी संपर्क साधला .ते या उपक्रमाविषयी भर-भरून बोलले तेंव्हा कळून चुकल की या माणसात ग्रन्थ आणि ते सर्व दुर जावे या साठी किती तळमळ आहे . 
श्रीविनायक रानडे हे आता माझे इंटरनेट वरून झालेले एक मित्र आहेत अस मी अगदी अभिमानानी म्हणू शकतो . त्यांच्या या उपक्रमाला मी tv च्या भाषेत DTH सेवा अस म्हणेन म्हणजेच direct to home (but free ). कर्नाटकात असलेल्या वेग-वेगळ्या मराठी संस्थाना आणि मराठी मंडळानीही ही योजना हा उपक्रम राबवावा यासाठी धारवाड ,हुबळी ,गुलबर्गा ,मंगळूरू (मी मंगळूरू मराठी मंडळाचा संस्थापक सदस्य आहे ),बेगलुरू या व अशा अनेक ठिकाणी त्यांचा जाण्याचा मानस आहे या त्यांच्या कार्यात हि आपण बेळगावकरांनी मदत करायला हवी अस मला वाटत . श्री विनायक रानडेजीच आणि त्यांच्या उपक्रमाच स्वागत आणि मनापसून शुभेछा … 

क़िशोर मधुकर काकडे -मंगळूरकरसोमवार, ५ मे, २०१४

पुणे समन्वयक प्रतिक्रिया

मा विनायक रानडे यांस

२५ मे रोजी पु ल देशपांडे व त्यांचे लेखन या विषयावर चर्चा/माहिती/अनुभव हा कार्यक्रम डॉ सुचेता परांजपे व ज्येष्ठ लेखिका प्रतिभाताई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. तुमच्या या स्तुत्य  उपक्रमामुळे आम्हा सर्वांना  याचा लाभ घेता  येतोय हे महत्वाचे. वाचनाची भूक व विचार खाद्य या उपक्रमामुळे सुरु झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. अनेक धन्यवाद

शैला लिमये 

समन्वयक 

बाणेर रोड वाचक सभासद