बुधवार, २६ फेब्रुवारी, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा २७ फेब्रुवारी ते १ मार्च

कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नासिक व जोग हॉसपिट्यालिटी , नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 
विदर्भातील ग्रंथ तुमच्या दारी या योजनेचा १३ ग्रंथ पेट्या वितरणाने  शुभारंभ .. . . . . .  नागपूर, आनंदवन , चंद्रपूर 

२७ फेब्रुवारी २०१४  - संध्याकाळी ६ वाजता  श्रीराम सभागृह , रामनगर येथे 
                          मराठी दिनाचे म्हणजेच  कुसुमाग्रजांचा जन्मदिवस यांचे  औचित्य साधुन
                          विदर्भातील ग्रंथ तुमच्या दारी या योजनेचा शुभारंभ
                          श्री महेश एलकुंचवार यांच्या शुभहस्ते होत आहे . 

२७ फेब्रुवारी २०१४  - नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी ग्रंथपेटी 
                           बाबा आमटे जन्मशताब्दी वर्षानिमित्त  वितरीत करण्यात येत आहे. 

१ मार्च २०१४ -       सकाळी १० वाजता आनंदवनात ग्रंथपेटी 
                         बाबा आमटे जन्मशताब्दी वर्षानिमित्त  वितरीत करण्यात येत आहे. 

१ मार्च २०१४ -       संध्याकाळी  ५ वाजता श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय,  चंद्रपूर येथे ग्रंथपेटी 
                          बाबा आमटे जन्मशताब्दी वर्षानिमित्त  वितरीत करण्यात येत आहे. 


विदर्भातील ग्रंथ तुमच्या दारी योजनेसाठी लाभलेले  देणगीदार - 

जयकुमार टिबरेवाल ट्रस्ट, नाशिक.  बाबा आमटे जन्मशताब्दी वर्षानिमित्त  -  ५ ग्रंथ पेट्या
जोग हॉसपिट्यालिटी , नागपूर                                                          -  १ ग्रंथ पेटी 
श्री परशुराम अर्बन क्रेडीट को ओप सोसायटी, नागपूर                               -  १ ग्रंथ पेटी 
श्रीराम अर्बन को ओप बँक , नागपूर                                                   -  १ ग्रंथ पेटी 
हिंदू मुलींची शाळा  , नागपूर                                                            -  १ ग्रंथ पेटी 
श्रीमती वीणा जोग , नागपूर                                                             -  १ ग्रंथ पेटी 
श्रीमती सुषमा गोखले , नागपूर                                                        -  १ ग्रंथ पेटी 
तहशीलदार कार्यालय , कुही , नागपूर                                                 -  १ ग्रंथ पेटी 
श्री हेमंत जोशी, विश्वेश्वरय्या वाचक मंडळ , अमरावती                           -  १ ग्रंथ पेटी 


सर्व साहित्य प्रेमी समवेत समारंभास अवश्य उपस्थित राहून साहित्यावरील प्रेम वृद्धिंगत करालच याची खात्री आहे. 
नरेन्द्र जोग  ९८२३०४०५३६ नागपूर समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी .
सौ पल्लवी आमटे ०९८२२२००२८०.आनंदवन समन्वयक
श्री इरफान शेख ०९६६५४१३८२१ चंद्रपूर समन्वयक 

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी रिंग टोन

ए बी पी माझा ग्रंथ तुमच्या दारी

ग्रंथ तुमच्या दारी ए बी पी माझा

ग्रंथ तुमच्या दारी साम टीवी

ग्रंथ तुमच्या दारी इ टीवी

ग्रंथ तुमच्या दारी आय बी एन लोकमत

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी अहमदाबाद

ग्रंथ तुमच्या दारी एम व्ही पी एस हॉस्पिटल

ग्रंथ तुमच्या दारी बाल घरकुल

 http://youtu.be/A60KjmG_ri4


ग्रंथ तुमच्या दारी लोकमान्य नगर ठाणे

ग्रंथ तुमच्या दारी कोल्हापूर

ग्रंथ तुमच्या दारी सांगली मिरज

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी विलेपार्ले

ग्रंथ तुमच्या दारी सतना

ग्रंथ तुमच्या दारी धुळे

ग्रंथ तुमच्या दारी कुलाबा

ग्रंथ तुमच्या दारी मालेगाव नवीन

ग्रंथ तुमच्या दारी मालेगाव

ग्रंथ तुमच्या दारी नवी दिल्ली

ग्रंथ तुमच्या दारी चिपळूण

ग्रंथ तुमच्या दारी अलिबाग

ग्रंथ तुमच्या दारी बाल विभाग

ग्रंथ तुमच्या दारी माजिवडा ठाणे

 http://youtu.be/9_nkuz3-CSQ

फोटो 

ग्रंथ तुमच्या दारी विजय नगर अंधेरी

ग्रंथ तुमच्या दारी अहमदनगर

ग्रंथ तुमच्या दारी औरंगाबाद

ग्रंथ तुमच्या दारी कल्याण

ग्रंथ तुमच्या दारी अंधेरी १३ जानेवारी २०१३

ग्रंथ तुमच्या दारी चुनाभट्टी

ग्रंथ तुमच्या दारी तालीकोट

ग्रंथ तुमच्या दारी बाल विभाग

ग्रंथ तुमच्या दारी ओक कॉलोनी

ग्रंथ तुमच्या दारी कोंकण विभाग

ग्रंथ तुमच्या दारी बाल विभाग रवींद्र हायस्कूल

ग्रंथ तुमच्या दारी दौरा १४ ते १८ फेब्रुवारी २०१४

पुणे , सांगली , कराड , फलटण येथे ग्रंथ तुमच्या दारी दौरा १४ ते १८ फेब्रुवारी २०१४

शुक्रवार १४ फेब्रुवारी उपक्रम सुरु करण्यासाठी पुण्यात पाषाण, बावधन, बाणेर येथे बैठक 
संध्या . ६ वा. पाषाण, स्टेट बँक नगर - संपर्क : भारती जोशी ९५२७९ ६५६९९
संध्या . ७ वा. बावधन, डी एस के रानवारा - संपर्क : मंजिरी देशपांडे ८८०६१ ०१३८३
रात्री ८ वा . बाणेर , बालाजी जेनेरोसिया - संपर्क : स्वप्निला विद्वांस ९८२११ ०८६१३

ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील पुण्यातील ४३ व ४४ व्या ग्रंथ पेटीचा शुभारंभ
शनिवार १५ फेब्रुवारी सकाळी १० वाजता ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल,
संतोष हॉल जवळ , सिंहगड रोड संपर्क - कीर्ती ओक ९७६५४ ०५६८३
संध्या . ५ . ३० वाजता करिष्मा सोसायटी , कोथरूड पुणे येथे.
संपर्क - कला टिकले ९४२२० २७००९
पुणे समन्वयक : रवींद्र कांबळे ९८५०६३६०६१
सहसमन्वयक : प्रसाद गुरव ९८६०१०२३६२

रविवार १६ फेब्रुवारी सांगली येथे वाचक मेळावा आणि ११ व्या ग्रंथ पेटीचे वितरण .
संपर्क - अरुण दांडेकर ९८२३१ ८००७०

सोमवार १७ फेब्रुवारी कराड येथील येळगाव , इस्लामपूर , शिराळा येथे ४ ग्रंथपेट्यांचा शुभारंभ . संपर्क - विद्याधर गोखले ९८५०८ ८४४३४

मंगळवार १८ फेब्रुवारी फलटण येथे योजनेचा शुभारंभ
संपर्क - संभाजी निकम ९८५०० ५०६१५

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा ११ नोव्हेंबर २०१२


ग्रंथ तुमच्या दारी माहिती

 • ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेचा उगम कसा झाला ? 
 कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री. विनायक रानडे यांनी सुमारे ४वर्षापूर्वी एकच ध्यास घेतला आणि  तो म्हणजे वाचकांना त्यांच्या घराजवळ उत्तम वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्याचा ! आणि त्यातूनच ‘ग्रंथ तुमच्या दारी या योजनेचा उगम झाला.

 • या योजनेचे उद्दीष्ट काय आहे ?
 1. वाचन संस्कृतीचे पुंनरुज्जीवन 
 2. वाचन संस्कृतीचे संवर्धन  करणे
 3. लोकांमध्ये संवाद वाढवणे
 4. टीव्ही, मोबाईल, ईमेल मध्ये अडकत चाललेल्या नव्या पिढीला   वाचनाने दिशा  देणे.
 • या योजनेचे थोडक्यात स्वरूप  काय आहे ?
 या योजनेत  ३५ जणांच्या एका वाचक समूहाने सदिच्छेने काम करण्यासाठी आपल्यातीलच एक समन्वयक (Coordinator)निवडावा.समन्वयकाने पुस्तके वाचण्यासाठी प्रतिष्टानकडे ग्रंथ पेटी मिळण्यासाठी  अर्ज  करावा .  अर्ज  मिळाल्यावर  प्रतिष्टान व  समन्वयक या मध्ये एक करार होऊन वाचक समूहाच्या मागणीवरून   १०० पुस्तके असलेली पेटी प्रतिष्टानतर्फे देण्यात येईल.

 •  प्रतिष्टान   व समन्वयक या मधील कराराची कलमे काय आहेत
            प्रतिष्टान व  समन्वयक  यामधील करार १०० रु. च्या मुदरांक कागदावर  (स्टॅम्पपेपर)वर  केला जातो. या करारात ‘वाचकांना ग्रंथ वाचनासाठी  उपलब्ध करणे त्यांच्याकडून  परत घेणे,ग्रंथ गहाळ झाल्यास अथवा फाटल्यास त्याची छापील किमतीची भरपाई करणे इ. ‘  समन्वकावरील जबाबदारीचा उल्लेख आहे

 •   १०० रु. च्या मुद्रांक  कागदाचा खर्च कोणी करायचा  आहे ?
                १०० रु. च्या  मुद्रांक कागदाचा खर्च प्रतिष्ठान  करते. 

 • या पेटीत फक्त  कुसुमाग्रजांचीच पुस्तके असतात काय ?
          नाही.या पेटीत १०० ग्रंथ / पुस्तके ही कथा,कादंबरी ,नाटक, ललित  लेख,  अनुवादित ,आत्मचरित्र इ. विविध साहित्य  प्रकारची, नवीन व
          जुन्या विविध लेखकांची  असतात .

 • या पेटीतील पुस्तकांची एकूण किंमत किती ?
          सरासरी रु. २०० / - प्रती  पुस्तक या प्रमाणे १०० पुस्तकांची रु. २०,००० /- एवढी किंमत  होते.

 • या ग्रंथ पेटयांसाठी देणगीदार कोण आहेत ?
           सहकारी बँका / पत-पेढ्या,ग्रंथ प्रकाशक  या ग्रंथ पेटयांचे प्रायोजक असून काही वैयक्तिक वाचकांनी स्वताचा वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस एकसष्टी , सहस्र चंद् दर्शन अथवा  आप्तजनांच्या स्मरणार्थ अश्या दिलेल्या देणग्यातून या पेटया निर्माण  झाल्या आहेत.
 • देणगी कुठे  पाठविता येते ?
          देणगीदाराने ‘बँक ऑर्फ बरोडाच्या’ कोणतयाही शाखेत  प्रतिष्टानच्या खाली दिलेल्या खात्यावर  रोख अथवा  चेकने देणगी   रक्कम जमा   करावे  नंतर प्रतिष्टानच्या कार्यालयाला बँकेत भरणा केलेल्या चलनाची झेरॉक्स व स्वतचा पत्ता कळवा .
     पत्ता : कुसुमाग्रज प्रतिष्टान,
    तरण तलावामागे ,टिळकवाडी ,
    नाशिक – ४२२००२,महाराष्ट्र.
    Bank Details :
    Bank Name - Bank of Baroda,
    BRANCH - GOLF CLUB,
    IFSC CODE- BARBOGOLFCL,
    Account no – 17660100009470.
 •  देणगीदाराकडून किती रकमेची देणगी स्विकारली जाते ?
         एका पुस्तकाची किम्मत  रु ५००/- पासून कितीही  जास्त रकमेची देणगी स्वीकारली   जाते.
 •  देणगीदाराचे कोठे नाव  येते काय ?
             एक रकमी रु. २०,००० /- देणगी दाराचे  पेटीवर आतील प्रत्येक  १०० पुस्तकावर नावाचा स्टॅम्प लावण्यात येतो. रु. १०,००० /- चे दोन   देणगीदार असल्यास दोघांची नावे  पेटीवर व आतील प्रत्येक  १०० पुस्तकांवर  दोघांच्या  नावाचा स्टॅम्प लावण्यात येतो . परंतु त्यापेक्षा  कमी देणगीदारांची नावे जागेअभावी  देणे शक्य  नसते.
 •   देणगीदाराला पावती  देण्यात येते काय ? कश्या  प्रकारे ?
                     होय.देणगी जर विभागीय समन्वयकाकडे दिली असेल तर पावती सम्न्वयककडे पाठविली जाते.अथवा  देणगी थेट  खात्यात  भरली  पाठविली असल्यास देणगीदाराला  नाशिक कार्यालयातून  पावती  पाठविण्यात येते.
 • या देणगीला आयकर खात्याची सवलत मिळते काय ?
         होय. ही देणगी ’८० जी’ अंतगात आयकर सवलतीस  पात्र आहे.
 •  ही ग्रंथ पेटी कोठे ठेवता  येते ?
          आपल्या कॉलनीतील / विभागातील नागरीकांना वाचनालय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्या स्वताच्या  जागेत/घरात,सोसायटीच्या कार्यालयात, मंदिरात अथवा अन्य सोयीच्या ठिकाणी  हि  ग्रंथ पेटी वाचनालय सुरू करता येते.
 • ग्रंथ पेटी वाचनालयाची वेळ काय आहे ?
        ग्रंथांची देवाण घेवाण  करण्याचे ठिकाण समन्वयक आणि वाचकांच्या  संमतीने ठरते.
 • ही ग्रंथ पेटी किती कालावधीसाठी  एका वाचक  समूहाकडे ठेवता  येते ?
        ही ग्रंथ पेटी ४ महीने एका वाचक समूहाकडे ठेवता  येते. दर ४ महिन्यानंतर प्रतिष्टानतर्फे ही पेटी दुसरया वाचक समूहाशी अदला-बदली करून ही योजना पुढे सुरू राहते.
 • या वाचनालयास  मासिक वर्गणी आहे काय ?
       मिळालेल्या  देणग्यातून या पेटया निर्माण  झाल्यामुळे वाचकांना मासिक शुल्क न आकारता पुस्तके देणे शक्य  झाले आहे.
 • या वाचनालयात  पुस्तकांसाठी अनामत रक्कम भरणे आवश्यक  आहे काय ?
        नाही.  परंतु वाचनालयातील पुस्तकांच्या सुरक्षेची जबाबदारी विभाग समन्वयकावर   असल्याने, त्याने  सरासरी पुस्तकाच्या किमती एवढे  ( म्हणजे रु. ३०० /- पर्येंत  ) प्रती सभासदाकडून परत र्फेड करण्यायोग्य अनामत रक्कम घेण्यास प्रतिष्ठानची हरकत नाही.

 • एखादे  पुस्तक हरविल्यास काय करावे ?
        विभाग समन्वयकाने पुस्तक हरविणरया  सभासदाकडून पुस्तकाची छापील किंमत  घेऊन ती रक्कम प्रतिष्ठानच्या खात्यावर रोख रक्कम भरावी .तसे कायाालयाला कळवल्यावर  तेच अथवा  दुसरे पुस्तक समन्वयकाला पाठविले जाते.

 • देणगीदार असल्याने तो एखाद्या वाचकाला सभासद होण्यास  विरोध करू शकतो काय ?
नाही.वाचक  जर सभासदत्वासाठी  आवश्यक  बाबींची पूर्तता करत असतील  तर त्याला सभासदत्व  नाकारणे योग्य होणार नाही.
सौजन्य

अशोक काणे 
मालाड समन्वयक (मुंबई -प )

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०१४

वाचक प्रतिक्रिया

कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने पिसारा फुलवून आणली
रंगीबेरंगी पुस्तकांची सुंदर भेट ।
सर्वच आबालवृद्धांना मिळाली
सुखशांतीची सप्रेम भेट।।१।।
अशीच भरभराट होत राहो
आपुल्या अवर्णनीय कार्याची
वृद्धी होत राहो
निरंतर आमुच्या ज्ञानाची।।
राजश्री कणीकर.रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

वाचक प्रतिक्रिया


 1. कुसुमाग्रज प्रतिष्ठान,एक उत्तम प्रयत्न! आमच्यासारख्या परप्रांतियांसाठी ही मेजवानीच!नव्या पिढीने याचा फायदा घेतला पाहिजे Keep It Up. R.S.Srova.
 2. ही पेटी म्हणजे लौटरीच!विविध विषयांवरील व लेखकांची पुस्तके दर आठवड्याला वाचताना मजा आली,शिवाय आम्हा मैत्रीणींना एकत्रित पुस्तकांची चर्चा करण्याची संधि मिळाली.कल्पना जोग.
 3. बँकेत नोकरी करत असताना भरपूर वाचन केले,त्यानंतर संसार,मुले यात ला़यब्ररीत जाऊन पुस्तक आणणे जमायचे नाही,आमच्या सोसायटीत ही सोय झाल्याने परत एकदा वाचनाची आवड जोपासता आली,पुस्तके फारच छान आहेत - वृषाली मोरे.
 4. पुस्तक पेटी हाएक अमोल ठेवा आमच्या हाती लागलाय्,कधी न संपणारा ज्ञानाचा आणि साहित्याचा ! मराठी विशेष आवडीने न वाचणारया मला या निमित्ताने द्वारच खुले झाले .विनायक रानडे यांचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल विशेष आभार.शैला फणसे
 5. आम्हा गृहिणींसाठी ही खूपच उत्तम सोयःHarsha kambli
 6. त्यानिमित्ताने वाचनाची आवड उत्पन्न झाली.आभार,ज्योती शिरोडे
 7. मारूती चित्तमपल्ली,सुधा Murty यांची पुस्तके खूप आवडली. रेखा देशपांडे
 8. योजना अतिशय आवडली. सुचित्रा फणसाळकर
 9. घरातल्या लहानथोर सगळ्यांनी वाचन करावे अशी खूप इच्छा होती,पुरे पुस्तक वाचून झाले नाही तरी,भरपूर विचार देणारे साहित्य या निमित्ताने वाचायला मिळाले,सहजपणे उपलब्ध झालेला हा मौलिक ठेवा !४महिन्यात इतकी पुस्तके नक्कीच वाचून होत नाहीत.मनापासून अभिनंदन. सुनंदा घैसास.