बुधवार, ३० एप्रिल, २०१४

क्षमा पाठक दिल्ली समन्वयक प्रतिक्रिया

सोशल नेट वर्किंग साईट चंगल्या का वाईट यावर सतत चर्चा झडत असतात आणि बहुतांश वेळा त्या मुळे  होणारे तोटे अथवा त्याच्या वाईट पणावर  एकमत होऊन चर्चा थांबतात किवा झुकतात . पण याच माध्यमातून चांगले काय घडू शकते . याचा हा किस्सा . 
सप्टेंबर २०१२ च्या सुमारास एक दिवस फेसबुक चालत असताना नवी दिल्लीत २ वर्षापासून वास्तव्याला असणाऱ्या प्रफुल्ल  पाठक  यांना विनायक रानडे नावाच्या एका व्यक्तीच्या प्रोफाईल मध्ये वाचन संस्कृती वाढावी या साठी ते करत असलेल्या एका उपक्रमाची माहिती दिसली . वाचनाची आवड असणारे त्याकडे साहजिकच आत्कृष्ट होणार , हि माहिती म्हणजे कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक ची आता फोफावलेली "ग्रंथ तुमच्या दारी " चळवळीची माहिती होती . त्यांनी विनायक ला पोस्ट  टाकली आणि आपली [पत्नी सौ क्षमा पाठक  यांना सांगितले . "मुले मोठी झालीत , फावला वेळ असतो . एखादे छान कार्य करावे . ज्यात खूप गुंतायचे नाही पण छान वेळ पण गेला पाहिजे . आवड हि जोपासल्या गेली पाहिजे , असे त्य मला काही दिवसापूर्वी म्हणाली होतीस न . मग ऐक एक नवी संकल्पना . तुला वाचनाची आवड आहे , आपण पुस्तके विकत घेऊ अन वाचू असे तू म्हणाली होतीस न . अन मागच्या प्रदर्शांतून आपण आपल्या 'बजेट' मध्ये काही पुस्तके आणून खाजगी , अन छोटी लायब्ररी बनवायचा विचार केला होता न . तसेच एक मोठ्या प्रमाणावर उपक्रम "कुसुमाग्रज प्रतिष्ठान ' सारखी आदरणीय संस्था विनायक रानडे यांच्या माध्यमातून करतेय . आपल्याला यातून "आर्थिक ' लाभ काही होणार नाही पण एका आपल्या मनातल्या बीजाचे कुठेयारी वाढणारया  वृक्षाला मदत करता येईल . मोठे व्हायला . शिवाय आपले राहण्याचे ठिकाण दिल्लीच्या  मध्यावर आहे . त्यामुळे आपण समन्वयक म्हणून या उपक्रमाला जोडून घेतले तर. त्यला हवे तसे घर बसल्या कार्य मिळेल . वाचनाची आवड आपली पण भागेल . शिवाय ३ लाखाच्या संख्येत दिल्लीत राहणाऱ्या आपल्या मराठी मंडळींपैकी काही हजारांना वाचनाची आवड नक्की असेल . त्यांना महाराष्ट्रात गेल्यावर आठवणीने मराठी पुस्तके आणा  किंवा कोणाच्या हाती मागवा . या पेक्षा इथेच मराठी पुस्तकाचे भांडार उपलब्ध होईल . शिवाय त्या त्या भागात राहणाऱ्या अन एकमेकांना न ओळखणाऱ्या मराठी कुटुंबाना एकत्र आणण्याचे कार्य हा उपक्रम नक्कीच मदत करेल . २००० घरामागे एखादा मराठी वाचक या निमित्ताने एकमेकाला भेटेल . अन या परमुलुखात कोणीतरी आपले , आपल्या आवडीशी जवळीक असणारे एकमेकांना भेटतील . शिवाय असे काहीतरी घडावे , व्हावे , असावे  असे वाटणारे शेकड्यांनी अन हजारोनी असतात पण " हो आम्ही पुढाकार , शारीरिक अन आर्थिक भार  उचलू म्हणणारे बोटावर मोजण्या इतके असतात . आपल्या नशिबाने अन परमेश्वर कृपेने आपण पुढाकार घेऊ शकतो  अन एक चांगले कार्य आपल्या हाताने पार पडू शकते . तू तयार असलीस तर मी तुझ्या पाठीशी आहे . विचार करून संग मला . ' हा संवाद संपला तो आपण या चळवळ दिल्लीत रुजुवयाची या निर्णयाने . 
विनायक रानडे यांना आमची तयारी असल्याची माहिती दिली अन पुढे काय विचारले . कमीत कमी दहा ग्रंथ पेट्या अन त्या साठी लागणारे पैसे जमवणे हि त्यांची अट त्यांनी सांगितली . आता कसे . कोण आर्थिक मदत करेल याचा तक्ता मांडला . ओढून ताणून होतील असे जाणवले . अचानक सार्वजनिक उत्सव समिती दिल्लीचे सर्वेसर्वा श्री रा मो हेजीब म्हणजे आमचे हेजीब काका यांना सांगावे असे ठरले . अशा सर्व उपक्रमात "आर्थिक संपन्नेते बरोबर मनाची संपन्नता असणारा , मराठीचा झेंडा घेऊन ७० व्या वर्षी पण दिल्लीत व्यस्त असणारा तरुण म्हणता येईल . असे व्यक्रिमत्व. त्यांनी विश्वास दाखवले अन उलट तपासणी घेतली . नेहमीप्रमाणे अन सवयीप्रमाणे . पण गेल्या २-३ वर्षापासून त्यांच्या उपक्रमात सहभागी होत असा;यामुळे वेळप्रसंगी येईल ती जबाबदारी पेलवत असल्यामुळे त्यांना विश्वास होता . शिवाय चांगले घडायचे असले कि कसे सगळे जुळून येते म्हणतात तसे "नेमका त्यांचा २ महिन्यानंतर नाशिक दौरा होता " तेव्हा सर्व  याची डोळा पाहून अन विनायकाला भेटून नक्की करू असे ठरले . दोन महिन्यानंतर त्यांचा नाशिक येथून फोन आला . आपण ग्रंथतुमच्या दरी चळवळ नवी दिल्लीत आणतोय . सार्वजनिक उत्सव समिती सर्व आर्थिक भार उचलेल . सौ क्षमापाठक दिल्लीच्या समन्वयक " होतील अन हा उपक्रम पुढे नेतील . १ मी २०१३ रोजी दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या महाराष्ट्र दिन उपक्रमात आपण हि चळवळ दिल्लीत उद्घातीत करू . विनायक रानडे त्या दिवशी दिल्लीत येतील आपण त्यांच्या उपस्थितीत पहिले पाऊल /पेटी घेऊ . 
पुन्हा काही अडचणी उभ्या राहिल्या त्यावर उपाय करून १ मी २०१३ ला "ग्रंथतुमच्या दारी " ची दिल्लीत सुरुवात झाली . याच कार्यक्रमात श्री व्ही एस सिरपूरकर , श्री वीरेंद्र उपाध्ये अन श्री शिरीष अन सौ आरती कुलकर्णी यांनी या उपक्रमाला स्वतातर्फे अनुदान देऊन आपले आर्थिक बळ  दिले.  या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सौ निवेदिता वैश्यपायन यांच्या माध्यमातून गुडगाव येथे वास्तव्याला असणारे अन मुळचे कोल्हापूरचे श्र मंदार  कुलकर्णी यांनी पहिली "ग्रंथ पेटी ; गुडगाव येथे नेली . गुडगाव गणेश मंडळाचे निमित्ताने तेथे एक तरुण मराठी गट आहे या सर्वाना या पेटीमुळे खूप सोय झाली . मराठी पुस्तक वाचनाची सोय झाली . शिवाय नवे मैत्र सुरु झाले .  द्वारका येथे राहणारे श्री उदय कुलकर्णी यांची पण इच्छा होती . त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या सौ देशपांडे यांनी एक पेटी तिथे नेउन सर्वाना हि सोय उपलब्ध करून दिली . त्या भागातले इतर मराठी मंडळी सोबत जोडल्या गेली . पुढे एक पेटी सौ आरती अन श्र शिरीष कुलकर्णी , श्री शिरपूरकर अन श्रीकांत करजगावकर अन ……. यांच्याकडे पोहोचली . वाचन संस्र्कृती फक्त एका विशिष्ट वयापुरती उरली आहे हि बाब खोटी ठरली . सर्व वयाची मंडळी  आज या उपक्रमाचा फायदा घेत आहेत . पुस्तक चांगले कोणते , कुठे मिळेल , त्याचे अंतर किती , त्यासाठी पैसे किती खर्च करावे लागतील , आपले बजेट  आहे का ? असे  सर्व प्रश्न एका पेटीत संपले . अन नवीन मराठी वाचक समूह या निमित्ताने एकत्र यायला लागले आहे. दिल्लीत हा उपक्रम आणण्याचे विचार करत असताना "मराठी जणांना एकत्र येता  येईल . हा उद्देश सफल होतोय . ते बीज आता रोपट्या मध्ये परावर्तीत होते आहे हे दिसायला लागते . एका वर्षात दिसणारा बदल आश्वासक अन सुखावणारा आहे .  . 

सोमवार, २८ एप्रिल, २०१४

माजी विद्यार्थी संघटना वाचन केंद्र उद्घाटन ३ जानेवारी २०१४


माजी विद्यार्थी  संघटना वाचन केंद्र उद्घाटन

प्रमुख पाहुणे
 डॉ महेश अभ्यंकर. (मुख्य समन्वयक, पश्चिम मुंबई विभाग)
  श्री. अशोक काणे.  (माजी सहाय्यक महाव्यवस्थापक, बेस्ट, ) 
मेजर अरुण शिरीसकर. (निवृत्त मेजर व समाजसेवक )

रयत शिक्षण संस्थेचे, ज्ञानवर्धिनी विद्यालय चारकोप सेक्टर ७ कांदिवली (प) शुक्रवार , ३ जानेवारी २०१४   
वेळ : सकाळी ठीक ८ वा.

श्री. प्रितम धुमाळ श्री. घनश्याम देटके  श्री. महेश नवले
 सर्व आजी /माजी विध्यार्थी ,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग

http://youtu.be/GZ_wBqFVexw

ग्रंथ तुमच्या दारी

ग्रंथ तुमच्या दारी पेटी उद्घाटन सोहळा अंटोप हिल मुंबई

ग्रंथ तुमच्या दारी ठाणे लोढा कॉम्प्लेक्स पेटी उद्घाटन सोहळा २७ एप्रिल २०१४

पुणे समन्वयक यादी


 1. डहाणूकर कॉलोनी  कोथरूड - श्री विजय दांडेकर - ९४२२५२३६५७
 2. वनाझ कोथरूड - सौ  मंजुषा अनिल भाते - ९४२१०१५९२०
 3. गांधी भवन कोथरूड - सौ संख्या गोविंद कुलकर्णी ९८८१७३०२२९
 4. करिष्मा सोसायटी - सौ कला मधुकर टिकले ९४२२०२७००९
 5. कर्वेनगर - सौ प्राजक्ता हेमंत जेरे ९८५००७६८६५
 6. भुसारी कॉलोनी कोथरूड - सुर्यकांत दत्तात्रेय गंधे -  ९८२२२९५४०३
 7. पौड रोड  - श्री संदीप गोविंद घळसासी - ९३७३७३७३०२
 8. वारजे - सौ कल्याणी मनीष देशपांडे -  ९३२३३०९३०३
 9. वारजे माळवाडी - सौ सुरेखा संजय करणे -  ९९२२६९२२५८
 10. वडगाव बुदुर्क - ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल  - ९७६५४०५६८०
 11. न हे आंबेगाव - ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल -  ९३७००१२१४९
 12. धायरी - श्री नागेश पराप्पा नाईक -  ९८८१२४२५४२
 13. धायरी -श्री दिनानाथ रामचंद्र कोंडावर -  ९३७०१०१३९८
 14. धायरी - श्री दीपक वामनराव उदावंत -  ९८८१४०९८७८
 15. सिंहगड रोड - श्री शिरीष चंद्रकांत  मोकाशी -  ९८५०७०९०६६
 16. सिहागड रोड  - सौ मृणाल अतुल कारखानीस -  ९८५००३८६६५
 17. आनंदनगर सिहागड रोड - सौ जयश्री दिलीप तळेकर -  ९८२२२२२८००
 18. बाणेर - सौ अंजली विश्वास दाते -  ९८१९२८८७३३
 19. बावधन - सौ मंजिरी मदन देशपांडे -  ८८०६१०१३८३
 20. नारायणपेठ - श्री शेलेश श्रीकांत टिळक - २४४३०३५०२०
 21. मुकुंद नगर - सौ स्मिता प्रमोद जोशी - ९८८११४९०८७९
 22. शुक्रवार पेठ - सौ वासंती वासुदेव सिधये - 9403581172
 23. शनिवार पेठ - सौ गायत्री गुणेश सरदेशपांडे- 9890911507
 24. मार्केट यार्ड - श्री संदीप प्रभाकर पारखे - 9527891706
 25. कॅम्प -श्री देवेंद्र मधुकर बंगाळे - 8600146333
 26. सहकार नगर नंबर -२ - सौ अरुंधती यशवंत कुलकर्णी - 2024426668
 27.  सहकार नगर नंबर -२ - सौ शर्वरी चंद्रशेखर दाते - ९५६१०९४१५९
 28. सहकार नगर नंबर -१ - सौ प्रतिमा सुधाकर कुलकर्णी -  ९९२२९६५१२६
 29. सहकार नगर नंबर -१ - सौ माधवी संजीव बुटाला -  ९८९०६३५१२६
 30. बिबेवाडी -लेक टाऊन सोसायटी ज्येष्ठ नागरिक संघ  ९८२२८४६७८१
 31. धनकवडी चित्ताविहारी सहकारी गृह रचना संस्था मर्यादित -  ९८८११०४५६५
 32. धनकवडी श्री मिलिंद दत्तात्रेय केळकर ९८२२०७५५१७
 33. धनकवडी सौ योगिनी यशवंत सोनपाटकी - ७५८८२७७१०५७
 34. बिबेवाडी - सौ मृणालिनी यशवंत बाम-  ९४२०४८०६०९
 35. मोशी - श्री शांताराम बबन आल्हाट -  ९६०४०४१९४७
 36. चिखली - श्री चैताली दर्शन आहेर -  ९३७०३१३९८३
 37. बोपोडी - श्री गोरख मेसाजी थोरात -  ९६०४७२७९५१
 38. पिंपळे सौदागर - सौ माधवी मारुती गोळे - ८१४९८२७६८६
 39. माणिकडोह - श्री संतोष रामचंद्र ढोबळे -  ९९७५५७१४४८
 40. ओतूर - श्री गोविंद महादेव डुंबरे  ९८६०१४१८६०
 41. दौंड - श्री मुकुंद दत्तात्रेय गंधे - ९४२२५४७३१३


ग्रंथ तुमच्या दारी दौरा १ मे ते ४ मे

विदर्भ , ग्रंथ दौरा . . .  महाराष्ट्र दिनाच्या सुमुर्तावर ब्रम्हपुरी येथे योजनेचा शुभारंभ …. 
गुरवार १ मे पासून  रविवार  ४ मे २०१४ , ब्रम्हपुरी , नागपूर . . . . . . 

योजनेत सहभागी होण्यासाठी विदर्भातील वाचकांनी आधी संपर्क केल्यास तसे नियोजन करता येईल . 
या योजनेचा विदर्भातील विस्तार आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागाने होत आहे , 
योजनेत आपला सहभाग आहेच , तो वृद्धिंगत व्हावा . 

नरेन्द्र जोग  ९ ८ २ ३ ० ४ ० ५ ३ ६  नागपूर समन्वयक
सुषमा पांडे  ९ ७ ६ ६ ५ ८ ९ १ २ ८  नागपूर सहसमन्वयक
विनायक रानडे , कुसुमाग्रज प्रतिष्ठान , ९९ २२ २२ ५७ ७७  vinran007@gmail.com 


शनिवार, २६ एप्रिल, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा २६ एप्रिल - २७ एप्रिल

ग्रंथ निघाले . . . . . अंबरनाथ , ठाणे, मुलुंड … 

शनिवार २६ एप्रिल दुपारी १२ वाजता अंबरनाथ येथे 
अंबरनाथ जय हिंद बँक यांच्या बरोबर 
ग्रंथ तुमच्या दारीच्या विस्ताराबाबत माहितीपर बैठक . 
संपर्क -  रुपा  देसाई  ९ ८ २ २ ४ ० १ ० १ ०

संध्याकाळी 
श्री महालक्ष्मि टेम्पल च्यारीटी यांच्या प्रायोजित केलेल्या ५ ग्रंथ पेट्या 
मुंबई पश्चिम विभागाचे धडाडीचे शिलेदार समन्वयक डॉ महेश अभ्यंकर, गोरेगावकर  नागरिक  आणि 
या देणगीचे सर्व श्रेय असलेले त्यांचे तरुण साथीदार अशोक काणे यांच्या कडे सुपूर्द करणे . 
लवकरच त्यांचे वितरण करण्यात येईल . 

रविवार २७ एप्रिल सकाळी १० वाजता 
लक्झुरीया , लोढा, ठाणे येथे ग्रंथ पेटीचा शुभारंभ . . . 
संपर्क - अभय पटवर्धन ९ ८ ३ ३ ६ ९ ० ० २ ६

शनिवार, १९ एप्रिल, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा रविवार २० ते गुरवार २४ एप्रिल २०१४

ग्रंथ दौरा . . . . .  रविवार २० ते गुरवार २४ एप्रिल २०१४
राजगुरुनगर , वारजे , तळेगाव दाभाडे , हिंजवडी , कोथरूड , नारायण पेठ पुणे ,  चिंचोली गुरव - संगमनेर . 

रविवार २० एप्रिल 

राजगुरुनगर  दुपारी ११. ३० वाजता मातोश्री , टेल्को कॉलनी येथे योजनेच्या  माहितीसाठी बैठक . 
संपर्क - भारती पाटील ९ ७ ६ ७ ४ ५ ६ ८ ३ ५ 

कोथरूड दुपारी २ वाजता योजनेच्या  माहितीसाठी बैठक . 
अजंठा , कृष्ण हॉस्पिटल जवळ , कर्वे रोड येथे . 
संपर्क - श्रीकांत भोजकर ९ ८ ९ ० ३ ३ ३ ४ १ ४ 

वारजे संध्याकाळी ६ वाजता आदित्य गार्डन  सिटी 
योजनेचा शुभारंभ शोधयात्रा चे लेखक श्री विदुर महाजन यांच्या शुभ हस्ते . 
संपर्क - शाम पाठक ८ ४ ० ८ ८ १ ६ ६ ० ०

रात्री विसावा - रवी वाळेकर , वाकड ९ ८ २ २ ८ ४ ८ ० २ ४ ह्या माझ्या मित्राकडे . 

सोमवार २१ एप्रिल 

तळेगाव दाभाडे सकाळी १० वाजता योजनेच्या  माहितीसाठी बैठक . 
श्रीरंग कला निकेतन हॉल , वनश्री नगर येथे . 
संपर्क - विदुर महाजन ९ ८ २ २ ५ ५ ९ ७ ७ ५

दुपारी १.३० वाजता तोलानी इन्स्टिटुयट येथे योजनेच्या  माहितीसाठी बैठक . 
संपर्क - अतुल पुणतांबेकर ९ ८ ६ ० ३ २ ८ ५ २ ० 

हिंजवडी संध्याकाळी ६ वाजता योजनेच्या  माहितीसाठी बैठक . 
संपर्क - निशांत तेंडोलकर  ९ ९ ७ ० ८ ९ १ ८ १ २ 
 
रात्री विसावा - संजय नाईक , पिंपळे गुरव ९ ६ ७ ३ ० ८ १ ५ ५ ८  ह्या माझ्या मित्राकडे . 

मंगळवार २२ एप्रिल 

कोथरूड सकाळी १० वाजता योजनेच्या  माहितीसाठी बैठक . 
ऋतुरंग , परांजपे स्कूल जवळ , यशवंतराव चव्हाण नाट्यगृहा जवळ. 
संपर्क - यशवंत मांजरेकर  - ८ ८ ० ५ ६ ९ ५ ३ ६ ० 

दुपारी पुण्यातील मान्यवरांच्या गाठीभेटी . 

रात्री विसावा - संदीप पारखे , मार्केट यार्ड  ९ ८ ५ ० ५ ८ ० ४ ८ ९  ह्या माझ्या मित्राकडे . 

बुधवार २३ एप्रिल 

दुपारी ३ वाजता यशदा , पाषाण येथे योजनेच्या  माहितीसाठी बैठक . 
संपर्क - व्यंकटेश कल्याणकर ९ ८ ९ ० १ ० ४ ८ २ ७  

संध्याकाळी ६ वाजता केसरी वाडा, नारायण पेठ  येथे … 
पुण्यातील ५१ व्या ग्रंथ पेटीचे वितरण ग्रंथ दिनाचे निम्मित्ताने . 
माधवी वैद्य , अध्यक्ष , महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या शुभहस्ते . . . 
मानाच्या ५१ व्या ग्रंथ पेटीचे प्रायोजकत्व कराड अर्बन बँकेने स्वीकारले आहे .

रात्री विसावा - अभय पटवर्धन, कोथरूड  ९ ८ ५ ० ८ ३ ९ ३ ७ ९   ह्या माझ्या मित्राकडे . 

गुरवार २४ एप्रिल 

सकाळी ११ वाजता चिंचोली गुरव - संगमनेर येथे ग्रंथ पेटीचे वितरण
संपर्क - किरण झवर , संगमनेर ९ ८ ८ १ १ ९ ९ १ ० ४ 

दुपारी मतदानासाठी नाशिककडे घरी रवाना . . . . . 
 

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने 
पुणे शहर व परिसरात ५१ विविध ठिकाणी अनेक देणगीदारांच्या सहकार्याने 
वाचकांना विनासायास विनामोबदला पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होत आहेत . 
यात आपल्या सहकार्याने वाढ होत राहीलच . . . . . . . .

पुण्यातील ग्रंथ पेट्या दर चार महिन्यांनी वाचकांना बदलून देण्याची जबाबदारी कराड अर्बन बँक यांनी घेतली आहे .
कराड , कोल्हापूर , सोलापूर आणि पुणे या चारही शहरात ग्रंथ तुमच्या दारी योजना ९० ग्रंथ पेट्या द्वारे 
कुसुमाग्रज प्रतिष्टान व कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु आहे .

पुणे शहर व आसपासच्या परिसरातील वाचकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी 
नावनोंदणी कार्यक्रम स्थळी अवश्य करावी . 

संपर्क  - पुणे समन्वयक  :  रवींद्र कांबळे  ९ ८ ५ ० ६ ३ ६ ० ६ १ 
             सहसमन्वयक    :  प्रसाद गुरव  ९ ८ ६ ० १ ० २ ३ ६ २

अधिक माहितीसाठी संपर्क करा. 
विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, 

बुधवार, १६ एप्रिल, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा १८ एप्रिल पुणे

बाणेर येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ … 
प्रतिभा संपन्न लेखिका प्रतिभा रानडे यांच्या शुभ हस्ते . 
शुक्रवार १८ एप्रिल दुपारी  ४  वाजता सोमेश्वर वाडी , बाणेर , पुणे  . 
बी १ श्रीनाथ हेरीटेज , विनायक निम्हण आमदार यांच्या घराजवळ , 
हॉटेल राजवाडा जवळ , सोमेश्वर वाडी , बाणेर ,  पुणे . 
संपर्क -  शैला लिमये  ९८८१२ ५३१०१ 

परिसरातील ग्रंथ प्रेमींनी योजनेत सहभागी होण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे . 
अधिक माहितीसाठी संपर्क करा. 

पुणे समन्वयक : रवींद्र कांबळे   ९८५०६३६०६१ सहसमन्वयक : प्रसाद गुरव  ९८६०१०२३६२ 

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने 
पुणे शहर व परिसरात ४६ विविध ठिकाणी अनेक देणगीदारांच्या सहकार्याने  
वाचकांना विनासायास विनामोबदला पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होत आहेत . 
यात आपल्या सहकार्याने वाढ होत राहीलच . . . . . . . . 

पुण्यातील ग्रंथ पेट्या दर चार महिन्यांनी वाचकांना बदलून देण्याची जबाबदारी 
कराड अर्बन बँक यांनी घेतली आहे . 

कराड , कोल्हापूर , सोलापूर आणि पुणे या चारही शहरात ग्रंथ तुमच्या दारी योजना 
कुसुमाग्रज प्रतिष्टान व  कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु आहे . 

अधिक माहितीसाठी संपर्क करा. 
विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, 
99 22 22 5777. vinran007@gmail.com

मंगळवार, १५ एप्रिल, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा २३ एप्रिल ग्रंथ दिन पुणे

२३ एप्रिल ग्रंथ दिन या निमित्ताने ग्रंथ वाचनाचा छंद लाऊन घेऊया
प्राजक्त फुले ओवताना दोरा आरक्त व गंधित होतो
त्याच प्रमाणे ग्रंथातील निर्जीव अक्षरे मन संजीवन करतात 
आपल्या नशिबाने ---
     आली विनायकाची स्वारी । ग्रंथ घेउनी तुमच्या द्वारी ।
  महान आणि महाग ग्रंथ अगदी सहज आपणास मिळतील घरातील एक कोपरा सजवा
ग्रंथांनी  आणि मन भरा ज्ञानांनी 
विचारांनी ! ग्रंथ वाचक नाही तर ग्रंथ याचक बनूया ! तर मग उशीर का ?
एकच अट   करा गट !
       वाचनानंद = ब्रह्मानंद !
    संपर्क --- विनायक रानडे -- ९९२२२२५७७७
  उन्नती गाडगीळ


बुधवार, ९ एप्रिल, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा १२ आणि १३ एप्रिल

ग्रंथ दौरा  . . . . . . १२ आणि १३ एप्रिल भिवंडी , antop hill , ठाणे . . . . 

शनिवार १२ एप्रिल सकाळी ११ वाजता  भिवंडी , योजनेविषयी माहिती साठी बैठक . 
संपर्क - महेंद्र पटले ९६०४४ ९३५५५

रविवार १३ एप्रिल सकाळी  १० वाजता सेक्टर ७ ,antop hill , मुंबई , 
योजनेविषयी माहिती साठी बैठक . 
संपर्क - अमिता  नेरकर ९८६०० ८१२०० . 


सोमवार, ७ एप्रिल, २०१४

पुस्तक वाचन प्रतिक्रिया - नागपूर

शोधयात्रा - लेखक श्री विदुर महाजन, पुणे . 

     मराठी नव वर्ष आरंभ होताना  पेटीतील एक उत्तम पुस्तक हातात पडले. भ्रष्टाचार व अन्याय स्वतः वर वा समाजातील इतरावर होत असताना लेखकाने त्याचा पुढे होऊन विरोध करणे  मनाला फारच भिडते. 
     प्रत्येक प्रसंगात आपण इतके एकरूप होऊन जातो, असे अनेक विदुरजी तयार होणे हि समाजाची गरज आहे , मुख्य म्हणजे लेखक स्वतः उत्तम कलाकार, उत्तम सतार वादक आहेत . झाडे लावण्याची आवड आहे त्यांना, पण त्या मागचा त्यांचा एक उदात्त हेतू पण खूप महत्वाचा आहे .आपण वापरत असलेला प्राणवायू पण त्या निमित्ताने वसुंधरेला परत करणे. 

    पुस्तकावर त्यांचा फोन  नंबर  असल्याने त्यांच्याशी संपर्क साधता आला , नविन अनोळखी नंबर  त्यांनी उचलला आणि पुस्तकात पानोपानी  प्रत्ययास येत असलेल्या आत्मीयतेशी ओळख घट्ट झाली . 

    हा उपक्रम  वाचकाला वाचनासाठी उत्तम उत्तम पुस्तकेच उपलब्ध करतो असे नाही तर  आज पर्यंत उपलब्ध न झाल्येल्या असंख्य पुस्तकांसोबतच लेखक व वाचक यांच्यात पण संवाद घडवून आणतो अशी प्रचीती आली

सुषमा पांडे - तात्या टोपे नगर जोग हाउस नागपूर 

शनिवार, ५ एप्रिल, २०१४

पेण समन्वयक प्रतिक्रिया


पेणच्या पुस्तक पेटीत (ग्रंथ तुमच्या दारी  या उपक्रमात) सामील होऊन वर्षंही झाले नसेल. पण सुरुवातीलाच कबुल केल्याप्रमाणे कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने दर चार महिन्यांनी नवीन पुस्तकांची पेटी आमच्या दारात आणून ठेवली आहे. ई-बुक्स आणि इंटरनेटच्या जमान्यात सुध्दा मला वाटतं पुस्तकांचे महत्व अबाधित आहे आणि ते नवीन पिढीपर्यन्त पोचवणं आवश्यक आहे. आणि नुसतेच वाचन संस्कृती संपत आली लोकं हल्ली वाचत नाहीत असे गळे काढण्यापेक्षा प्रत्यक्ष लोकांमधे जाऊन वाचनाच्या आवडीला हातभार लावणे जास्त कठीण आहे. हा उपक्रम हा जगन्नाथाचा रथ आहे आपण सगळ्यांनीच आप-आपल्या परीने कामाला हातभार लावायला हवा आहे. त्या दृष्टीने मला सांगायला खूप अभिमान वाटतो की गेले दोन महीने आमच्या पेणमधील स्वयंसेवक वाचकांनी पेटीची जबाबदारी आठवड्यातील दोन वारी वाटून घेतली आहे. गोखले,घाटे,भट,जोशी,टकले अशा सर्व जणी आळी-पाळीने या उपक्रमासाठी वेळ देत आहेत. मुळात पहिल्या पेटीचे प्रायोजकत्व ही सुद्धा एका दानशुराची मिरासदारी नव्हती तर संपूर्ण लोकसहभागातून जमलेले होते हेही उल्लेखनीयच आहे.

 सावनी गोडबोले 
 समन्वयक 
 पेण वाचक कट्टा