सोमवार, १० नोव्हेंबर, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी लोकसत्ता ६ जुलै २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दुबई - टाईम्स ऑफ इंडिया २० जून २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दुबई २४ जुन २०१४ लोकमत वर्तमानपत्र
ग्रंथ तुमच्या दारी दौरा २३ नोव्हेंबर २०१४

बेंगलोर येथील मराठी वाचकांसाठी 
ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ 

रविवार २३ नोव्हेंबर २०१४ रोजी 
संध्याकाळी ४.३० वाजता 

प्रथितयश लेखिका सानिया यांच्या शुभहस्ते 

क्लब हाउस हॉल , श्रीराम सहना , 
BMSIT कॉलेज समोर ,
दोड्डाबल्लपुर रोड , 
येलहंका , बेंगलोर - ६४ येथे . 

बेंगलोर येथील सावनी आपटे या साठी समन्वयक म्हणून पुढाकार घेत आहेत . 
बेंगलोर येथील इच्छुक वाचकांनी सहभागासाठी शुभारंभास अवश्य उपस्थित राहावे, 
आपल्या परिचित बेंगलोर येथील वाचकांना माहिती देवून 
योजना विस्तारास सहकार्य करावे हि विनंती . 

सावनी आपटे ९८ ८० ५० २० ७७ 
Savani Apte 98 80 50 20 77 savani.apte24@gmail.com
समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी , बेंगलोर 

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०१४

माझे ग्रंथालय पुणे शुभारंभ ५ नोव्हेंबर २०१४बुधवार ५ नोव्हेंबर २०१४ रोजी सायंकाळी ६:३० ते ७:३० 
विष्णूजी कि रसोई 
म्हात्रे पुलाजवळ सिद्धी गार्डनच्या पुढे पुणे - ५२ येथे . 
योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्या वाचक मित्रांबरोबर सहभागी व्हा . 

दिवाळी, वाढदिवस निमित्त माझे ग्रंथालय ( ग्रंथ पेटी ) आपल्या आवडत्या वाचकास भेट  म्हणून द्या .

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : 

विनय जोगळेकर , समन्वयक , माझ ग्रंथालय , पुणे  विभाग . 
९३ ७० २६ ०० ५२ , ९४ २२ ४४ ९८ ८७  vinayjoglekar11@gmail.com

ग्रंथ तुमच्या दारी दौरा पुणे ४ - ५ नोव्हेंबर २०१४


पुणे येथे ग्रंथ पेट्यांचे वितरण दौरा ४ व ५ नोव्हेंबर 
पेटी क्रमांक ७५ ते ८० एकूण ६ पेट्या . . . . 
ग्रंथ तुमच्या दारी योजनेत पुण्यात आता ८० ग्रंथ पेट्या . 

मंगळवार  ४ नोव्हेंबर  ३:३० वाजता 
रक्षक नगर ओल्ड बी ४०१ राडीषण हॉटेल मागे खराडी पुणे  
आयोजक :-  रावसाहेब खेडकर ९४२२०२९४२१ 

मंगळवार  ४ नोव्हेंबर  ६  वाजता 
सी - ७०१ शिंदे पार्क हौसिंग सोसायटी  शिवणे पुणे 
आयोजक :-  श्रीराम गजानन कुलकर्णी ९६८९७९०१०५

मंगळवार  ४ नोव्हेंबर  ७:३० वाजता 
सर्वे न. ११ ग्रीन पार्क सोसायटी प्लॉट न. ९ हरीस्मित बंगला 
ऑफ सनसिटी रस्ता  पुणे 
आयोजक :-  संजय थिटे  9423561236 

बुधवार  ५ नोव्हेंबर  ४ वाजता 
रास नगर पिरंगुट पोलीस चोकी जवळ पौड रस्ता पिरंगुट 
आयोजक :- अमोल पाठक ९२२५५४४९८१  


नेदरलॅंडमध्ये फडकणार मराठी ग्रंथसंपदेचा झेंडा

नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानने वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी सुरू केलेला "ग्रंथ तुमच्या दारी‘ उपक्रम महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, सिल्व्हासा मार्गे दुबई, ओमान, बहारिनमध्ये पोचलायं. हाच उपक्रम आता पुढचं पाऊल टाकत असून कथा, कादंबरी, विनोदी, रहस्य, व्यक्तिचरित्र, अनुवादित असे विविध प्रकारचे साहित्य प्रकार नेदरलॅंडमध्ये पोचणार आहेत. त्यासाठी नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने पुढाकार घेतलाय.
मुंबईमधील गौरी आणि विनय कुलकर्णी हे नेदरलॅंडमध्ये स्थायिक झाले आहेत. या दाम्पत्याने मराठी माणसांसाठी आपल्या आवडत्या साहित्यिकांची ग्रंथसंपदा उपलब्ध व्हावी, अशी विनंती प्रतिष्ठानच्या वाचनालय समितीचे अध्यक्ष विनायक रानडे यांना केली. त्यानुसार प्रत्येकी 25 ग्रंथसंपदेच्या 12 पेट्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रानडे हे नेदरलॅंडमध्ये पोचवणार आहेत. त्यातील आठ पेट्या नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने प्रायोजित केल्या आहेत, तर चार पेट्यांची भेट नाशिकमधील उद्योजक श्रीरंग सारडा यांच्या देणगीतून दिल्या जाणार आहेत. उपक्रमाची मुहूर्तमेढ 2009 मध्ये 11 पेट्यांनी नाशिकमध्ये रोवली गेली. आतापर्यंत वाचन संस्कृतीची हीच चळवळ 521 पेट्यांपर्यंत पोचली असून ग्रंथसंपदा सव्वाकोटी रुपयांची झाली आहे. महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी विविध महाराष्ट्र मंडळे हा प्रकल्प राबवत आहेत. त्यात मात्र नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने वाचन संस्कृतीला बळकटी देणारा उपक्रम राबवण्याचे ठरवले, असे सांगून रानडे म्हणाले, की नेदरलॅंडमध्ये सुरू होणारी ही वाचन संस्कृतीची चळवळ युरोपभर विस्तारित होणार आहे.