बुधवार, १८ फेब्रुवारी, २०१५

ग्रंथ तुमच्या दारी सुवर्ण ग्रंथ पेटी सोहळा ८ फेब्रुवारी २०१५ गोरेगाव मुंबई पश्चिम विभाग - प्रज्ञा प्रबोधिनी शाळा सभागृह दुपारी ४ ३० वाजता सोहळा वृतांत, फोटो, अशोक नायगावकर भाषण

        ग्रंथ तुमच्या दारी सुवर्ण ग्रंथ पेटी सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यातील मुख्य मान्यवर हास्यकवी अशोक नायगावकर , कुसुमाग्रज प्रतिष्ठान अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक , वामन हरी पेठे ज्वेलर्स चे विश्वनाथ पेठे , कुसुमाग्रज प्रतिष्ठान विश्वस्त विनायक रानडे. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते गणेशपूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन केला गेला. श्री. मधु मंगेश कर्णिक यांचा सत्कार श्री अशोक काणे यांनी केला. श्री अशोक नायगावकर यांचा सत्कार श्री मेजर शिरीस्कर  यांनी केला. श्री विश्वनाथ पेठे यांचा सत्कार श्री. श्रीकांत जोशी यांनी केला. श्री विनायक रानडे यांचा सत्कार घनश्याम देठके यांनी केला. तसेच काही विशेष व्यक्तींचा हि सत्कार झाला. श्री राहुल काळे यांचा सत्कार श्री अशोक नायगावकर यांनी केला. श्रीमती शुभदा चौकर यांचा सत्कार मधु मंगेश कर्णिक यांनी केला. श्री सुहास कबरे यांचा सत्कार श्री विनायक रानडे यांनी केला.                              
        मान्यवरांचा सत्कार झाल्यावर डॉ  महेश अभ्यंकर (ग्रंथ तुमच्या दरी मुंबई पश्चिम विभाग मुख्य समन्वयक ) यांनी ग्रंथ  तुमच्या दारी  योजनेचा आढावा घेतला. या योजनेबद्दल सांगताना ते म्हणाले कि हि योजना यशस्वी होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत.त्यतिल सगळ्यात महत्वाचे म्हणजे वाचक , देणगीदार आणि समन्वयक  यांचा उत्तम प्रतिसाद लाभल्यामुळे  २ वर्षात ५० पेट्या  निर्माण होऊ शकल्या . कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पाठींबा  आणि विनायक रानडे यांच्या कल्पक नेतृत्वामुळे हे सगळे शक्य होऊ शकले. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट वाचन संस्कृती रुजवणे आणि वाढवणे असे आहे आणि या वाढत्या प्रतिसादाने हे मुंबई करांनी सिद्ध केले आहे कि उत्तम योजनेला ते भरपूर प्रतिसाद देतात. या आढाव्यानंतर विश्वनाथ पेठे यांच्या हस्ते या योजनेतील समन्वयकांचा   सत्कार सन्मान भेट देऊन झाला. ५० पेंकी ३५ समन्वयक उपस्थित होते त्यांचा सत्कार झाला. त्याशिवाय अंजली गोखले (ग्रंथ तुमच्या दारी  ब्लॉग समन्वयक ), श्री पांडुरंग गुरव (तुतारी वादक) , श्री राम शरण पाल (ग्रंथ तुमच्या दारी पेटी वाहक ) यांचा हि सत्कार झाला. 
      विनायक रानडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त  करताना सांगितले कि . ही  योजना हे  सर्वसामान्य व्यक्तींनी एकमेकांसाठी आणि एकमेकांकारिता मिळून केलेले काम आहे. लेखक ,पुस्तक, वाचनालय आणि वाचक हि एक साखळी आहे. अशी योजना वाचकांपर्येंत   पुस्तक पोचवण्याचे काम करते . या योजनेबद्दल सांगताना ते म्हणाले कि   ही  योजना ७ फेब्रुवारी २००९ रोजी नाशिक येथे सुरु झाली. या योजनेला आता ६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या योजने अंतर्गत माझे ग्रंथालय  ही  योजना ३१ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे येथे पहिल्यादा सुरु झाली आणि ७ फेब्रुवारी २०१५ रोजी माझे ग्रंथालय बाल विभाग  ही  योजना नाशिक येथे सुरु करण्यात आली. या योजने मुळे वाचन संस्कृती वाढीस लागली आणि विविध विषय जे पूर्वी हाताळले जात नव्हते अशी  ही  पुस्तके वाचली जाऊ लागली आहेत. त्यानंतर त्यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे घेतल्या जाणार्या साहित्य भूषण परीक्षेची माहिती दिली व प्रतिष्ठान तर्फे दिल्या जाणारया जनस्थान  पुरस्कार (२७ फेब्रुवारी २०१५) आणि वाचक मेळावा (८ मार्च २०१५ ) यांचे वाचकांना निमंत्रण दिले. त्याच बरोबर मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते डॉ  महेश अभ्यंकर यांचा कुसुमाग्रज यांचे चित्रमय चरित्र देऊन सत्कार केला.तसेच सौ संपदा अभ्यंकर (डॉ महेश अभ्यंकर पत्नी) यांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.  
       प्रीतम धुमाळ यांनी या योजनेत सामील झालेल्या देणगीदारांची माहिती देऊन त्यांचे आभार मानले. 
       विश्वनाथ पेठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि मी येथे वाचकांतर्फे मनोगत करत आहे . ग्रथ पेटीची  ही योजना अतिशय भन्नाट आहे. ती योजना सुरु करणारे  श्री विनायक रानडे यांना धन्यवाद दिले आणि या योजनेत सहभागी झालेल्या समन्वयकांचे    ही  आभार मानले . शेवटी  ते असे म्हणतात कि मराठी भाषा  ही  आपल्या आईसारखी आहे तिच्यावर प्रेम करायला कुणी सांगावे लागत नाही . 
         विश्वनाथ पेठे यांच्या भाषणानंतर सुवर्ण ग्रंथ पेटी निम्मित केलेल्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. तसेच बबन सावंत यांच्या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. 
         त्यानंतर हास्यकवी अशोक नायगावकर यांनी त्यांच्या हास्य कविता सादर केल्या. त्यांच्या भाषणात ते म्हणाले कि मराठी भाषा संवर्धन  ही  एक सामुहिक जबाबदारी आहे. सरकारने विविध राज्यातील मराठी मंडळांना दिवाळी अंक भेट द्यावेत , उद्योजकांनी साहित्यिक ,कवी   यांना  त्यांच्या कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व द्यावे यांनी मराठी संस्कृती जतन होईल. परदेशात आपल्या मराठी पण जपण्यासाठी खास प्रयत्न होताना दिसतात तसे इथे ही  व्हावे असे त्यांनी व्यक्त केले. मराठी चा खाद्यकोश आता लवकरच प्रकाशित होईल त्याबद्दल त्यांनी मधु मंगेश कर्णिक यांचे अभिनंदन केले. सध्या तरुण पिढी वाचन करण्यापासून दूर जाते आहे याची खंत वाटते आहे. असे नमूद करताना ते म्हणाले कि साहित्याचे महत्व खूप मोठे आहे . त्याचे नुसते प्रकाशन करून उपयोग नाही तर ते वाचकांपर्येंत  ते पोचवणे फार गरजेचे असते.कॉर्पोरेट सेक्टर ज्याप्रमाणे त्यांची उत्पादने ग्राहकापर्येंत पोचवतात तसेच  ग्रंथ तुमच्या दारी  ही योजना हे काम अगदी चोख करत आहे हे नमूद करून त्यांनी विनायक रानडे आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान चे आभार मानले.   
             कुसुमाग्रज प्रतिष्ठान चे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी विश्वस्त विनायक रानडे यांच्या कार्याचा ग्रथ विनायक असे म्हणून गौरव केला.  साहित्यामधून समत्व, ममत्व आणि एकत्व समाज होऊन देवत्वाची प्रचीती येउन चांगले साहित्य घडून येते. त्यांनी  कार्यक्रमासाठी  छान प्रतिसाद दिल्याबद्दल   गोरेगावकरांचे खास आभार मानले व कौतुक केले.  
            त्यानंतर ग्लोबल मालवणी या संस्थेचे सचिन आचरेकर यांनी आपल्या संस्थेचा थोडक्यात परिचय करून दिला. आणि त्यांच्या पुस्तक दान योजनेची माहिती दिली. वाचकांकडे असलेल्या सुस्थितील पुस्तके त्याने संस्थेला दान करावी असे आवाहन त्यांनी केले.  ही पुस्तके खेडेगावात नवीन वाचनालय उभे करण्यासाठी उपयोगी पडतील असेही त्यांनी सांगितले 
          
या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर निवदेन श्रीमती माधुरी गोडबोले यांनी समर्पक शब्दात केले. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट म्हणजे पांडुरंग गुरव यांचे तुतारी वादन.मुख्य मान्यवरांचे आगमन , समन्वयकांचा   सत्कार  आणि स्मरणिका प्रकाशन या वेळी तुतारीवादन करून त्यांनी सुंदर सलामी दिली. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यामध्ये डॉ. महेश अभ्यंकर, श्री. अशोक काणे, श्रीमती  माधुरी गोडबोले, सौ. जयश्री पराडकर, श्री. घनश्याम देठ्के, श्री बंडू बेडेकर, डॉ हेमंत बेलसरे, मेजर शिरीस्कर आणि त्यांचे सहकारी यांचा सहभाग होता. स्मरणिका प्रकाशित करताना अनेक देणगीदार व्यक्तीचा सहभाग लाभला. त्याशिवाय वाचकांचे लेख आणि कविता यात प्रसिदध झाले आहेत.

          आभारप्रदर्शन झाले आणि श्रीमती माधुरी गोडबोले यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.   

अशोक नायगावकर भाषण 

https://soundcloud.com/granthvinayak/ashok-naygavkar-speech-part-1

https://soundcloud.com/granthvinayak/ashok-naygavkar-speech-part-2


सोहळा फोटो 

https://www.youtube.com/watch?v=TxsZQnVrRqI





गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०१५

माझे ग्रंथालय बाल विभाग









माझ ग्रंथालय , बालविभाग , नाशिक शुभारंभ शनिवार ७ फेब्रुवारी सायं ५ वाजता नाशिक

माझ ग्रंथालय , बालविभाग , नाशिक 
शुभारंभ शनिवार ७ फेब्रुवारी सायं ५ वाजता 
कुसुमाग्रज स्मारक , गंगापूर रोड , नाशिक येथे 
२५ ग्रंथ पेट्या प्रत्येकी १५ मराठी व १० इंग्रजी अशी एकूण २५ पुस्तके 
दर दोन महिन्यांनी आपापसात बदलणे … 
सभासद होण्यासाठी देणगी मुल्य . 
साहित्याचा खजिना असलेली फिरती ग्रंथ पेटी 
मुलांना वाढदिवसाला भेट देण्यासाठी ऊतम . 
समन्वयक : स्वाती गोरवाडकर ९८२३३ १३४६४ Swati Puranik Gorwadkar