मंगळवार, २८ जानेवारी, २०१४

समन्वयक यादी

एकूण ग्रंथ पेट्या -४५१

महाराष्ट्र,गुजरात,नवी दिल्ली,सिल्वासा 


 महाराष्ट्र -



 नाशिक  - ७९ - अरुण नातू  ९८२२७९३३६६
सिन्नर - अनिल देशपांडे ७५०७५०९२७०
संगमनेर - मनीष देशमुख ९८२२४२६८१५
सताना  -  रवींद्र अहिरे ९४२२७५०११३
मालेगाव  - दिपक पगारे ९५६१६९२३८८
येवला- सुनिता मेथा ९२२६८८८२०२
हरसूल - ११ देविदास जाधव ९०११८४८८८९
अहमदनगर -६ पी डी कुलकर्णी ९८५००५७२२२
सात्रळ   -  नामदेव कदम ९०४९६८७०५५
राहता   - राजेंद्र बर्डे  ९६३७४८३४४१
कोल्हार  - केशव भगत ९८२२५६५७९२
औरंगाबाद  - १३ अनघा पाटील ९८२२०९७२६४
जालना - रावसाहेब देशपांडे ९८२३७४६९८७
पुणे - ४४  रवींद्र कांबळे ९८५०६३६०६१
पिंपळे गुरव -  माधवी गोळे ८१४९८२७६८६
चिखली - चैताली आहेर ९३७०३१३९८३
मोशी -  शांताराम आल्हाट ९६०४०४१९४७
माणिकडोह - संतोष ढोबळे ९९७५५७१४४८
ओतूर - गोविंद डुंबरे ९८६०१४१८६०
वाई - ११ - बाबुराव शिंदे ९४२२४०१०९७
सातारा - ११ - गीता जठार ९९६०६९७२६३
कराड  -१७  - विद्याधर गोखले ९८५०८८४४३४
शिराळा -  अभिजित भंडारे ९७६३७०७३४६
इस्लामपूर  -राजेश पाटील ९८५००५०६१८
येळगाव -  दादासो शेवाळे ९८६०३१८८३३
फलटण -५ - संभाजी निकम ९८५००५०६१५
कोल्हापूर - ८  -मंजुषा लिंगसूर ९८९०९४०४४२
सोलापूर - ८  -  विजय चव्हाण ९८५००५०६२७
सांगली - ११ - अरुण दांडेकर ९८२३१८००७०
मिरज - सुधीर गोरे ९४२३८७१००८
नागपूर १३   - सुषमा पांडे ९७६६५८९१२८
जळगाव  -११ - मंजुषा भिडे ९४२०५५९२६०
धुळे -७ -अजय कासोदेकर ९४२२७८९६८२
कोकण -२७ संजय नाईक ९६७३०८१५५८
पनवेल- विनय भावे ९६१९०३६१७१
रसायनी - वसुधा सहस्रबुद्धे ८१४९६७२८९८
कर्जत  -गायत्री परांजपे ८१४९६४०७४१
पेण - विनायक गोखले ९३२२५०७९४३
वडखळ - डॉक्टर तुषार गावंड ९०११३४७६५१
वावोशी-  ओंकार  जोशी ९४२३८९३१२३
अलिबाग - दीप्ती जोशी कुलकर्णी ९४२२३५२३४२
महाड - शरद गांगल ९४२२०९५०६२
रोहा  -मंदार भावे ९२२६६५९०६९
चिपळूण - मंगला अलोरे ९४२११४१२९२
रत्नागिरी - आनंद जोशी ९४२११७९०३६
दापोली - प्रविणा दांडेकर ९४२२९९८८६७
देवरुख - रुबिना चव्हाण ९७६९९८७३८३
वेळणेश्वर - प्रल्हाद गोखले ९७६४८७८११६
लोणावळा - राधिका भोंडे ८८०६६६२७०८
माणगाव - मोहन दोशी ९५२७५९४२५५
डोंबिवली -१४  - संगीता ताम्हणकर ९७६९१४०५७९
 कल्याण -१२ - डॉक्टर मंजू राठोड ९८१९२४१९१०
बदलापूर  डोंबिवली नागरी सहकारी बँक शाखा ०२५१/२६७१३७०
अंबरनाथ  डोंबिवली नागरी सहकारी बँक शाखा ०२५१/२६०२६६१
कर्जत  डोंबिवली नागरी सहकारी बँक शाखा ०२१४८/२२३९१९-२०
शहापूर  डोंबिवली नागरी सहकारी बँक शाखा ०२५२७/२७०७७३
खोपोली  डोंबिवली नागरी सहकारी बँक शाखा ०२१९२/२६६४१५
              रवींद्र घोडके ९२२५९१६७७४

ठाणे/नवी मुंबई - ५२ रश्मी जोशी ९८६९४६५१४४
कळवा - सुभाष बीडकर ९९३०२२०९०९
खारघर - रसिका गुळवणी ९३२०५९३६७३
घणसोली - जगदीश खेरालीया ९७६९२८७२३३
बेलापूर-  माधुरी कवीश्वर ९८१९३३१३२२
सानपाडा - मो सी पेठे ९८३३४२१३४१
नेरूळ - डॉक्टर शंकर किंजवडेकर ९८२०६३९७७३
कुलाबा - दीपा शाह
मुंबई (पु) -१७ विनायक जोगळेकर ९८६९९२९४७४
भांडूप - दत्ता डोंगरे ९९२००७३८०४
घाटकोपर - सायली नवरे ९९६९४७२१३९
चुनाभट्टी - रवींद्र कानडे ९८६९९८९४०३
मुंबई (प) -३५ महेश अभ्यंकर ९८२०४५०९८६
मालाड - अशोक काणे ९८६९२४०५२६
अंधेरी - मेजर अरुण शिरिसकर ९२२३२९१५५५
विलेपार्ले - सलिल लेले ९८६९४७२३४४
कांदिवली - वृषाली ओझलकर ९८६७४९७५८६
दादर - माधुरी गोडबोले ९८२०६५२२११
बोरीवली - सचिन मोरे ९५९४९४६१२५
भाईंदर - सचिन मांजरेकर ९८९२०७७७७९
हाजीअली - ए व्ही गुजराथी ९८६९७९१२८४
पवई - जयश्री पराडकर ९८९२४२७५५३
वसई -१२- अशोक कोलासो ९९२२४१२००४

 गुजरात 

बडोदा  - ९ - मिलिंद बोडस ९९९८००४९४३
अहमदाबाद - बळवंत पेठे  ९७१४९९१४०४
नवसारी -माधवी कर्वे ९४२६८८८२७८
सुरत - मदन साठे ९७२४३१२१२५
बलसाड -प्रदीप हळबे ९८२४५०८०२५
सिल्वासा -मधुवंती गोडसे ९९०९९७५५६७

नवी दिल्ली  -११ क्षमा पाठक ८८२६१५८५४१

आदिवासी पाडे -हरसुल ,त्रंबकेश्वर
कारागृह - नाशिक,ठाणे, येरवडा, नागपूर  

ग्रंथ तुमच्या दारी

प्रसिद्धी


  • ब्लॉग
  • महितीपत्रक
  • पेटी समन्वयक
  • वाचक
  • रेडीओ
  • फेसबुक
  • ट्वीटर
  • वर्तमानपत्र 



बाल विभाग

बाल विभाग

 Childrens books

प्रकाशक -पेटी प्रायोजक

प्रकाशक -पेटी प्रायोजक 


  1.  पॉपुलर प्रकाशन 
  2. मौज प्रकाशन 
  3. मेहता पब्लिशिंग हाउस 
  4. कॉन्टिनेन्टल प्रकाशन
  5. राजहंस प्रकाशन 
  6. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस 
  7.  साकेत प्रकाशन 
  8. ग्रंथाली प्रकाशन 
  9. डिम्पल प्रकाशन 
  10. डायमंड प्रकाशन
  11. राजा प्रकाशन 
  12. लोक वांग्मय गृह प्रकाशन 
  13. ऋतुरंग 
  14. मनोविकास प्रकाशन 
  15. केशव भिकाजी ढवळे

प्रायोजक संस्था

मुख्य प्रायोजक संस्था 


  1. ठाणे /नवी मुंबई - ठाणे जनता सहकारी बँक लिमिटेड 
  2. डोंबिवली - कांचन गौरी महिला पतसंस्था 
  3. कल्याण - डोंबिवली नागरी सहकारी बँक 
  4. मुंबई (पु ) - महाराष्ट्र सेवा संघ 
  5. मुंबई प  - गोरेगावकर नागरिक 
  6. सातारा - दि गुजराथी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी 
  7. कराड - दि कराड अर्बन को ओप बँक लिमिटेड 
  8. वाई -मदनदादा भोसले मित्र मंडळ 
  9. कोल्हापूर -  दि कराड अर्बन को ओप बँक लिमिटेड 
  10. सोलापूर - दि कराड अर्बन को ओप बँक लिमिटेड 
  11. जळगाव - स्व वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान 
  12. हरसुल - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान 
  13. धुळे - देवरे आय एन टी  रुग्णालय 
  14. कोकण - निसर्ग टूर्स प्रायवेट लिमिटेड नाशिक
  15. औरंगाबाद -दिलासा जनविकास प्रतिष्ठान 
  16. पुणे -दि कराड अर्बन को ओप बँक लिमिटेड 
  17. सांगली - आभाळमाया फाउंडेशन 
  18. नागपूर - जोग हॉस्पीट्यालिटी प्रा लि 
  19. अहमदनगर - रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग 
  20. बडोदा - मराठी वान्ग्मय परिषद 
  21. दिल्ली - सार्वजनिक उत्सव समिती 

कौतुक

नामवंत ज्यांनी ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाचे कौतुक केले 


 द मा मिरासदार
शं ना नवरे
फ मु शिंदे
अनिल अवचट
अच्युत गोडबोले
 भारती विकास आमटे
नीलिमा बोरवणकर
जयराम कुलकर्णी
मृणाल कुलकर्णी
मिलिंद इंगळे
जब्बार पटेल
भालचंद्र नेमाडे
गिरीश कर्नाड
सुनील बर्वे
सचिन खेडेकर
गिरीश कुबेर
राजन गवस
वीणा गवाणकर
सिसिलिया कार्वालो
शरद पोंक्षे
नेहा जोशी दातार
चंद्रशेखर टिळक
डॉक्टर  विजय भटकर
अरुण नायगावकर
मंगेश पाडगावकर


व्हिडिओ

ग्रंथ तुमच्या दारी दौरा 30-31 jan


कुसुमाग्रज प्रतिष्ठान

कुसुमाग्रज प्रतिष्ठान

http://gtdkusumagraj.org/en/idea/

http://www.kusumagraj.org/

सोमवार, २७ जानेवारी, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी


ग्रंथ तुमच्या दारी
सुनील हिरवे - मंगळवार, १६ नोव्हेंबर २०१०
वाचनसंस्कृती रुजावी यासाठी  कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ (मोफत) या उपक्रमांतर्गत वाचकप्रेमींच्या घरी जाऊन पुस्तके  देण्याचा उपक्रम राबवला जात आहे . या आगळ्यावेगळ्या उपक्रमाविषयी..
‘वाचन म्हणजे प्रियजनसंगे विमानातूनी हिंडत जाणे’ कवी गिरीश यांच्या प्रतिभास्पर्शातून अक्षरबद्ध झालेले काव्य बरेच काही सांगून जाते. आज या ओळीची सत्यता किती लोकांना पटते आणि किती लोक असा आनंद मिळविण्यासाठी झटतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुस्तक माणसाला नक्की देतात तरी काय, या प्रश्नाचं उत्तर एकच ठोसपणे काही देता येईल असं नाही. व्यक्तीपरत्वे या उत्तरात भिन्नता असू शकते, पण पुस्तक जे काही देतात ते मात्र चांगलंच असतं, यात कोणाचेही दुमत होण्याचे कारण नाही. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती नवे वळण घेत आहे.
इंटरनेटमुळे वाचन संस्कृतीला नवीन अर्थ मिळू लागला आहे. पुस्तकरूपाने कथा-कादंबऱ्यांऐवजी त्या कॉपी नेटवर कुठे मिळते का? हे गुगलिंग करणारी अनेक मंडळी आहेत. मात्र प्रत्यक्ष पुस्तकातून साहित्य वाचण्याची मजा आणि अनुभव काही औरच आहे. अशा परिस्थितीतही वाचन संस्कृतीतून नागरिकांचा संवाद वाढावा याकरिता पुण्यातील शासकीय फोटोझिंको मुद्रणालय येथे उच्च पदावर व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या रुपेंद्र मोरे यांचे प्रयत्न सुरु आहेत. मूळचे नाशिकचे असलेले रुपेंद्र मोरे यांचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानशी पूर्वीपासून संबंध  होता. त्यांचे परममित्र विनायक रानडे यांनी प्रथमत: ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम नाशिक येथे सुरू केला. कुणी तरी म्हटलं आहे की, माणसाला मिळणारी कुठलीही संधी ही छोटी असते, पण भविष्यात तिचा परिणाम खूप मोठा असतो. नाशिक येथे शासनाच्या साहाय्याने कुसुमाग्रज स्मारक व वाचनालय उभे राहिलेली वास्तू ही महाराष्ट्राच्या दृष्टीने प्रेरणादायी निश्चितच ठरली आहे. हा खरोखर मराठी साहित्यप्रेमींना मिळालेला मान आहे, असे वाटते. नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानने ग्रंथ तुमच्या दारी हा सुरू केलेला उपक्रम बघून रुपेंद्र मोरे यांनीदेखील शासकीय सेवा करीत असताना सामाजिक बांधीलकी जोपासून वाचन संस्कृती व नागरिकांचा संवाद वाढावा म्हणून हा उपक्रम पुण्यात  सुरू केला. पुस्तके घरपोच पोहोचवून हा अनुभव देण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असून, ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या त्यांच्या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. अवघ्या तीन महिन्यांमध्ये प्रतिष्ठानकडे २५ ग्रंथपेटय़ा तयार असून सध्या ८० सामाजिक संस्था ही ग्रंथपेटी मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत.
पुण्यातील उपक्रमाची सुरुवात केसरीवाडय़ापासून झाली.  न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी हे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष असून, त्यांनी स्वत: एक ग्रंथपेटी भेट दिली. ग्रंथपेटी शुभारंभ कार्यक्रमात न्यायमूर्तीनी सांगितले की, सध्या घरे धर्मशाळेसारखी व पंचतारांकित हॉटेलसारखी झाली आहेत. घरातलं घरपण जोपासायचं असेल तर माणसामाणसातील भावनिक गुंतागुंत टिकवून ठेवायची असेल तर वाचन गरजेचे आहे. म्हणून कदाचित जगातील पहिल्या ग्रंथालयास ‘आत्मरुग्णालय’ असे म्हणत.  जब्बार पटेल यांनीही पुण्याला ग्रंथालय वाचन संस्कृतीची मोठी परंपरा आहे, असे विचार मांडले. या उपक्रमाकडे बघून प्रेरित झालेले शैलेश टिळक (लोकमान्य टिळक यांचे वंशज) यांनी लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ एक ग्रंथपेटी भेट दिली.
‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमांतर्गत शंभर पुस्तकांची ग्रंथपेटी दोन महिन्यांसाठी ज्येष्ठ नागरिक संघ, बचत गट, सोसायटी, सामाजिक मंडळ, महिला मंडळ, सामाजिक संस्था अगदी घरापर्यंत विनामूल्य पोहोचविली जाते. या उपक्रमांतर्गत शंभर वेगवेगळ्या पुस्तकांची पेटी तयार करून शहरातील विविध भागांतील सेवाभावी संस्था आणि व्यक्तींची निवड करून प्रत्येकाकडे एक पेटी सुपूर्द केली जाऊन त्या-त्या परिसरातील वाचकांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. पुस्तकांसाठी फी आकारण्यात येणार नसली तरी त्या पुस्तकांची जबाबदारी त्या ठिकाणच्या पालक संस्था अथवा केंद्रप्रमुखाची राहते. दर दोन महिन्यांनी या पेटीतील पुस्तके बदलली जातात. आतापर्यंत प्रतिष्ठानने साधना कला मंच (कोथरूड), अक्षरस्नेह वाचनालय (धायरी), बोपोडी ज्येष्ठ नागरिक संघ, सहकारनगर सोसायटी, ज्ञानेश्वरी महिला बचतगट (चिंचवड) या ठिकाणी ग्रंथपेटय़ा वितरित केल्या आहेत. शासकीय फोटोझिंको मुद्रणालयातील अधिकारी रुपेंद्र मोरे यांनी हा उपक्रम घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी विडा उचलला आहे. वाचन संस्कृती वाढीस लागावी व एकमेकांमध्ये हरवत चाललेला संवाद पुन्हा एकत्र आणण्यासाठी त्यांची धडपड आहे. आज माणसांतला संवाद हरवत आहे. शेजारी राहतो, मात्र सोबत राहत नाही. अशा परिस्थितीत वाचन संस्कृतीच हरवलेला संवाद परत आणण्यास मदतीची ठरेल. मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळावी, मराठी साहित्य सर्वदूर पोहोचावे यासाठी कुसुमाग्रजांनी अपार मेहनत घेतली. त्यांच्याच प्रेरणेने ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
 जवळपास ग्रंथालय नसल्याने अन्य काही कारणास्तव वाचकांना पुस्तके उपलब्ध होत नाहीत किंवा आर्थिक परिस्थितीमुळे आजची पुस्तके विकत घेता येत नाहीत. त्यांच्याकडून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
थोडक्यात सांगायचे नागरिकांचे समाधान तेच आमचे आशीर्वाद असे मोरे म्हणतात. शासकीय काम सांभाळून माणसांचा आणि साहित्याचा वावर असेल असे नि:स्वार्थ काम नेहमीच माणसाला माणूसपण जपण्यासाठी प्रेरित करीत असते, असे मोरे म्हणतात.
या उपक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या ग्रंथपेटीची किंमत त्यातील शंभर पुस्तके धरून रुपये १५ हजाराच्या आसपास आहे. यासाठी ज्यांना सामाजिक कार्य करावयाचे आहे त्या संस्था, उद्योग किंवा व्यक्तीकडून १५ हजार रुपयांचा धनादेश देणगी म्हणून ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नाशिक, या नावे घेतला जातो. त्यावर आयकर सवलतही मिळते व तेवढय़ा किमतीची पुस्तके समाजात अनेक व्यक्तींनी वाचल्याने समाधान मिळते. पुण्यात २५ प्रायोजक उभे राहिले, हा उपक्रम यशस्वी होण्यास मदत झाली.
वाचन संस्कृती कायम ठेवण्यासाठी ग्रंथालयेच असली पाहिजेत, या समजुतीला ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाने तडा दिला आहे.
 वाचकांना यामुळे चांगला पर्याय निर्माण झाला आहे, असे म्हणता येईल. इंटरनेट सिटी, फ्रीक आऊट आदी फॅडमुळे लोकांची वाचनाची सवय मोडली आहे. पूर्वीसारखी साहित्याला मागणी राहिली नाही.. नवीन पुस्तकांवर आता चर्चा होत नाही.. ही वाक्ये म्हणजे निव्वळ गैरसमज आहेत. याच्या बरोबर उलट परिस्थिती आज दिसून येत असल्याने आतापर्यंतच्या निरीक्षणातून दिसून येत असल्याचे मोरे सांगतात. शहरातील प्रत्येक भागात ग्रंथालये असणे शक्य नाही, असली तरी कामातून वेळ काढून ग्रंथालयाच्या वेळेत पुस्तक जाऊन आणणे जमत नाही. ज्येष्ठ नागरिकांनाही वयोमानानुसार ग्रंथालयात जाणे शक्य होत नाही. अशा लोकांना वाचनाची भूक व मित्र म्हणून भागविण्यासाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी’सारखे पर्याय नक्कीच उपयोगी पडतील.
पुण्यासारख्या शहरात हा उपक्रम राबविणे म्हणजे सर्वात जिकिरीचे काम; परंतु  शासकीय फोटोझिंको मुद्रणालयातील रुपेंद्र मोरे व त्यांचे सहकारी व कर्मचारी यांचे शेकडो हात मदतीला अहोरात्र झटत आहेत, ही एक गौरवास्पद बाब निश्चितच मानली पाहिजे. त्यामुळे निश्चित अशा उपक्रमांचा फायदा घेतला तरच पुढील  पिढीपर्यंत साहित्य पोहोचेल,  मराठी भाषेला जगात प्रतिष्ठा लाभावी म्हणून आयुष्यभर ध्यास घेतलेले कवी कुसुमाग्रज प्रतिष्ठानने ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या नव्या उपक्रमाने पुण्यातील वाचन संस्कृतीचा प्रवास वाढणार आहे.
 गरज आहे ती फक्त आपणही या प्रवासात सहभागी  होण्याची.. कुसुमाग्रज  प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला व शिलेदारांना  खरंच सलाम..!!  ग्रंथपेटी  मिळविण्यासाठी  संपर्क - ९४२३१४८०४८  ईमेल-  rupendramore5@yahoo.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it