मंगळवार, २० मे, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी मुळे गुरु भेट



     मी ग्रंथ तुमच्या दारीची एक समन्वयक. मी नेहमी पेटीतील पुस्तके माझ्या ऑफिसमध्ये माझ्या सहकारयाना   वाचायला  घेऊन जाते. त्या दिवशी एका मैत्रिणीने मागीतले म्हणून अभिमन्यू पत्नी उत्तरा -सुधाकर शुक्ला  यांचे पुस्तक घेऊन गेले. पण तिला देण्याआधी मी ते पुस्तक वाचयचे ठरवले थोडा स्वार्थी होता विचार पण कधीतरी चालते ना असे तसेच हे. तसे हि मला ऐतिहासिक वाचायला आवडते.

      पुस्तक हातात घेतले आणि सहज शेवटचे पान  उघडून बघितले तर लेखकाचा फोटो आणि माहिती होती.  तो फोटो बघून  स्वतःशी म्हणाले अरे हे तर शुक्ला सर. पण तेच हे कि आणखी कोणी असे एकदा वाटून गेले. सगळ्यात शेवटी माहिती दिली होती " प्रिन्सेस पद्मराजे गर्ल्स हाय स्कूल मधून निवृत्ती " मग तर माझी खात्रीच पटली कि हे तर आपले मराठीचे शुक्ला सर. त्या माहिती मध्ये घरचा नंबर हि दिला होता.
     मनात विचार आला कि फोन करून बघावा. थोडी भीती वाटत होती पण फोन लावला आणि सर आहेत का ते विचारले पण सर बाहेर गेले होते. संध्याकाळ पर्येंत मी शाळेच्या विचारात होते. मराठीचा तास चालू होता आणि सर शिकवत होते मन भूतकाळात रमून गेले होते. सगळ्या आठवणी समोर दिसू लागल्या होत्या. शुक्ला सर आणि त्यांनी शिकवलेल्या आर्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
      ऑफिस संपल्यावर संध्याकाळी परत सरांना  फोन केला मी. सर आले फोनवर त्यांचे वय आता ८० वर्ष  आहे. मला खरेच शब्द सुचत नव्हते. काय बोलू कळत  नव्हते. इतक्या वर्षांनी आपण आपल्या मराठी च्या सरांशी बोलू याची मला कल्पनाच नव्हती पण ते खरे झाले होते.
       बराच वेळ बोललो आम्ही सर सांगत होते त्यांनी काय काय लिहिले ते. मग म्हणाले  कि पुण्याला आलीस कि ये घरी नक्की. माझ्या घरच्यांची विचारपूस केली. बोलता बोलता माझ्या डोळ्यात पाणी कधी आले कळलेच नाही. मी किती जणांना सांगत सुटले कि मी माझ्या सरांशी बोलले म्हणून खूप आनंद झाला .ग्रंथ तुमच्या दारी  च्या योजनेमुळे सरांशी बोलण्याचे भाग्य मला लाभले.

रसिका  गुळवणी 

समन्वयक 

नवी मुंबई खारघर 










शुक्रवार, १६ मे, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा १७ मे - १८ मे २०१४

ग्रंथ दौरा . . . . .  शनिवार  १८ मे आणि रविवार १९ मे  २०१४
चिंचवड , तळेगाव दाभाडे , पाषाण - बाणेर , बावधन , कोथरूड , वडगाव बुद्रुक सिंहगड रोड , पुणे 

शनिवार  १७ मे

सकाळी १०. ३० वाजता चिंचवड  येथे योजनेचा शुभारंभ 
डी एल जोशी , सुखवाणी विला , १- २ बी , जीवन नगर , चिंचवड , पुणे .
ग्रंथ पेटीचे प्रायोजक -  आदित्य गार्डन  सिटी , वारजे.
संपर्क - शोभा जोशी ९९ २२ ९३ ३५ ९८ , ९९ २२ ४४ ८९ ९५
          गौरी टाकळकर  ९९ २२ ३२ ६७ १०

१७ मे तोलानी इन्स्टिटुयट,  तळेगाव दाभाडे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - कै . लीला मराठे यांच्या स्मरणार्थ शमिका आठले आणि सतीश मराठे , पुणे .  
संपर्क - अतुल पुणतांबेकर ९८ ६० ३२ ८५ २० 

१७ मे संध्याकाळी ५ वाजता पाषाण येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक . 
A ४०१ , कुमार सहवास सोसायटी , ओजस सोसायटीच्या शेजारी ,
अथश्री - सोमेश्वर पथ , पाषाण - बाणेर लिंकरोड परिसर , पाषाण . 
संपर्क - वर्षा राजहंस  ९२ २५ ३० ६० ६४ 

१७ मे संध्याकाळी ६ वाजता बावधन , पुणे  येथे ग्रंथ पेटीचे वितरण . 
ग्लोरिया अपार्टमेंट, अम्ब्रोशिया हॉटेल समोर , पिरंगुट रोड , बावधन , पुणे . 
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - कै . सुनंदा काळे यांच्या स्मरणार्थ - शाम पाठक, आदित्य गार्डन  सिटी , वारजे . 
संपर्क - कविता धारवाडकर ९८२३३ ०४२३७ . जयंत फडके ९८ २० ४० ३१ ९९

१७ मे संध्याकाळी  ७.३० वाजता कोथरूड येथे ग्रंथ पेटीचे वितरण . 
अजंठा , कृष्ण हॉस्पिटल जवळ , कर्वे रोड, कोथरूड . 
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - श्रीमती मीरा जोशी , पुणे . 
संपर्क - श्रीधर पाठक  ९८ २२ ०४ ३९ ८४ ,  श्रीकांत भोजकर ९८ ९० ३३ ३४ १४ 
 
रविवार १८ मे 
सकाळी  पुण्यातील मान्यवरांच्या गाठीभेटी . 

१८ मे संध्याकाळी ५ वाजता वडगाव बुद्रुक येथे ग्रंथ पेटीचे वितरण 
नारायण बाग , जुन्या टोल नाक्यामागे , ज्ञानदीप शाळेजवळ , वडगाव बुद्रुक , पुणे . 
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - शब्द सखी वाचक मंडळ , बिब्बेवाडी, पुणे आणि  नाशिक एजुकेशन सोसायटी , नाशिक . 
संपर्क - मिलिंद नाईक ९३ ७१ २६ ९४ ७८
 

सोमवार, १२ मे, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी बेळगाव मे २०१४

मुलुंड वाचक प्रतिक्रिया

साहित्य म्हणजे अनुभव , भावना, विचार,वेदना,प्रतिक्रिया यांना दिलेले शब्दरूप , मग त्यासाठी कोणताही साहित्यप्रकार मनोधारणेनुसार निवडता येतो. उदा. कथा कादंबरी, आत्मचरित्र वगैरे आकलन व संवेदना वाढवण्याचे प्रयत्न साहित्याद्वारे होतात म्हणून साहित्य निर्मितीचे महत्व आहे. साहित्यातील ताकद आपण वाचनातून अनुभवली आहे. त्याला कोणताही विषय वर्ज्य नाही. अशीच विविध विषयांची पुस्तके कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक यांच्या ग्रंथ  तुमच्या दारी या संकल्पनेतून आमच्या दारी आली. नव नवीन पुस्तके वाचताना विचारांचा झोका इतका उंच जातो कि तो खाली यायलाच तयार नसतो. विविध भाषांमधील अनुवादित पुस्तके देश विदेशातील राजकीय, सामाजिक विचार वेदना यांची जाणीव करून देतात.
    या प्रकल्पाला मिळालेला प्रतिसाद म्हणजे मराठी माणसाचे साहित्यावर असेलेले प्रेमच व्यक्त करणे होय. असे प्रकल्प राबवण्याचा विचार मनात येणारयाना व तो प्रत्यक्षात उतरवताना त्यांना सहकार्याचे हात देणाऱ्या सर्वांना माझे त्रिवार वंदन

सौ मधुरा  सुधीर महंत

मुलुंड वाचक


गुरुवार, ८ मे, २०१४

सातारा कोल्हापूर ग्रंथ तुमच्या दारी दौरा ९ मे २०१४

कराड अर्बन बँकेतर्फे वाचन संस्कृतीच्या जागृतीसाठी  ग्रंथ तुमच्या दारी 
 ​ हि ​
योज
​ना राबवीत आहे .हि योजना कराड व कराड परिसरात,
 
फलटण,
 काले
 ​,
 इस्लामपूर
,
 शिराळा
​,
 येळगाव
​ ,
 सोलापूर, पुणे ,कोल्हापूर व कोल्हापूर परिसरात  ८ पेट्या असून ,९ व्या पेटीचा  शुभारंभ दि.०९.०५.२०१४ रोजी कोडोली  ता.पन्हाळा येथे होणार आहे.  अशा एकूण ९२ पेट्या दि कराड अर्बन को-ओप.बँक लि.कराड (शेड्यूल्ड बँक)व कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने 9200 ग्रंथ वाचकासाठी उपलब्ध आहेत.
बँकेचे शताब्दी महोत्सव २०१७ साली  साजरी होणार आहे .यानिमित्ताने बँकेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम  राबवले जाणार  आहेत. त्यापैकीच  
 
ग्रंथ तुमच्या दारी 
​ हा एक उपक्रम आहे.
 कोल्हापूर मधील वाचक मेळावा कराड अर्बन बँकचे शाहूपुरी शाखेत दि.०९.०५.२०१४  ५.३० pm. होणार आहे.


बुधवार, ७ मे, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी बेळगाव दौरा

बेळगाव येथे ग्रंथ तुमच्या दारी योजना सुरु करण्यासाठी 
शनिवार १० मे २०१४ रोजी बेळगाव येथे  
वाचक , ग्रंथ प्रसारक , वाचन संस्कृतीचे हितचिंतक यांची 
बैठक आयोजित करत आहोत . 
बेळगाव मधील आपल्या परिचित असणाऱ्या सर्व वाचन प्रेमीना 
आवर्जून आमंत्रित करून बैठकीस उपस्थित राहावे . 
ठिकाण व वेळ लवकरच कळवण्यात येईल . 
अधिक माहितीसाठी संपर्क करा.

विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान. ९९ २२ २२ ५७ ७७

For more details plz contact.
Vinayak Ranade     
Mob - 99 22 22 5777 
What'sup -  9423972394


ग्रंथ तुमच्या दारी बेळगाव


पुणे ५१ व्या ग्रंथ पेटी चे उद्घाटन


ग्रंथ तुमच्या दारी हितवदा नागपूर


ग्रंथ तुमच्या दारी प्रतिक्रिया बेळगाव

ग्रंथ तुमच्या दारी 
कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे विनासायास विनामोबदला ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम गावो-गावी आणि म्हणूनच घरो-घरी नेणारे विश्वस्थ आणि एक ग्रन्थ-प्रेमी तथा एक समर्पित कार्यकर्ते हे बेळगावला येत अहेत हे वाचून खूप-खूप - आनंद झाला . लोकमान्य तर्फे अनेक साहित्यिकांना भेटण्याची संधी बेळगावात मिळत असते तेंव्हा श्री विनायक रानडे ना भेटणे आणि त्यांची ग्रंथ तुमच्या दारी ही योजना समजून घेणे आणि तिला शक्य होईल तेवढा सकारात्मक प्रतिसाद एवं सहयोग देणे हे बेळगावातील मराठी -प्रेमी संस्थांनी जरूर कराव . बेळगावच्या परिसरात अनेक मराठी साहित्य सम्मेलने होत असतात त्यांच्या संस्थांनी ही योजना जरूर राबवावी 
.Facebook वरून मला या योजनेची एक वर्षा पूर्वी माहिती मिळाली आणि श्री विनायक रानडे हे ज्या समर्पित भावनेने प्रवास करीत असतात आणि ही योजना हा उपक्रम गावो-गावी नेत असतात तो तडाखा ती तडफ पाहून मी त्यांच्याशी संपर्क साधला .ते या उपक्रमाविषयी भर-भरून बोलले तेंव्हा कळून चुकल की या माणसात ग्रन्थ आणि ते सर्व दुर जावे या साठी किती तळमळ आहे . 
श्रीविनायक रानडे हे आता माझे इंटरनेट वरून झालेले एक मित्र आहेत अस मी अगदी अभिमानानी म्हणू शकतो . त्यांच्या या उपक्रमाला मी tv च्या भाषेत DTH सेवा अस म्हणेन म्हणजेच direct to home (but free ). कर्नाटकात असलेल्या वेग-वेगळ्या मराठी संस्थाना आणि मराठी मंडळानीही ही योजना हा उपक्रम राबवावा यासाठी धारवाड ,हुबळी ,गुलबर्गा ,मंगळूरू (मी मंगळूरू मराठी मंडळाचा संस्थापक सदस्य आहे ),बेगलुरू या व अशा अनेक ठिकाणी त्यांचा जाण्याचा मानस आहे या त्यांच्या कार्यात हि आपण बेळगावकरांनी मदत करायला हवी अस मला वाटत . श्री विनायक रानडेजीच आणि त्यांच्या उपक्रमाच स्वागत आणि मनापसून शुभेछा … 

क़िशोर मधुकर काकडे -मंगळूरकर



सोमवार, ५ मे, २०१४

पुणे समन्वयक प्रतिक्रिया

मा विनायक रानडे यांस

२५ मे रोजी पु ल देशपांडे व त्यांचे लेखन या विषयावर चर्चा/माहिती/अनुभव हा कार्यक्रम डॉ सुचेता परांजपे व ज्येष्ठ लेखिका प्रतिभाताई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. तुमच्या या स्तुत्य  उपक्रमामुळे आम्हा सर्वांना  याचा लाभ घेता  येतोय हे महत्वाचे. वाचनाची भूक व विचार खाद्य या उपक्रमामुळे सुरु झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. अनेक धन्यवाद

शैला लिमये 

समन्वयक 

बाणेर रोड वाचक सभासद 




रविवार, ४ मे, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी सटाना १७ मार्च २०१३

ज्ञानवर्धिनी विद्यालय कांदिवली (प.) ग्रंथ पेटी उदघाटन


ग्रंथ तुमच्या दारी” योजनेचे ज्ञानवर्धिनी विद्यालयात जोरदार स्वागत 

        कांदिवली (प.) यथील ज्ञानवर्धिनी विद्यालयात कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक व गोरेगावकर नागरिक यांचे संयुक्त  विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या “ग्रंथ तुमच्या दारी” या योजनेचे जोरदार स्वागत करण्यात आले .
  ज्ञानवर्धिनी विद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नांनी “ग्रंथ तुमच्या दारी” यांच्या ३४ व्या पेटीच्या उद्घाटन निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिलेले पश्चिम मुंबई विभागाचे मुख्यसमन्वयक मा.डॉ.महेश अभ्यंकर यांनी आपल्या अमृततुल्य वाणीने विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले. याप्रसंगी श्री अशोक काणे, श्री. तळपाडे सर, माजी विद्यार्थी संघटनेची पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे छानसे सुत्रसंचलन माजी विद्यार्थी प्रीतम धुमाळ याने केले.