शनिवार, २८ जून, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा २८ व २९ जून २०१४

ग्रंथ दौरा - कल्याण , अंबरनाथ , ठाणे २८ व २९ जून २०१४

शनिवार २८ जून दुपारी १२ वाजता कल्याण परिसरातील डोंबिवली नागरी बँकेच्या सौजन्याने 
ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील वाचक तसेच सहभागी होवू इच्छिणाऱ्या वाचकांची बैठक . 
संपर्क - रमेश करमरकर ७७ ३८ ७२ ३६ ९२ 

अंबरनाथ येथे "ग्रंथ तुमच्या दारी" योजनेचा शुभारंभ 
शनिवार २८ जून २०१४ रोजी दुपारी ४ वाजता 
ब्राम्हणसभा, दत्तमंदिर , वडवली विभाग, अंबरनाथ पूर्व येथे . 
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि अंबरनाथ जय-हिंद को ऑप बँक यांच्या संयुक्त विद्यमाने 
सुरु होणाऱ्या या योजनेमुळे अंबरनाथ , बदलापूर , उल्हासनगर परिसरातील 
वाचकांना सहभागी होता येईल . 
आपण व आपल्या परिचित त्या परिसरातील वाचकांना आमंत्रित करून 
सक्रिय सहभाग द्यावा . हि विनंती . 
रूपा देसाई , ९८ २२ ४० १० १० . 
समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी , अंबरनाथ . 

रविवार २९ जून २०१४ ठाणे 
सकाळी १० वाजता प्रकुती सोसायटी , तीनहात नाका , ठाणे येथे 
ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील वाचकांचा मेळावा . 
संपर्क : अविनाश गोखले ९८ ६९ ४५ २६ ०१

सोमवार, १६ जून, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी अजित पार्क मालाड मुंबई ग्रंथ पेटी उदघाटन ८ जून २०१४

       अजित पार्क को.ऑप.हौ.सोसायटी ही सोमवार बाजार,मालाड (प) येथील बहुसंख्य मराठी भाषिक असलेली सोसायटी आहे.येथे दरवर्षी १५ ऑगस्ट,२६ जानेवारी,आनंदमेळा (फन-फेअर),सत्यनारयाणाची पूजा,सोसायटीमधील लोकांनी बसविलेले लहान मोठ्यांचे कार्यक्रम उत्साहात साजरे साजरे केले जातात.सोसायटीतील एक उत्साही रहिवासी श्री. सोमनाथ राणे यांच्या अफाट जनसंपर्कामुळे ग्रंथ तुमच्या दारीया संकल्पनेची माहिती मिळाली.असे वाचनालय या विभागात चालविण्यासाठी श्रीमती लोके,सौ. शिरोडकर,सौ.फणसेकर,सौ. राणे यांची समिति बनवून त्यासंबंधीचे पत्रक वाटण्यात आले.या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.लिबर्टी गार्डन,मालाड (प) येथे चालविण्यात येत असलेल्या वाचनालायच्या जागी जाऊन प्रत्यक्ष कार्यपध्दतीची माहिती घेण्यात आली. दोनच दिवसात ग्रंथपेटीच्या देणगी रकमेच्या निम्मी रक्कम पश्चिम विभागाच्या समन्वयकांकडे सुपूर्द करून उर्वरीत रक्कम दिल्यावर अजित पार्क सोसायटीच्या' नावे ग्रंथ पेटी देण्याची विनंती केली. पेटी उपलब्ध असल्याने व सभासदांच्या वाचनाच्या कळकळीमुळे,सर्व रक्कम जमण्याची वाट न पाहता त्यांना पेटी क्र. ४ केंद्र सुरू करण्यासाठी लगेच दिली. 
      या केंद्राचे औपचारीक उद्घाटन एका घरगुती समारंभात दि. ८ जून २०१४ रोजी समन्वयक श्रीमती.दीपा लोके याचे घरी या विभागातील सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. हेमंत बेलसरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.वाचनालयाचे पहिले सभासद व अजित पार्क सोसायटीचे सचिव श्री. खाडये यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. बेलसरे यांचे स्वागत केले.स्वत: डॉ. बेलसरे चिंचोली बंदर,मालाड(प) येथील केंद्राचे समन्वयक असल्याने – अशा केंद्रांची  गरज ,सर्वांगीण प्रगतिसाठी वाचन करण्याचे महत्व आणि आवश्यकता,वाचन का व कसे करावे,तसेच विचारांची देवाण-घेवाण होत असल्याने परस्पर संबंध वाढीस लागून दृढ होत असल्याचे संगितले.तसेच वाचनालय चालविताना घ्यावयाची काळजी याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. वाचनालय सुरू करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांनी समितीतील सभासदांचे कौतुक केले व श्रीमती लोके याना एक पुस्तक देऊन प्रतिकात्मक उद्घाटन केल्याचे जाहीर केले.
      सौ. रेखा शिरोडकर यांनी वाचनालयातर्फे डॉ. बेलसरे यांचे आभार मानले.तसेच पेटी ठेवण्याचे ठिकाण,पुस्तक अदला-बदलीचा दिवस व वेळ तसेच पुस्तक हाताळण्यासंबंधीच्या नियमावलींची माहिती सांगून जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
      श्री. सोमनाथ राणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती लोके,सौ. शिरोडकर,सौ.फणसेकर,सौ. राणे यांनी आपल्या घरातीलच एक कार्य आहे असे समजून वाचनालय सुरू करण्यात सहभाग घेतला त्याचे फलित म्हणजे 'अजित पार्क वाचनालय


ग्रंथ तुमच्या दारी अजित पार्क मालाड मुंबई ग्रंथ पेटी उदघाटन फोटो 


https://www.youtube.com/watch?v=YHNP2AMx_ZI&feature=youtu.be


शनिवार, ७ जून, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दुबई दौरा २० जून २०१४

दुबई येथे  "ग्रंथ तुमच्या दारी" योजनेचा शुभारंभ 
शुक्रवार २० जून २०१४ रोजी होत आहे. 
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. 
कार्यक्रम सकाळी १०.३० ला सुरु होईल. 
ठिकाण -  मिटकॉन सभागृह, २१५ अल क़ियदा बिल्डिंग एरपोर्ट जवळ, डेरा दुबई . 
या प्रसंगी ८ पेट्या वितरीत केल्या जातील. 
अधिक माहिती साठी संपर्क 
सौ स्वाती कडवे, +९७१ ५० २१५२७८२ दुबई . sandeep@kadwe.com

विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान.    
Mob  +91 99 22 22 5777 What'sup  +91 9423972394

लोकेश शेवडे , कार्यवाह ,  कुसुमाग्रज प्रतिष्ठान.
Mob  +91 9822026844 Email  shevadelokesh@gmail.com

शुक्रवार, ६ जून, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी दौरा ११ जून - १२ जून

पुणे . . . . ग्रंथ निघाले  .  . . .
बुधवार ११ जून आणि गुरवार १२ जून २०१४
पुण्यातील नव्या ५ पेट्या ( पेटी क्र . ५७ ते ६१ )

बुधवार ११ जुन २०१४

सकाळी १० - जुन्नर, सुपातेवाडी , आदिवासी आश्रमशाळा.  येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
            आयोजक - धनंजय राजूरकर  ९४२३० ३८८८६

दुपारी ३ - कराड बँक , हर्शल हॉल समोर , करिष्मा सोसायटी समोर , कोथरूड , पुणे .

दुपारी ४ - अथश्री आणि कुमार सहवास  सोसायटी  ए ४०१ , पाषाण बाणेर रोड येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
            आयोजक - वर्षा राजहंस  ९२२५३ ०६०६४  शुभा कर्णिक  ९८२३४ ०५८६५
            प्रायोजक - आदित्य गार्ड्न सिटी वाचक गट क्रमांक २

संध्याकाळी ५. ३०  - आदित्य गार्ड्न सिटी वारजे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
            आयोजक - नेहा रायते  ९८२२८ ९३६२२
            प्रायोजक - डॉ.  वलवडे विमान नगर  ९५५२५ ७५१२३

संध्याकाळी ७ - लेक व्हु सोसायटी सुखसागर नगर कात्रज येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
             आयोजक - अपर्णा नातु  ९४२२३ १७२१६
             प्रायोजक - परेश नाईक , धायरी ९८९०५ ०५४८७, नागेश नाईक  ९८८१२ ४२५४२

गुरवार १२ जुन २०१४

सकाळी १० - सतीश मराठे, ४२/१० शाकुंतल, शॉप ९, पहिला मजला, लॉ कॉलेज  रोड,  नळ स्टाप ,पुणे.  येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
              आयोजक - सतीश मराठे ,  ०२० २५४४०२७६
              प्रायोजक -  श्रीधर पाठक , ९८२२० ४३९८४

दुपारी २ - यशदा , युनिव्हसिटी रोड.  येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
             आयोजक - डा मनोज कुलकर्णी  ९८२३३ ३८२५६

संध्याकाळी ६ - संत तुकाराम उद्यान , सेक्टर २७, प्रधिकरण, निगडी . येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
              आयोजक - संयोगिता पाटील  ९४२२० ५७५६१  एैश्वरया पानसे ९३७२५ १२८६१
              प्रायोजक -  खिरे शितल ७५८८२ ३५५९६

पुणे व परिसरातील वाचकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा .

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने
पुणे शहर व परिसरात ६१ विविध ठिकाणी अनेक देणगीदारांच्या सहकार्याने
वाचकांना विनासायास विनामोबदला पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होत आहेत .
यात आपल्या सहकार्याने वाढ होत राहीलच . . . . . . . .

संपर्क  - पुणे समन्वयक  :  रवींद्र कांबळे  ९ ८ ५ ० ६ ३ ६ ० ६ १
             सहसमन्वयक    :  प्रसाद गुरव  ९ ८ ६ ० १ ० २ ३ ६ २