शनिवार, ५ एप्रिल, २०१४

पेण समन्वयक प्रतिक्रिया


पेणच्या पुस्तक पेटीत (ग्रंथ तुमच्या दारी  या उपक्रमात) सामील होऊन वर्षंही झाले नसेल. पण सुरुवातीलाच कबुल केल्याप्रमाणे कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने दर चार महिन्यांनी नवीन पुस्तकांची पेटी आमच्या दारात आणून ठेवली आहे. ई-बुक्स आणि इंटरनेटच्या जमान्यात सुध्दा मला वाटतं पुस्तकांचे महत्व अबाधित आहे आणि ते नवीन पिढीपर्यन्त पोचवणं आवश्यक आहे. आणि नुसतेच वाचन संस्कृती संपत आली लोकं हल्ली वाचत नाहीत असे गळे काढण्यापेक्षा प्रत्यक्ष लोकांमधे जाऊन वाचनाच्या आवडीला हातभार लावणे जास्त कठीण आहे. हा उपक्रम हा जगन्नाथाचा रथ आहे आपण सगळ्यांनीच आप-आपल्या परीने कामाला हातभार लावायला हवा आहे. त्या दृष्टीने मला सांगायला खूप अभिमान वाटतो की गेले दोन महीने आमच्या पेणमधील स्वयंसेवक वाचकांनी पेटीची जबाबदारी आठवड्यातील दोन वारी वाटून घेतली आहे. गोखले,घाटे,भट,जोशी,टकले अशा सर्व जणी आळी-पाळीने या उपक्रमासाठी वेळ देत आहेत. मुळात पहिल्या पेटीचे प्रायोजकत्व ही सुद्धा एका दानशुराची मिरासदारी नव्हती तर संपूर्ण लोकसहभागातून जमलेले होते हेही उल्लेखनीयच आहे.

 सावनी गोडबोले 
 समन्वयक 
 पेण वाचक कट्टा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा