शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

ग्रंथ तुमच्या दारी महेंद्र नगर मालाड पूर्व २२ ऑक्टोबर २०१६ प्रथम वर्धापनदिन वाचक सोहळा वृत्तांत

     ग्रंथ तुमच्या दारी महेंद्र नगर वाचक सोहळ्यातील वाचकांचे  स्माइली स्टिकर लावून खास स्वागत केले गेले.  त्यानंतर ग्रंथ तुमच्या दारी च्या मुख्य सोहळ्याला सुरवात झाली.
 
     ग्रंथ तुमच्या दारी महेंद्र नगर वाचक सोहळ्याची सुरवात दीप प्रज्वलनाने झाली. श्री विनायक रानडे (कुसुमाग्रज प्रतिष्ठान विश्वस्त) ,सेक्रेटरी श्री नाबर , श्री अशोक काणे, मेजर शिरिस्कर,घनश्याम देटके हे स्टेजवर स्थानापन्न झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ भाग्यश्री राव करत होत्या. दीप प्रज्वलनानंतर सोसायटीतील लहान मुलींनी नाचाच्या माध्यमातून विविध गाणी सादर केली.
      सौ भाग्यश्री राऊ यांनी मितवा ग्रुप बद्दल थोडक्यात माहिती सांगितली. आनंदी आणि आशावादी राहणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हे या ग्रुपचे ध्येय आहे. त्याचबरोबर ग्रंथ तुमच्या दारी या संकल्पनेशी त्यांची कशी ओळख झाली आणि हा उपक्रम कसा चालू झाला याची त्यांनी माहिती दिली.त्यानंतर अपर्णा हिने मितवा ह्या ग्रुपसाठी एक कविता म्हणुन दाखवली.
     आराधना ग्रुप ने विविध गाणी  (गुरुवंदना ,तू सुखकर्ता तू दुःखहर्ता ,जो आवडतो सर्वांनां ,इतनी शक्ती हमें दे ना दाता, प्रभाती सूर नाभी रंगात,खेळ मांडीयेला,दत्ताची पालखी,पयोजि मैने राम रतन धन पायो ,वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम,भूलोकीच्या गंधर्व अमृत संगीत गा , तुम्ही हो माता पिता तुम्ही हो )म्हणून वाचकांचे मनोरंजन केले
    खास आकर्षण म्हणजे जोगळेकर काका यांचे आकाशी झेप घे रे पाखरा हे गाणे होते. वयाची ८० वर्ष होऊन आणि कॅन्सरशी लढा देऊन सुद्धा जोगळेकर काका चा उत्साह दुर्दम्य होता. श्री. जोगळेकर काका आणि आराधना ग्रुप चा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
    श्री अतुल भातखळकर  (आमदार )यांच्या विशेष उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली . त्यांनी आपल्या भाषणात सांगितले कि मराठी भाषेचं संवर्धन व्हावे म्हणून सुरु असलेला हा वाचन प्रकल्प फारच छान आहे आणि अश्या प्रकारच्या उपक्रमांना आम्ही नेहमी साथ देऊ. त्यांचा सत्कार श्रीमती वैद्य (जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्या )यांच्या हस्ते झाला.
    त्यानंतर श्री विनायक रानडे यांना ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाबद्दल सांगण्याची विनंती केली गेली. श्री विनायक रानडे आपली भाषणात म्हणतात कि वाचन हे माणसाला घडवते. मलाही अपघाताला सामोरे गेल्यानंतर हे कळू लागले. या उपक्रमाची सुरवात नाशिक येथून झाली. आणि आता हा उपक्रम भारतातील वेगवेगळ्या शहरात आणि देशाबाहेर सुद्धा यशस्वी रित्या राबवला जात आहे.ते असे हि म्हणतात कि हि ग्रंथपेटी म्हणजे संवादिनी आहे. एकमेकांना जोडणारे एक साधन झाली आहे. दोन पिढयांना सांधणारा एक उत्तम दुवा आहे. या उत्स्फूर्त भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर श्री अशोक काणे, मेजर शिरिस्कर,घनश्याम देठकर यांचा सत्कार करण्यात आला.
       अपर्णा ताईंनी चार्जेर हि कविता म्हणून दाखवली. त्यानंतर श्री नाबर काका यांनी  आपले मनोगत व्यक्त करावे अशी विनंती केली गेली. आपल्या मनोगतात ते म्हणतात कि वाचनामुळे मनात चांगल्या गोष्टी रुजतात. सध्या कामामुळे वाचन शक्य होत नसले तरी पूर्वी केलेल्या वाचनाचे अजुनी स्मरण होते तेव्हा छान वाटते.   त्यानंतर श्री विनोद पारकर याना आपले मनोगत व्यक्त करावे अशी विनंती केली. त्यांनी दोन प्रसंगातून आशावादी कसे राहावे आणि त्याचा काय फायदा होतो हे विशद केले. वाचन हे मन सुदृढ ठेवण्याचे एक उत्तम साधन आहे असे ते म्हणतात.  पूर्वी पेटी हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जायचा पण ग्रंथपेटी मुळे वाचन नक्की वाढेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
      या नंतर अपर्णा ताई आणि कुंदा राऊत यांनी कविता सादर केल्या तसेच सुप्रिया म्हात्रे आणि अंजली कोलवलकर यांनी कथाकथन सादर केले. सर्व वाचकांना या कार्यक्रमात अल्पोपहार आणि सरबत देण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम सौ भाग्यश्री, श्री उत्तम राउ   आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप छान प्रकारे आयोजित केला.
     
       माझे ग्रंथालय आणि माय अथेनियम च्या पेटीची मांडणी स्टेजच्या शेजारी करण्यात आली होती त्याशिवाय मितवा आणि महेंद्र नगर वाचक परिवार यांनी साजरा केलेल्या कार्यक्रमाचे फोटो हि प्रदर्शित केले होते

https://youtu.be/Enkt4UcGJeg
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा